#तुझ्यासाठी_काय_लिहायचं ?
म्हणजे कोणी मला बळजबरी करत नाहीये की लिहायलाच हवंय...
पण कितीतरी बॅकस्पेस घेऊन हे लेखन करतोय,काय असतं तू तुझ्या मार्गाला निघून गेलास...
तुझ्यामागे तुझे घरचे,तुझा चाहता वर्ग,मित्र परिवार हे दुःखात बुडालेले आहेच.कुठेतरी माणुसकी जिवंत आहे अन् इतक्या वाईट परिस्थितीत हळहळ वाटणार नाही तो माणूस नाहीच,तेव्हा तुझ्यासाठी एक तुझा चाहता म्हणून थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न...
पुन्हा एकदा देव हा विषय इथेही येणारच आहे तेव्हा देवाने या दुःखातून सावरण्याची ताकद तुझ्या घरच्यांना,मित्रपरिवाराला,तुझ्या चाहत्या वर्गाला द्यावी हीच एक प्रार्थना....
तुला जे योग्य वाटले तू केलेस त्या मागे खूप काही कारणे असतील,उगाच काहीतरी शंका,अंदाज,मत,व्यक्त करून तुझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही,त्यापेक्षा मला नाही असेच म्हणेल....
यावेळी फक्त एकच म्हणेल तू घाई केलीस,हे वय नव्हते बस इतकंच....
आता हे वाक्य लिहायला पण नकोसे वाटते की मला चित्रपट,सिरियल बघायला आवडत नाही...
कारण ज्याप्रमाणे बॉलीवूड विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून कायमचे अलविदा करून जात आहे,त्यावेळी असे एकदाही झाले नाही की त्यांच्याबद्दल कुठेतरी काही बघितले नाही की काही ऐकले नाही.
इतके ते सर्वच मनावर राज्य करणारे होते,जगणे शिकवणारे होते...
तुझ्या बाबतीत सांगायचे तर तुझा आलेख हा कायम उंचीचा आहे,तुझं भविष्यासाठी असलेल struggle तुझा चाहता असल्याने खूप जवळून जाणून,बघून होतो...
माझ्या आयुष्यात जेव्हा मी कुठेतरी एका अश्या फेझला होतो की,जिथे कुणीतरी आपल्याला inspire करणारे हवे असते त्यावेळी तू होतास...
तुझं ते टायटनसाठी केलेले काम अन त्यातील तुझा तो बोलण्याचा अंदाज हे खूप काही देऊन गेलं,हे सर्व खूप भावणारे होते आजही कित्येकदा बघून झाले,पण आज कुठेतरी हे सर्व थांबलय....
तू प्रत्यक्षात नाहीस हे भास करून देते की,तुम्ही कलाकार लोकं फक्त रंगमंचावरच तुमची कलाकारी दाखवत नाहीतर आयुष्याच्या या खर्याखुर्या रंगमंच्यावर सुद्धा तुम्ही आपले खरे दुःख लपवत फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी खोटं हसू चेहऱ्यावर घेऊन जगत असतात....
यामुळेच,यामुळेच...
तुमचं जाणं जिव्हारी लागते यार,खरच कायम आठवणीत राहशील एक सच्चा कलाकार म्हणून तू बस इतकंच...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा