मुख्य सामग्रीवर वगळा

"रान बाजार"

रान बाजार..!

"रान बाजार"

असंच काहीसं घडलं होतं... कदाचित..?

मराठी वेबसृष्टीवर खळबळ उडवून देणारी बहुचर्चित मराठी वेब सीरिज "रानबाजार" अखेर आज बघितली.राजकारण अन् राजकारणाच्या पलिकडच्या अनेक न कळू शकणाऱ्या गोष्टी अन् यात शिकार ठरत जाणारा सामान्य माणूस.
अश्या एका संवेदनशील विषयाला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या वेब सीरिज माध्यमातून करण्यात आला आहे..!

वेब सीरिज मधील काही अश्लील संवाद किंवा काही ठिकाणी खूप ओव्हर झाल्यासारखे वाटते.परंतु शेवटपर्यंत ही वेब सीरिज बघत गेलं की आपल्याला सुरुवातीलाच पडत गेलेल्या एक एक प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत मिळत जाते..!

वर संगितल्याप्रमाणे काही सीन बोल्ड काही संवाद अश्लील वाटतील त्यामुळे ट्रेलर बघूनच वेब सिरीज बघायची की नाही हे आपलं आपण ठरवावे..!

रेगे’ आणि ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक "अभिजित पानसे" या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन आपल्या समोर येतात अन् त्यांनी त्यांच्या कलाकारीतून असो किंवा दिग्दर्शनातून या वेब सिरीजला अक्षरशः न्याय दिला आहे..!

मराठीतील या भव्य वेब सीरिजची निर्मिती "प्लॅनेट मराठी","अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल" कंपनीने केली आहे.मराठीतील आघाडीची अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली "प्राजक्ता माळी" यांनी या वेबसीरिजमध्ये केलेलं कामसुद्धा मराठी वेब विश्र्वात प्रथमतःच इतकी टोकाची भूमिका केल्याचं पाहायला मिळते.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि "प्राजक्ता माळी" यांच्यासह "मोहन आगाशे" आणि "सचिन खेडेकर" देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेले सीन्स पाहायला मिळतात..!

एका मंत्री पदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराच्या छुप्या खुनापासून वेब सिरिज सुरू होते.मग त्या खून करण्यामध्ये असलेले असंख्य अदृश्य हात,पोलीस दल तपास करत असताना पुराव्याजवळ पोहचताच त्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा आपण एका खूप मोठ्या रॅकेट मध्ये फसलो असल्याची जाणीव होणं अन् त्यातून स्वतःच स्वतःला संपवून टाकणं..!

पोलिसांचे असंख्य पुराव्यांना,शक्यतांना हाताळून पुरावे शोधणं,पत्रकारांचे या सगळ्याकडे बारकाईने लक्ष असणं.अखेर सर्वच त्या खुनाच्या तपासापर्यंत पोहचणं.परंतु शेवटी सगळ्यांना राजकारण आड येणं अन् अनेक बेकसूरू लोकांचा त्यात जीव जाणं..!

एकूणच खूप गुंतागुंतीची वाटणारी ही वेब सिरीज जसजशी शेवटाकडे येते,तसेतसे एक-एक पदर उलगडू लागते अन् शेवट पुढे अजून काय होईल हा प्रश्न आपल्या मनाला करून संपते..!

"सस्पेन्स थ्रिलर" म्हणावी अशी ही वेब सिरीज पुढच्या भागात काय होईल याची वाट बघायला लावते,यासाठी नक्कीच तिचा पुढचा भाग लवकर यावा..!

प्राजक्ता माळी,सचिन खेडेकर,मकरंद अनासपुरे,अनंत जोग,वैभव मांगले,माधुरी पवार, उर्मिला कानिटकर,मोहन जोशी,डॉ.मोहन आगाशे,तेजस्विनी पंडित या सगळ्यांची भूमिका कमाल आहे..!

माझे सगळ्यात जास्त आवडणारे पात्र कोणते असेल तर "अभिजित पानसे" दादा यांनी साकारलेला "मोकाशी" हे,सोबतच "मकरंद अनासपुरे" यांचा पत्रकार "आप्पा दिवेकर" सुद्धा आपल्याला त्यांच्या भूमिकेशी खिळवून ठेवतो."प्राजक्ता माळी" यांनी साकारलेली वेश्या वस्तीतील "रत्नाची" भुमिकासुद्धा लक्षवेधी ठरणारी आहे..!

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...