Life...
बुटांच्या टाचा झिजायच्या थांबून जाव्या इतकं सर्व सभोवताल अन् आयुष्य कोरड होऊन जावं इतकाही एकटेपणा आयुष्यात येऊ नये.अधुन मधुन लाल मातीत अनोळखी पण कधीतरी ओळखीच्या मार्गावर बुटांच्या या न झिजन्याला उमटवत चालत रहावं.या सर्वाला शेवट कधी माहीत नाही पण कितीही टाळले तरी इकडे यावच लागते,कधीतरी अन् कितीवेळा हे सर्व आपल्याला हवं आहे,उभं आयुष्य इथे द्यायचं पण त्याचं आपल्याला स्वीकारणं होत नाही अन् आपण येत राहतो कायम जोवर शक्य असेल तोवर एका त्या ठराविक काळापर्यंत...
सरस,रेखीव असणे आजवर मनाला पटायचे पण जगण्याच्या भूमिती मधील गणिते जेव्हा समजू लागली तेव्हा इतकं सरस,रेखीव होवुन आयुष्य जगणं सोप्पं नाही हे उमगतं होत गेलं प्रकर्षानं ते स्वीकारणे जमणारे नाही हे तितकंच खरे मग त्यासाठी मार्ग बदलनेही सोयीचं आहे असे वाटते,परंतु मग ते सामान्य नसल्याचे ठरेल पण ते सामान्य नसलेलं तूर्तच योग्य वाटतं...
"बुटांच्या टाचा झिजने,सरस,रेखीव आयुष्य असणे,जगण्याच्या भूमिती मधील गणिते हे सर्व काहीतरी वेगळचं भासत असावं पण हे सर्वश्रुत आहे but आपणही या सर्व भांनगडीत पडत नाही म्हणून हे वाकप्रचार ओळखीचे नाही उल्लेखातील नाही..."
Typing...
Written by,
©®Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा