#गोष्टीत_कैफाच्या...
गोष्टीत कैफाच्या जीवन सारेच माझे
दुःखांना हल्ली सोबत करते,
सुखाचे डोहाळे आम्हीच ते नयनांतुनी
वाहणाऱ्या आसवांना लावून घेतले...!
हरवलेला दरवळ आहे तो उगाच त्याला
सुगंध म्हणून बसलो ठरवत,
फार अपेक्षा नाही अनपेक्षित करारच ते मग जीवनाशी
आम्ही करवुनी घेतले...!
झाली तडजोड कित्येकदा व्यक्त होणाऱ्या
ठरवुन जीवनाशी,
कुठे व्यक्त होण्यास जमले मला खोटे सौदे जीवनाशी
मग मी करवूनी घेतले...!
मृगजळ सुखाशी जुळवू पाहत राहीलो
निष्ठुर जीवनाला,
कैदैत मृगजळाच्या खर्या जीवनाशी मग मी
कैद माझे जीवन करवुनी घेतले....
द्विदा मनस्थितीत जगण्याच्या एक
मार्गाला शोधले,
कुठे सुटकाच ती झाली बाहुपाशात दुखाच्या
मग सुखास मी माघारी घेतले...
वाहणे जीवनाचे शब्दात उतरवत राहीलो,
कवितेलाच मग दुःखात
माझ्या मी सर्वस्वी सुख मानवुन घेतले...
जोडल्या ओळीत कित्येक भावना अनामिक सुखाच्या,
खर्याखुर्या भावनांशीच मग जगाने
आमच्या सोबती खेळवुन घेतले....
Written by,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा