मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

धोंड्याईचा गाव - भाग २ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धोंड्याईचा गाव - भाग २

धोंड्याईचा गाव - भाग २       धोंड्याई एका हातानं कोऱ्या चहाचा कप सावरत दुसऱ्या हाताने लांब झुबक्याची नथ सावरत चहा पित होती,चुलीचा धुर सर्व घरात मावत नव्हता,खिडकीच्या तावदानातून बाहेर पडणार धूर मला मी बसलेल्या पारावरून दिसु लागला होता... आतापर्यंत सांजचा देऊळातला हरिपाठ झाला अन् मंदिरातील माझ्या आज्याच्या वयातील म्हातारी लोकं आपापल्या घराला जाण्या वाटेला लागली होती.गावाला गावपण या शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडीलबाप  माणसांमुळेच होतं,जाता जाता दगडु आज्यानं मला हटकलं अन् प्रश्न केला,काय लका कधी आलासा शहरावरून...?  अन् त्याच्या सोबतच्या आज्याला माझी ओळख करून देऊ लागला... शामराव हा रामा आणाचा मधल्या लेकाचा धाकटा लेक हायसा,कालिजाला जिल्ह्याच्या शहराला अस्तूया,मी त्यांच्याकडे बघतच आदराने मान झुकवत नमस्कार केला अन् तब्येतीची विचारपूस केली,हाल हावाल विचारपू्स झाली अन् दगडु आज्याने मला येतू लका म्हणत काढता पाय घेतला... एरवी मी नदीच्या किनाऱ्यावर बसून कधीचाच न्याहाळत असलेल्या पाण्याला अन् अलवार शांत वाहणाऱ्या पाण्याला नजरेत सामावून घेत होतो... चेहऱ्यावर खोटे भाव आ...