#Canvas....
माझे कॅनव्हास वर भिजणे होत नाही,कदाचित त्याचा पाऊस अन् त्याचं भिजणे वेगळे असेल.म्हणुनच माझंही भिजणं होत नसेल,ज्याचं त्याचं कॅनव्हासवर स्वताला उतरवने वेगळं अन् सोबतीला त्याचं त्या चित्रात रंग भरण वेगळं असते.कोणाला त्या पेंटिंगच्या खूप आत जाऊन खोलात जाऊन सुरवात करायला आवडते तर कुणाला वरवर रंगाचे मुलामे देत देत तिला आवरायला आवडते....
तसेच काही जगण्याच्या या रोजच्या कसोटीच्या स्पर्धेत काही क्षण मागे सुटून जातात. कधीतरी त्यांचे सोहळे करायला आवडते तर मग कधीतरी वेळेनुसार ज्याप्रमाणे त्या गोष्टी मागे सुटल्या त्या प्रमाणे त्या सोडवून द्याव्या लागतात किंवा वाटतात,मुळात काय की वेळेनुसार सोयीचं होऊन आयुष्य जगायला लागते...
जेव्हा आयुष्याचे फिरते चक्र एक वळणावर येऊन स्थिर होते,तिथेच कुठेतरी सावरायला जमावं कारण त्या वळणावर कधी आपण विसावा घेतला तर कदाचित ते आयुष्य हे कायमचे अस्थिर होऊन जाईल...
कुठेतरी शब्दाचे न होता हल्ली स्वत:लाच सावरायचे असते पण नेमके इथेच चुकते,आपण शब्दांचे होऊन जातो अन् चार शब्द कुठे मनाला हायसे वाटले की त्या ठिकाणी आपण स्थिरावतो.पण हे न होता याच्या उलट आयुष्यात एक टर्निंग पॉइंट समजून पुढे चालत जायला यावे...
कॅनव्हास वर सगळ्यांना व्यक्त होता येत नाही असे नाही,पण प्रत्येकाचं व्यक्त होणे वेगवेगळे आहे. कुणालातरी तो धूसर झालेला कलर फक्त ब्रशला नको म्हणून तो अस्वस्थ आकृतीत कॅनव्हासवर उधुळून मोकळे व्हायचे असते,यात तो चित्रकार असतो जो ज्याला याच्यात सुद्धा एक चित्र दिसते...
अन् एक तो असतो की,ज्याला ती फक्त एक वेडीवाकडी आकृती भासत असते....
हल्ली जेव्हा कॅनव्हासचा विषय निघतो ना आमच्यात तेव्हा तो फक्त चित्रापर्यंत मर्यादित न राहता,त्याला आयुष्याची जोड देऊन बघणे जास्तच होते.त्याचं आयुष्य म्हणजे कॅनव्हासला जोडून असणारे सर्व कलर्स सारखं भासणारं आहे पाण्यात जसे अन् ज्याच्यासोबत मिसळले की,त्याचे होऊन जायचे अन् पुन्हा त्या एकत्रित एका सुंदर चित्रात आपले दुसरे हरवलेले अस्तित्व शोधत त्याला एक ठराविक नाव देऊन ओळख निर्माण करायची हेच काय ते आयुष्य....
हा प्रवास इथवरचाच असतो पण पुढे त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व अन् चित्रकाराने दिलेलं त्याला एक नाव,ओळख हे खरेच वाखण्यासारखे आहे...याला आयुष्याशी जोड देऊन बघणे किती योग्य माहीत नाही,पण अलीकडे काळाच्या एका टप्प्यावर येऊन जेव्हा बघतो तेव्हा कॅनव्हास वरचे चित्र असो की आयुष्यातले अनेक अडथळे अन् त्यांना स्वीकारून शेवटी मिळालेलं स्थिर आयुष्य...याचच हे आगळेवेगळे स्थित्यंतर आहे ही जाणीव होते किंवा ते विचार जुळवून येऊन जातात....
शेवटी काय कॅनव्हास वर भिजणे असो की,आयुष्यात असलेल्या प्रश्नांमध्ये एकच आहे...
फक्त ज्याचं त्याच ते वेगळे आहे ...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा