#Canvas.... माझे कॅनव्हास वर भिजणे होत नाही,कदाचित त्याचा पाऊस अन् त्याचं भिजणे वेगळे असेल.म्हणुनच माझंही भिजणं होत नसेल,ज्याचं त्याचं कॅनव्हासवर स्वताला उतरवने वेगळं अन् सोबतीला त्याचं त्या चित्रात रंग भरण वेगळं असते.कोणाला त्या पेंटिंगच्या खूप आत जाऊन खोलात जाऊन सुरवात करायला आवडते तर कुणाला वरवर रंगाचे मुलामे देत देत तिला आवरायला आवडते.... तसेच काही जगण्याच्या या रोजच्या कसोटीच्या स्पर्धेत काही क्षण मागे सुटून जातात. कधीतरी त्यांचे सोहळे करायला आवडते तर मग कधीतरी वेळेनुसार ज्याप्रमाणे त्या गोष्टी मागे सुटल्या त्या प्रमाणे त्या सोडवून द्याव्या लागतात किंवा वाटतात,मुळात काय की वेळेनुसार सोयीचं होऊन आयुष्य जगायला लागते... जेव्हा आयुष्याचे फिरते चक्र एक वळणावर येऊन स्थिर होते,तिथेच कुठेतरी सावरायला जमावं कारण त्या वळणावर कधी आपण विसावा घेतला तर कदाचित ते आयुष्य हे कायमचे अस्थिर होऊन जाईल... कुठेतरी शब्दाचे न होता हल्ली स्वत:लाच सावरायचे असते पण नेमके इथेच चुकते,आपण शब्दांचे होऊन जातो अन् चार शब्द कुठे मनाला हायसे वाटले की त्या ठिकाणी आपण स्थिरावतो.पण हे न होता याच्या उलट आयु...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!