धोंड्याईचा गाव... (भाग -३) धोंड्याईनं दिलेली पिठल्याची ताटली घेऊन मी घराच्या वाटेनं निघालो होतो,तिच्या डोळ्यातुन येणाऱ्या आसवांना सावरत तिनं घरात पडलेला भांड्यांचा गराडा बाहेर अंगणात आणला.रांजणातून जगाने पाणी घेऊन,चुलीतल्या राखेनं भांडे घासुन,ती हिसळत राहीली. तिच्या डोक्यात काय विचार चालू होता कळायला सीमा नव्हत्या,मनाशीच मनचे काहीतरी पुटपुटत तिचे भांडी घासणे चालू होते... भांडे घासण्याचा आवाज ऐकुन शेजारची धुरपता काकु धोंड्याईच्या अंगणात येऊन बसली,अंगणात मोकळं असल्या कारणाने लिंबाच्या झाडांच्या फांद्यांचा अंगणात वाऱ्याच्या सोसाट्याने आवाज येत होता,जो अंगाला बोचनारा अन् काटे आणणारा होता... धुरपता काकु नवार पातळ सावरत अंगणात बसली अन् धोंड्याईशी गप्पा झोडू लागली,धोंड्याईचां लेवुक गावाला जावून आठ दिवस सरले होते अन् आता तिला लेकाची आठवण येऊ लागली,हे तिच्या बोलण्यातून जाणवू लागलं होतं. सांच्याला माझ्याशी नातवाच्या विषयी बोलणं झाल्यापासून धोंड्याईच्या काळजात ध्धस्स झालं होतं... कधी एकदा तिचा लेवक घरी येतो असं तिला वाटत होतं,तिचं धुरपता काकुच्या बोलण्याकडे कम अन् गावच्या पल्याड असलेल...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!