#गरजेच्या_काय_गोष्टी_करू_आम्ही...
थोडक्यात भागून जातं आमचं सर्वच,
उगाच रिकामी आश्या,खोटे स्वप्न
दाखवू नका...
जन्म दिला ज्याने त्यानेच चोच बनवली,
खर की खोटं माहीत नाही पण त्यालाच आमची
काळजी मग भागतं आमचं...
ढळून गेलेल्या सूर्याला उजेडाची काय किंमत
विचारावी,
इथे सर्वच अंधार आहे चंद्राच्या उजेडात सुद्धा
मग भागतं आमचं...
आमचे हात भाजले आहेत चुलीवर कष्टाची भाकर
भाजतांना,
नका दाखवू इथे दोन फोटोसाठी तांदूळ वाटप
होतांना इतक्यात भागतं आमचं...
अन्न,वस्त्र,निवारा सर्वच मूलभूत गरजा भेटल्याय
आम्हाला,सरकारचा पाच किलो तांदूळ फक्त आला आहे
मूलभूत गरजांमध्ये आम्हाला इतक्यात भागतं आमचं...
बाकी काय तुम्ही मोजून घ्या फासावर गेलेल्या माझ्या शेतकऱ्यांना,लिखित चेक हातात देऊन दिला की
इतक्यात भागतं आमचं...
उरलंय काय भागवून घेणेच आमच्या नशिबी
आयुष्यभर आता,
रेशकार्डवर नाव आहे बस इतक्यात भागवून घेतो
महिन्याचं आम्ही आता..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा