Written by...
लेखन म्हंटले की लिखाणाला निमित्त हवं असते,गेले काही दिवस काही विषय नसल्यामुळे असो किंवा इतर काही कारणास्तव लेखन थांबवलं आहे.कधीतरी अधुन मधुन व्यक्त व्हावेसे वाटले की काहीतरी चार-दोन ओळींचा लेख लिहायला घेत असतो इतकंच,लवकरच पुन्हा एकदा दीर्घ लिहायला सुरुवात करेल तोवर...
२०२०ने खूप काही शिकवलं वयाच्या चालू तेविसाव्या वर्षापर्यंत सर्वाधिक शिकवणारे हे वर्ष ठरले आहे,पुढेही आयुष्यभर हे अनुभवलेले सर्व क्षण जगण्याच्या या रोजच्या शर्यतीत मार्ग दाखवणारे ठरणार आहे.
खुप काही अनुभव या वर्षाने दिले किंवा अजूनही हे सर्व अनुभवत आहे कारण फार काही बदल पुढील काही दिवस होणार नाहीये माझ्या बाबतीत माझ्या आयुष्यात तरी हे सर्व काही काळ असेच स्थिर असणार आहे...
असो माझं वाचायला इथे कुणाला वेळ आहे सो इतकंच,लिहल कधीतरी नक्कीच...
फार काही विचार करून लिहायला घेतलं की अस्वस्थपणाच्या लहरी मनावर स्वार होतात आणि लिहायला घेतलेलं नकोसे होते.त्यामुळे काही दिवस नकोच असे वाटत राहतं पण काही क्षण अस्वस्थ करून जातात अन् मग मनाच्या विरुद्ध जावून लिहायला घेतले जाते...
काय लिहतोय..? कुणासाठी..? कश्याला..? ही प्रश्न नाही पडत मग अन् जरी पडलीच तर मी टाळतो मनाशीच मनाची समजूत काढत त्यांना उत्तरे द्यायला...
Typing...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा