#कोरोनासदृश्य काळ आणि नोकरीसाठी,नोकरी टिकविण्यासाठी,नोकरी मिळविण्यासाठी तरुणांची होत असलेली तडजोड....
सध्य परिस्थितीचा एकूण आढावा जेव्हा बघितला,तेव्हा मृत्यूपेक्षा सर्वाधिक मोठे वाटणारे संकट जर कोणते असेल तर ते असणार वाढणारी बेरोजगारी.बरेचजण म्हणतील की,इथे जीवांची परवा यांना नाही अन् बेरोजगारीची चिंता करताय पण मृत्यू अन् वास्तव परिस्थिती यांचा विचार केलातर आपण बेरोजगारी या विषयावर येऊनच थांबणार आहोत.
कारण पुढील काही काळ जरीही आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनजीवन सुरळीत करुत,परंतु बेरोजगारीमुळे पुढील काळात नैराश्यात जाणाऱ्या वर्गाची संख्या ही खूप मोठी अन् खबरदारी घेणारी असेल....
सद्या देशातील नव्हे तर जगातील सर्वच देशांची अवस्था ही आर्थिक बाबतीत खूप वाईट झालेली आहे.प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या नामांकित कंपन्या ज्या लाखो लोकांना एकावेळी रोजगार उपलब्ध करून देत असत त्यांनी समोर घोंगावत असलेलं संकट बघून कंपनीतील जवळ जवळ बराच मजूरवर्ग घरी बसवला आहे. यात उच्चपदावर असलेले कंपनीतील अधिकारी वर्ग सुद्धा आहेत,हळूहळू काम पूर्वपदावर येतही आहे परंतु हे सावरण्यासाठी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप मोठा असणारा आहे...
प्रायव्हेट सेक्टरची जी अवस्था आहे एकुण तशीच सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या वर्गाची सुद्धा अवस्था खूप वाईट झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूणच सर्व कार्यालय,संबंधित कार्यालय बंद पडलेली आहेत.ते कधी चालू होतील त्यांच्यावर असलेली मर्यादा,नियम,अटी सर्व पाळून कार्यालय चालुही झालेतरी नियोजित मोजके मनुष्यबळ हे सर्व लक्षात घेण्यासारखी बाब आहे...
वाढलेली बेरोजगारी अन् गेलेल्या नोकऱ्या यांमुळे देशातील आर्थिक परिस्थितीचा समतोल राखणे कुठे तरी अवघड असणार आहे.उच्च शिक्षणाच्या माध्यमातून दररोज उपलब्ध होणारा सुशिक्षित फ्रेशर विद्यार्थ्याचा वर्ग जो नुकताच शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेऊन नोकरीसाठी फिरू लागलेला आहे. त्यांचे काय ? पुढे प्रत्येक क्षेत्रात वाढणारी रोजची स्पर्धा,नवोदित विद्यार्थी आणि त्या आदीची असलेली सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी यांची अवस्था एकूण नैराश्यात जाणारी आहे.याच काळात आलेल्या संकटामुळे जॉब गमावून बसलेल्या नोकरदारांचाही एक वर्ग हे विचार करणारे असणार आहे सर्वच...
सध्या स्थितीत कुठल्याही व्यवसायाची व्यवसायिक अर्थव्यवस्था ही खूप बिकट परिस्थितीतून जात असतांना संबधित छोटे मोठे व्यवसायही डगमगाईला लागले आहेच.शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा आपला देश प्रगतीपथावर कायम आहे,परंतु समोर दिसणारे बेरोजगारीचे संकट हे या शतकातील सर्वाधिक मोठे संकट असल्याची जाणीवही ते करून देत आहे...
कारण देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे तरुण खांद्यावर अवलंबून असते,जेव्हा एक पूर्ण तरुण पिढीच बेरोजगार होताना दिसत असते त्यावेळी समोर पुढील कालावधीत दिसणारे संकट किती मोठे असेल याची जाणीव ते वेळोवेळी करून देत आहे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा