कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!
भर दुपारच्या वेळेला मनाला जेव्हा जरासे हलके झाल्यासारखे वाटते...
सकाळपासून ऑफिस मध्ये आले की दिवसभराच्या रूटींग मीटिंग,समोरच्या व्यक्तीला त्यात तोंड देणं,कामाचं नियोजन आखत दिलेलं टार्गेट पूर्ण करणे मग यासाठी चालू असलेली ती तडजोड,सर्व काही सोयीस्कर वाटते तोच आपल्या पेक्षा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कॉम्प्युटर स्क्रीनवर मेसेज आणि पुन्हा हेच सर्व शुन्यातून सुरू होणे...
काम काम आणि फक्त काम..!
इथे हजारदा आपल्याला स्वताला,स्वतःमध्ये असलेल्या पेशन्सना साध्य करून दाखवायचं असते,या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून रहायचं असते,नेहमीच आपले ते 100% द्यायचे असते ज्यामुळे आपण या उंचीवर पोहचलेलो असतो.
कारण आपल्याला पर्याय म्हणून त्यांच्यासाठी 100 व्यक्ती आपल्या मागे सरळ रेषेत उभे असतात म्हणून त्यांच्यापेक्षा आपले काम कसे योग्य हे दाखवणे वेळोवेळी येतच असतं...
कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी जितक्या सहज उपलब्ध झाल्या तितक्या त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आपला अभ्यास,आपले कौशल्य आणि समोरच्या कंपनीला आपण कसं present करतोय यावर आपल्या जॉबचे कायम राहणे,प्रोमोशन होणे अवलंबुन आहे,असते...अलीकडे जेव्हा विचार करतो तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात वाढलेल्या नोकरीच्या संधी, आकर्षक पगार,फॅसिलिटी यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राकडे तरुणांचा कल झुकता दिसत आहे.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता काही अंशी भविष्यात तरुण पिढीची चिंता वाटते...
या सर्व प्रोसेसमध्ये मुळातच काही चुकीचं नाहीये,जो आपसातच हुशार आहे तो या सर्व परिस्थितीत आणि या competition असलेल्या जाळ्यात तग धरून,टिकुन त्याची स्वतःची एक उंचीची जागा कायम ठेवणार आहे जी अढळ असणार आहे...
कॉर्पोरेट क्षेत्र म्हंटले की,Joining होतांनी तुम्हाला काय येतं..?
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्याबद्दल तुमचं शिक्षण अन् याही पुढे जाऊन विचार केला जातो तो तुमचा त्या फील्डमध्ये असलेला अनुभव,तुम्ही स्वतःला तुम्ही कसे Present करतात या बाबींचा...
आता हे इथे लिहायची गरज काय..?
हे तर कुणीही माध्यमिक शाळेत शिकणारे मुल आपल्याला सांगेल,पण प्रत्यक्षात 30% व्यक्तीही कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब करण्यासाठी जाताना यावरील सर्व बाबींचा विचार करत नाही आणि मग पुढे त्रास होतो.
सांगायचे हेच की या क्षेत्रात निभाव त्याचाच लागणार,सातत्य तोच कायम टिकवून ठेवणार जो या सर्व गोष्टींचा अभ्यास अन् त्यानुसार तयारी करेल.कारण इथे Second Options नाहीत,असेलही तरी त्याचा सारासार परिणाम आपल्या भविष्यावर करीयरच्या बाबतीत होत असतो.
मग पुढेही खुप अवाहने असतातच पण मग ते सातत्य आले की सवयीचं होत जाते आणि आपण ते स्वीकारायला लागतो आणि आपण कॉर्पोरेट क्षेत्राचा एक हिस्सा बनुन जातो....
Written by,
Bharat.L.Sonawane.
MBA-(PRODUCTION AND OPERATIONS).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा