मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा.


विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा..!

रणरणत्याउन्हात पावले फुफाट्याच्या मातडीने माखलेल्या रस्त्याने गरम-गरम मातडीत पायाच्या पंज्याने मातड उधळीत मी चाललो होतो,नव्हता कुठला त्रास चेहऱ्यावर का नव्हता सुख दुःखाचा विचार,मनात येणाऱ्या प्रत्येक सेकंदाला फक्त उत्सव करून जगत होतो  एव्हढ्या उन्हातही काय तो उत्सव असावा या फुफाट्यात चालण्यात हे ही उमगणारे नव्हते...

पण प्रॅक्टिकली जीवन जगायचं म्हंटले की सुखाची,सुखात जीवन जगण्याची गणिते खुप उंचीची असतात,हे खुप थोडक्यात उमगल होते.यामुळेच की काय या क्षणिक सुखात सुख भासवत समाधानी जीवन जगण्याच कोडं उमग्ल्यागत,शहाणं होवुन जगायचं ठरवलं होत.

तेव्हा हेच सोयीचं वाटायचं मग काही क्षण का होईना मानसिक समाधान त्या काही क्षणात खुप काही भेटायचं हे ही खरे होत...


पण,पण...

प्रॅक्टिकली म्हंटले की मग तिथे कुठल्याही लिमिटेशन्स नसतात सर्व उंचीच भासत असते,दिसत असते...

मग हे सर्व काहीही नको वाटतं भटकंती एके भटकंती हेच काय खरं हे मनाला पटते,

मग सुरू होतो खेळ भटकंतीचा,भटकने कुठं नवीन ठिकाणी नसते ज्या ठिकाणाला हजारवेळा बघुन झालंय पण तिथं जावून एक वेगळं मनाला समाधान,हायसं वाटायला लागते तिकडे मन शारिराला अनवाणी पावलांनी घेऊन भटकायला लागते...


किती,कितीवेळ पावले त्या वाटेनं अनवाणी चालत राहतात.मग पुढे कुठे एका वळणाला येणारं ते निलगिरीच्या झाडांचं वन उंच-उंच निलगिरीची सरळसोट वाढलेली झाडं,जिथवर नजर पुरेल तिथवर बघत राहायचं,खाली असलेल्या हिरव्या गवतात पानझडीच्या दिवसात निलगिरीच्या पानाला येणाऱ्या सुगंधाला अनुभवत शरीर जमिनीवर झोकुन द्यायचं... 

कितीवेळ हवाहवासा वाटणारा गार वारा,सोबतीला असलेला तो सुगंध अजुन काय हवंय खूपच एकटं भासायला लागल की निलगिरीच्या पिवळ्या छोट्या-छोट्या गिल्लासाला जमा करत राहायचं अन् त्याच्या राशीत स्वताला शोधायचं.

छोट्या गोष्टीत समाधान बघायला शिकले की हे सर्व अनुभवता येतं...


पुढे जावून बोडक्या बाभळीवर प्रेम करायचं,तिच्याशी सुख दुःखाच्या दोन गोष्टी करायच्या...

सकाळ-सकाळी तिनं केलेल्या पिवळ्या फुलांच्या मुक्त उधाळण्याच्या साक्षीला म्हणुन हातात फुलांची ओंजळ घेऊन त्या फुलांना हृदयाशी घ्यायचं बोलू बघतात ती आपल्याशी,अनुभवायला जमलं की आपुलकीनं आपण या झाडांना आपलेसे करत असतो...

ही बोडखी बाभुळ अशीच कायम सोबत भासते कधी आईवर आजवर कविता करू शकलो नाही पण तिच्यावर कविता केलीय,कंबरेतून वाकलेली हे बोडखी बाभूळ जगण्याच्या या स्पर्धेत तग धरून जगायला लढायला शिकवत असते.कायम म्हणून असा अधून-मधून तिचा सहवास हवहवासा वाटतो अनेकदा वाटतं तिने भेटायला यावं दरवेळी मीच का..?


पण हे तिच्या सोयीचं नाही मग कधीतरी पावले इकडेही वळतात...

 

पुढं भटकत-भटकत अनवाणी पायांनी पाण्याच्या उखळापाशी येऊन थांबावं,गुडघ्यावर बसून डायरेक्ट उखळ्यात तोंड टाकून गार,नितळ पाणी पिण्याचं सुख आताच्या क्वचित माणसांच्या नशिबाला अनुभवायला येतं ते माझ्या नशिबाला आजवर आहे म्हणून आनंद होतो.नाहीतर पाण्याचे हे स्त्रोत केव्हाच जगण्याच्या या कसोटीत मागे पडले असते,त्यांची जागा आधुनिक फिल्टर नावाच्या उपकरणाने घेतली तो ही भारी भासतो पण उखळाचे उखळणारे पाणी पिण्याचे सुख काही औरच...

पाणी पिलं की कितीवेळ गरम-गरम मातीत चालून लाले लाल झालेले अनवाणी पाय उखळात बुडून थंडगार पाण्याला अनुभवावं आणि चालतं व्हावं.टेकडीवरच्या लक्ष्मी आईचं देऊळ तुटत्या झळाईतही तुटक-तुटक दिसत जे अनोखं आहे नाय...

अन् सर्व गावातल्या लोकांना सुखाच छप्पर देऊन माऊली पडत्या उन्हात टेकडीच्या आश्रयाला येऊन बसल,.

अगाद आहे गं माऊली हे सर्व...


धरण पाळीवरून फिरायच म्हंटले की,एकांगाला झोंबणारे गरम वारे अन्  एकांगाला थंड पाण्याच्या लहरीतून अनुभवायला येणारा गारवा,उन्हाच्या या दिवसात गारवा अनुभवायला येतो.आटलेल्या धरणात फक्त दूर दूर आटलेला गाळही दिसू लागतो दूरवर पाळेवर कुठेतरी पाण्याचं बारमाही झिरपनं चालू असते तितकेच काय ते नजरेत भरणारे सुख,मग सटकत्त्या शेवाळ्यात जीवाला सांभाळत चालणे हो मग कधीतरी अधून मधुन नळ्यात असलेलं खेकुड तेव्हढं नजर चोरून बिळातून आपल्याला बघत असते,ती दिसले की भारी वाटतं...


भारी आहे ही दुनिया,अनुभवता यायला हवं फक्त अन् तितकंच तिला आपलसं करूनही घेता यायला हवं,मग सुख काय ते उमगते....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...