मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..!भाग-तीन

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन  रामा कुंडूर एक बाजूला गिलास, डेचकी ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत, बसून गप्पा झोडीत होता. जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता. तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णा तलाठीकडे बघत म्हंटला, ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..!  अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठाखाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..! मग गावच्या गप्पा सुरू झाल्या, तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले. गावची बारबापी लोकं कोण, कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो. गावचा सरपंच कसा आहे, तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..! गावची शाळा, शाळामास्तर, जुना तलाठी, आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक. ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्यामुळे झोल

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २ रातीचा नवाचा पार कलला अन् संतू अण्णा तलाठी,  रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर गावकुसाच्या गावातल्या मालदार, गरीब, डांबरट लोकांच्या आठवणी काढत गप्पा करू लागले होते. रामा कुंडुर पारावर उकीडवा बसून संतू अण्णा तलाठीला अन् जगण्याला गावातल्या एक एक हकीकती सांगत होता. जगण्याही त्याच्या या हकीकतींना हो ला हावजी अन् हातवारे करीत बोलत होता.  संतू आण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर आपलं कपड्यांचं पेंडकं उश्याला घेऊन एक पायाची टांग एका गुडघ्यावर ठेऊन, या सगळ्या गप्पा गोडीने ऐकत बसले होते. अधून मधून समशानातील कुत्री त्या काल मेलेल्या गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचउंच आवाजात इवळायची. त्यांचा आवाज यांच्या बसल्या जागेवर येत म्हणून ती समशानाकडे बघायची. एखादं कोल्ह मोठ्यानं कोल्हेकूई मारत इवळायला लागलं की अंगावर काटा येऊन जायचा. अन् समशानात असणाऱ्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्याची आग समशानात असलेल्या येड्या बाभळीला तिच्या कवेत घेती की काय असे त्या आगीचे लोट लक्षी आईच्या पिंपळ पारावरून दिसत असायचे.

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा भाग- एक

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा भाग- एक भर सायंकाळची वेळ झाली, सूर्य अस्ताला जात होता. ढगांच्या आडून लपंडाव खेळणारा सूर्य कधी एकदा डोंगराच्या पल्ल्याड खालच्या अंगाला निघून जाईल अन् कधी एकदा सगळीकडे अंधार बुडुक होईल. या विचाराने एका हातात पांघरूण असलेलं गोणीचे पेंडकं, खांद्याला बंदाची लांबती पिशी अटकवून, डोक्यावर ऑफिस कामात कागदपत्र ठेवायला म्हणून असलेली सुटकेस घेऊन संतू आण्णा चालत होता. नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशीतला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या, गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता. वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं, गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरून डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता. गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू आण्णा चालू लागला. ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना क

शिवना मायच्य कथा..! भाग-दहा

शिवना मायच्य कथा..! भाग-दहा उद्याच्या पहाटेच्या लाल परीने शहराला जायचं म्हणून बॅग भरायला घेतली,बॅग भरून झाली. निघायची आवरासावरी करुस्तोवर सांज कशी होऊन गेली कळलं नाही. सूर्य अस्ताला गेला होता तेच रोजचं दृश्य जे गेले आठ दिवस मी बघत होतो, ते आज पुन्हा एकदा शेवटचं दिसणार होतं. पुन्हा कित्येक दिवस न दिसण्यासाठी. रानातली लोकं घराच्या वाटा जवळ करत होती, दूरवर महादेवाच्या देऊळाजवळ असलेल्या पांदीने येणाऱ्या गडी माणसांचा त्यांच्या बैलगाडीच्या दगडात रुतून होणारा आवाज, बैलाच्या गळ्यात असलेली घंटा तिचा आवाज माझ्या बसल्याजागी येत होता. गावातली माझी माऊली देवळाच्या वाटा जवळ करत होती. रोजंदारीवर गेलेली लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. शेवटच्या घटका मोजणाऱ्या काही एका हातावर मोजता येईल अश्या गावच्या माय माऊल्या बुडत्या सूर्य नारायणाला तुळशीचे पाया पडत नमस्कार करत होती. बसल्या जागेवरून सारा गाव नजरी पडायचा अन् संगतीने दूरपर्यंत वाहती दिसणारी शिवनामायही नजरी भरायची. तिचं संथ वाहनं आयुष्याची गणितं अन् जगण्याची रीत सांगून जायचं. अन् मी पुढे कित्येक वेळ मी तिला एकटक पाहत राहायचो. शिवनामायनं गावाला गावपण अन्

शिवना मायच्या कथा..! भाग नऊ

शिवना मायच्या कथा..! भाग नऊ  रात्र हिवानं सरली तसं मी पहाटेच परसदारी असलेल्या लाकडी खाटेवर जाऊन गोधडी घेऊन पुन्हा झोपून राहिलो,एरवी माय उठली अन् अंगण झाडून सडा रांगोळी करत बसली. माय तिचं आवरून भाकरी करायला बसली सूर्योदय होऊन सुरू पिंपळाच्या पानांच्या आडून घराच्या चौकटीच्या आता शिरला तसं मायना मला आवाज दिला..! छोटे सरकार होतयाका उठतोयो का..! मी अंगाला आळोखे देत उठलो खाटेवर असलेली गोधडी घडी घालून तिला घडोंचीवर फेकले अन् दातून घेऊन दात घासत बसलो होतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना न्याहाळत होतो. तितक्यात मायना पुन्हा आवाज दिला, छोटे सरकार बाळंतपण आजच्या दीस..! मी हसतच हातातली लिंभाऱ्याची काडकी फेकली अन् मायला बोलता झालो, आजच्या दीस काय करायचं माय झालीया झालीया बाळंतीण तुझी लेक..! अन् हसतच मी कुंडीतून पाणी घेतलं मावा खालल्यावर जश्या गुळण्या कराव्यात तश्या गुळण्या करून माय जवळ चुल्हंगनापाशी येऊन बसून राहिलो.  चहा उकळी आलाच होता मायनं मला एका कान तुटक्या कपाला जलमरच्या थाटलीत पार उतू जास्तोवर चहा वतला. मी पिठाच्या डब्यावर उभं राहून बाजाराच्या पिशवीत असलेले बटर काढून चहा संगतीने गिळत बसलो. पहाट