Different ways...
कित्येक दिवस झाले हवाहवासा वाटणारा कोरड्या शुष्क वाऱ्यांचा स्पर्श अंगाला झाला नाहीये डोळ्यांनाही तो अनुभवायला,बघायला भेटला नाहीये.मुळात निसर्ग सर्वदूर सुंदर हिरवाईने नटलेला आहे,थंडीची चाहूल रोज दिवसेंदिवस आधिक स्पष्टपणे जाणवते आहे.
हे सर्व सुख स्पर्शात अनुभवायचं सोडून मी कोरड्या शुष्क वाऱ्याचा विचार करत बसलोय असे का..? तर आमचं हे असच काहीतरी वेगळे चालू असते हा कोरडा शुष्क वारा,वाळलेली झाडांची पाने,फुले,वाळलेले गवत,सोसाट्याचा सुटलेला तो गरम वारा भरउन्हात नजरेला फक्त दूरवर दिसणाऱ्या वाऱ्याच्या तुटत्या झळया जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळलेली उंच उंच सागाची,निलगिरीची,आवळ्याची,चंदनाची,बेहडा,हिरडा यांची झाडे बघायला,त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी मला खूप आवडते.मुळात ही झाडे हिरवाईच्या ऋतुपेक्षा पानगळतीच्या या दिवसात मला बघायला खूप आवडतात त्यांच सौदर्य,निसर्गानं त्यांना दिलेलं त्यांचं वेगळपणही या दिवसात आधीकच खुलून दिसत असते फक्त ते आपल्या नजरेस न्याहाळता,अनुभवता यायला हवं...
वाळलेली,अंगाने पूर्णपणे झुकलेली बोडखी झालेली बाभूळ,गुलमोहराच्या वाळलेल्या फुलांचा किंवा नवीन पालवी फुटणाऱ्या फुलांचा या कोरड्या वाऱ्यात येणारा सुगंध,आसमंतात झळाया तुटणाऱ्या गरम वाऱ्यात उडणारा पालापाचोळा अंगावर घेत कित्येक रानात वणवण करत भटकत राहणं,नाल्या खोल्यात जावून आटलेल्या खोऱ्यात दिसणारी पाण्याची शेवाळ,उंचीवर दिसणारी पाणी कुठवर चढले याची चिन्ह बघत अंदाज घेत मनाची एक वेगळीच अवस्था निर्माण करून जंगलाबद्दल आधिकच समजुन घेत राहणं...
यात त्याच्या माझ्यात कुणी नसते तो दाखवत राहतो मी कसा आहे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे समजुन घेत ते डोक्यात फिट्ट करत चालायचं बस इतकंच...
खरच माणसाच्या सहवासापेक्षा मला निसर्गाचा हा सहवास कधीही खुप जवळचा वाटला आहे,नाही वाटत कधीच इथे एकटेपणाची जाणीव की काही अपूर्ण असल्याची मनाला हुरहूर की कुणाचं दडपण.या निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या सोयीनुसार आपल्याला जगायला जमलं की सर्व होते,म्हणुनच की काय कोरड्या शुष्क वाऱ्यातला हा निसर्ग अनुभवायला इतका आवडतो...
नशिबाने हा सहवास मनाला वाटल तेव्हा अनुभवायला भेटत असतो,त्यामुळे कधीतरी जगण्याचे फासे अधिकच चुकीचे पडायला लागले की कधीतरी हे सर्व अनुभवत असतो.हे सर्व खुप सोयीचं आहे,फार काही विशेष नियम नाही हे अनुभवण्यासाठी पण परतीची जाणिव अन् ध्येय स्वस्त बसू देत नाही,कितीही केलेतरी 'स्व' या परिघात जगायला खुप काही गमवावे लागते नाहीतर खुप काही कमवावे दोन्ही बाबतीत अजून तरी आपण परिपूर्ण नाही म्हणून अधून मधून हा सहवास होतो इतकंच...
एवढे मात्र नक्की की,कधीतरी यात पूर्णत्व येईल अन् हे सर्व कायमचं कृतीत होवुन जाईल कधीही न बदलण्यासाठी,तोवर हे अधून मधून भटकणे सोबतीला असणार वेळीच मनाचे डोहाळे पूर्ण करण्यासाठीचा हा सहवास हे कोरडे शुष्क वारे अनुभवत राहणं अजून खूप काही....
Written by
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा