मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नदी तिरावरची रात....

 अलीकडे एक विचार सहज मनात येऊन जातो की,वेळेनुसार सर्व काही बदलत गेले माणसे बदलले,सोबतीने राहणीमान,आवडीनिवडी सर्वच बदलले.वेळेनुसार होणारे बदल स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे असते पण काही गोष्टींच्या बाबतीत आपण वेळेनुसार बदलूनही त्या बाबतीत आपण आपल्या आवडीनिवडी जपवायला हव्या असे वेळोवेळी मला वाटते. अलीकडे शहरात कधीतरी नकळत फेरफटका मारतांना जुन्या इमारतींना न्याहाळत बघत राहणे,त्यातील झालेला बदल लक्षात घेऊन ती इमारत पूर्वी कशी होती अन् आता कशी,शहरातील जुनी कामे ज्यांच्या बाबतीत त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की ही कामे असेच राहतील पुढे बरीच वर्ष बिनकामाचे खंडहर बनुन.मग ते त्यांना कल्पनेत कथा रुपात सांगणे कसे असेल हे कल्पनेत उत्रवणे मला खूप आवडते...  साधारण बारा-तेरा वर्षापूर्वी साऱ्या शहरात मुक्तपणे फिरत राहणारा मी गेलं दशक शहरात फक्त गरजेच्या ठिकाणी कामानिमित्त फिरलो असेल.अलीकडे जेव्हा रिकामपणात शहराकडे बारकाईने किंवा बदल होणे,झालेला बदल या नजरेतून बघितलं जातं तेव्हा आश्चर्य वाटायला लागते... कौलाची ती मोडकळीस आलेली घरे उभ्या हयातीत परिस्थितीमूळे बदलणार नाही असे वाटायचे मग नकळत

Life...

Life... बुटांच्या टाचा झिजायच्या थांबून जाव्या इतकं सर्व सभोवताल अन् आयुष्य कोरड होऊन जावं इतकाही एकटेपणा आयुष्यात येऊ नये.अधुन मधुन लाल मातीत अनोळखी पण कधीतरी ओळखीच्या मार्गावर बुटांच्या या न झिजन्याला उमटवत चालत रहावं.या सर्वाला शेवट कधी माहीत नाही पण कितीही टाळले तरी इकडे यावच लागते,कधीतरी अन् कितीवेळा हे सर्व आपल्याला हवं आहे,उभं आयुष्य इथे द्यायचं पण त्याचं आपल्याला स्वीकारणं होत नाही अन् आपण येत राहतो कायम जोवर शक्य असेल तोवर एका त्या ठराविक काळापर्यंत... सरस,रेखीव असणे आजवर मनाला पटायचे पण जगण्याच्या भूमिती मधील गणिते जेव्हा समजू लागली तेव्हा इतकं सरस,रेखीव होवुन आयुष्य जगणं सोप्पं नाही हे उमगतं होत गेलं प्रकर्षानं ते स्वीकारणे जमणारे नाही हे तितकंच खरे मग त्यासाठी मार्ग बदलनेही सोयीचं आहे असे वाटते,परंतु मग ते सामान्य नसल्याचे ठरेल पण ते सामान्य नसलेलं तूर्तच योग्य वाटतं... "बुटांच्या टाचा झिजने,सरस,रेखीव आयुष्य असणे,जगण्याच्या भूमिती मधील गणिते हे सर्व काहीतरी वेगळचं भासत असावं पण हे सर्वश्रुत आहे but आपणही या सर्व भांनगडीत पडत नाही म्हणून हे वाकप्रचार ओळखीचे

देवळाच्या वाटा..!

#देवळाच्या_वाटा... सकाळ धरल्या पहाट होते,आवरासावरी करून पावले हनुमानाच्या आणि मग महादेवाच्या देऊळाकडं कुच करतात. मंदिराचा क्रम चुकतोय पण मनात भाव असले की देवाला सर्व चालतंय,कोण श्रेष्ठ अन् कोण कसा हा विचार करायला त्याच्याकडे वेळ नाहीच व मलाही त्या भानगडीत पडायचं नाही.ठरल्या वेळेला अनवाणी पावलांनी मी चालत राहतो,गावाची वेस ओलांडायला काही अंतर बाकी असले की मारुतीरायाचं देऊळ लागतं. फुलाला देवाच्या सानिध्यात रहायला आवडत की काय म्हणून नदीच्या थडीला लागुन बेसरमाच्या झाडालगत एक पांढर्या फुलांच्या रुईचे झाड आहे.दोन-चार फुलं दोन-चार पाने घेतली की देउळ गाठायला पावले लागतात,मारुतीरायाच्या चरणाशी पानफुल वाहुन,भोळ्याभाबड्या मनाच्या चार गोष्टी त्याला सांगायच्या देऊळाला चहूकडे तीन चकरा मारायच्या अन् सभामंडपात येऊन काही वेळ शांत बसून राहायचं... यांचसाठी होतो अट्टहास रोजच्याला देऊळात जायचं..! सभामंडपात बसल्यावर देवाच्या सानिध्यात छान वाटतं,लॉकडाऊन लागलं अन् लोकं देऊळाकडे येणं विसरली.माझ्यासारखा हौशी येत असतो अधूनमधून कधीतरी माझं ठरल्यावेळी येणं असते,देव बोलत नाय तो फक्त ऐकतो आपण सांगत राहायच

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..! भर दुपारच्या वेळेला मनाला जेव्हा जरासे हलके झाल्यासारखे वाटते... सकाळपासून ऑफिस मध्ये आले की दिवसभराच्या रूटींग मीटिंग,समोरच्या व्यक्तीला त्यात तोंड देणं,कामाचं नियोजन आखत दिलेलं टार्गेट पूर्ण करणे मग यासाठी चालू असलेली ती तडजोड,सर्व काही सोयीस्कर वाटते तोच आपल्या पेक्षा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कॉम्प्युटर स्क्रीनवर मेसेज आणि पुन्हा हेच सर्व शुन्यातून सुरू होणे... काम काम आणि फक्त काम..! इथे हजारदा आपल्याला स्वताला,स्वतःमध्ये असलेल्या पेशन्सना साध्य करून दाखवायचं असते,या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून रहायचं असते,नेहमीच आपले ते 100% द्यायचे असते ज्यामुळे आपण या उंचीवर पोहचलेलो असतो. कारण आपल्याला पर्याय म्हणून त्यांच्यासाठी 100 व्यक्ती आपल्या मागे सरळ रेषेत उभे असतात म्हणून त्यांच्यापेक्षा आपले काम कसे योग्य हे दाखवणे वेळोवेळी येतच असतं... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी जितक्या सहज उपलब्ध झाल्या तितक्या  त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आपला अभ्यास,आपले कौशल्य आणि समोरच्या कंपनीला आपण कसं present करतोय यावर आपल्या जॉबचे कायम राहणे,प्रोमोशन होणे

अडगळीच्या खोलीतील जुने दस्तावेज...

अडगळीच्या खोलीतील जुने दस्तावेज..! होर्डिंग’ हा प्रकार आधुनिक मानसशास्त्रात ‘विकृती’ मानतात. आपल्याला हे विधान पटायला मुळीच वेळ लागणार नाही. विशेषतः रस्त्यांवरील  मोठमोठ्या फ्लेक्सबोर्डांची होर्डिंग रोजच्या रोज पाहताना या विकृतीचा प्रसार केवढा झालेला  आहे, याची आपल्याला कल्पना येते. दादा, बाबा, काका, अण्णा, बाप्पू, पप्पू, साहेब या साऱ्यांचे वाढदिवस तिथं साजरे केले जातात, त्यानिमित्त त्यांच्या झळकणाऱ्या सुहास्यास्पद  छब्या आणि त्यांना शुभेच्छा देणारे सुहास्यास्पद ‘शुभेच्छूक’ होर्डिंगांवर झळकत असतात. पूर्वी फक्त होर्डिंगावर राजकारणी पुढारी असायचे. आता राजकारण- प्रवेशोच्छूक असे त्यांचे सुपुत्र, सुना, पोरंटोरं आणि पाळण्यातील नातवंडं यांचे जाहीरपणे (आणि चुकीच्या मराठीत) रस्त्यांवर आणि चौकाचौकांत वाढदिवस साजरे केले जातात. ही भलीमोठ्ठी ‘होर्डिंग’ ही ‘विकृती’ आहे, हे (त्या त्या बोर्डावरील लोक सोडल्यास) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भारतीयालाच ठाऊक असतं. त्यासाठी आधुनिक मानसशास्त्राची साक्ष काढण्याची काहीच आवश्यकता नाही. आधुनिक मानसशास्त्राला ‘होर्डिंग’ म्हणजे अशा रस्त्यावरच्या भल्य

विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा.

विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा..! रणरणत्याउन्हात पावले फुफाट्याच्या मातडीने माखलेल्या रस्त्याने गरम-गरम मातडीत पायाच्या पंज्याने मातड उधळीत मी चाललो होतो,नव्हता कुठला त्रास चेहऱ्यावर का नव्हता सुख दुःखाचा विचार,मनात येणाऱ्या प्रत्येक सेकंदाला फक्त उत्सव करून जगत होतो  एव्हढ्या उन्हातही काय तो उत्सव असावा या फुफाट्यात चालण्यात हे ही उमगणारे नव्हते... पण प्रॅक्टिकली जीवन जगायचं म्हंटले की सुखाची,सुखात जीवन जगण्याची गणिते खुप उंचीची असतात,हे खुप थोडक्यात उमगल होते.यामुळेच की काय या क्षणिक सुखात सुख भासवत समाधानी जीवन जगण्याच कोडं उमग्ल्यागत,शहाणं होवुन जगायचं ठरवलं होत. तेव्हा हेच सोयीचं वाटायचं मग काही क्षण का होईना मानसिक समाधान त्या काही क्षणात खुप काही भेटायचं हे ही खरे होत... पण,पण... प्रॅक्टिकली म्हंटले की मग तिथे कुठल्याही लिमिटेशन्स नसतात सर्व उंचीच भासत असते,दिसत असते... मग हे सर्व काहीही नको वाटतं भटकंती एके भटकंती हेच काय खरं हे मनाला पटते, मग सुरू होतो खेळ भटकंतीचा,भटकने कुठं नवीन ठिकाणी नसते ज्या ठिकाणाला हजारवेळा बघुन झालंय पण तिथं जावून एक वेगळं मनाला समाधान,हायस

Egyptian story hour...

The  Osiris myth  is the most elaborate and influential story in  ancient Egyptian mythology . It concerns the murder of the  god Osiris , a primeval  king of Egypt , and its consequences. Osiris's murderer, his brother  Set , usurps his throne. Meanwhile, Osiris's wife  Isis  restores her husband's body, allowing him to posthumously conceive their son,  Horus . The remainder of the story focuses on Horus, the product of the union of Isis and Osiris, who is at first a vulnerable child protected by his mother and then becomes Set's rival for the throne. Their often violent conflict ends with Horus's triumph, which restores  Maat  (cosmic and social order) to Egypt after Set's unrighteous reign and completes the process of Osiris's resurrection. From right to left: Isis, her husband Osiris, and their son Horus, the protagonists of the Osiris myth, in a  Twenty-second Dynasty  statuette The myth, with its complex symbolism, is integral to ancient Egyptian conce

Different ways...

Different ways... कित्येक दिवस झाले हवाहवासा वाटणारा कोरड्या शुष्क वाऱ्यांचा स्पर्श अंगाला झाला नाहीये डोळ्यांनाही तो अनुभवायला,बघायला भेटला नाहीये.मुळात निसर्ग सर्वदूर सुंदर हिरवाईने नटलेला आहे,थंडीची चाहूल रोज दिवसेंदिवस आधिक स्पष्टपणे जाणवते आहे. हे सर्व सुख स्पर्शात अनुभवायचं सोडून मी कोरड्या शुष्क वाऱ्याचा विचार करत बसलोय असे का..? तर आमचं हे असच काहीतरी वेगळे चालू असते हा कोरडा शुष्क वारा,वाळलेली झाडांची पाने,फुले,वाळलेले गवत,सोसाट्याचा सुटलेला तो गरम वारा भरउन्हात नजरेला फक्त दूरवर दिसणाऱ्या वाऱ्याच्या तुटत्या झळया जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळलेली उंच उंच सागाची,निलगिरीची,आवळ्याची,चंदनाची,बेहडा,हिरडा यांची झाडे बघायला,त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी मला खूप आवडते.मुळात ही झाडे हिरवाईच्या ऋतुपेक्षा पानगळतीच्या या दिवसात मला बघायला खूप आवडतात त्यांच सौदर्य,निसर्गानं त्यांना दिलेलं त्यांचं वेगळपणही या दिवसात आधीकच खुलून दिसत असते फक्त ते आपल्या नजरेस न्याहाळता,अनुभवता यायला हवं... वाळलेली,अंगाने पूर्णपणे झुकलेली बोडखी झालेली बाभूळ,गुलमोहराच्या वाळलेल्या फुलांचा किंवा नवीन

Written by...

Written   by... लेखन म्हंटले की लिखाणाला निमित्त हवं असते,गेले काही दिवस काही विषय नसल्यामुळे असो किंवा इतर काही कारणास्तव लेखन थांबवलं आहे.कधीतरी अधुन मधुन व्यक्त व्हावेसे वाटले की काहीतरी चार-दोन ओळींचा लेख लिहायला घेत असतो इतकंच,लवकरच पुन्हा एकदा दीर्घ लिहायला सुरुवात करेल तोवर... २०२०ने खूप काही शिकवलं वयाच्या चालू तेविसाव्या वर्षापर्यंत सर्वाधिक  शिकवणारे हे वर्ष ठरले आहे,पुढेही आयुष्यभर हे अनुभवलेले सर्व क्षण जगण्याच्या या रोजच्या शर्यतीत मार्ग दाखवणारे ठरणार आहे. खुप काही अनुभव या वर्षाने दिले किंवा अजूनही हे सर्व अनुभवत आहे कारण फार काही बदल पुढील काही दिवस होणार नाहीये माझ्या बाबतीत माझ्या आयुष्यात तरी हे सर्व काही काळ असेच स्थिर असणार आहे... असो माझं वाचायला इथे कुणाला वेळ आहे सो इतकंच,लिहल कधीतरी नक्कीच... फार काही विचार करून लिहायला घेतलं की अस्वस्थपणाच्या लहरी मनावर स्वार होतात आणि लिहायला घेतलेलं नकोसे होते.त्यामुळे काही दिवस नकोच असे वाटत राहतं पण काही क्षण अस्वस्थ करून जातात अन् मग मनाच्या विरुद्ध जावून लिहायला घेतले जाते... काय लिहतोय..? कुणासाठी..? कश्याला