मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्न महाराष्ट्र पोलिस होण्याचं..! 💙

स्वप्न महाराष्ट्र पोलिस होण्याचं..! 💙 मित्रांनो आणि मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी इतके दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे  "महाराष्ट्र पोलिस दलात" होणारी पोलिस भरती जी की लवकरच होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढील दोन महिन्यांनी  क्रमवारी ७२०० पदांची पोलिस भरती करण्याचे योजिले आहे.पुढील काळात नगरपालिका निवडणुका व इतर कारणे बघता या भरतीसाठी उशीर होवू शकतो किंवा गडचिरोली जिल्ह्यात ज्या पद्धतीने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू झाली त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा लवकरच पोलिस भरती होवू शकते. त्यामुळे आपणा सर्व मित्र-मैत्रिणींना पूर्णपणे जोरदार पोलिस भरतीच्या तयारीला लागायचे आहे..! लेखी परीक्षा पहिले होईल की मैदानी चाचणी पहिले होईल हे अजुन निश्चित नाही.परंतु आपण दोन्हींसाठी आता जोमाने तयारीला लागायचं आहे ;या दोन्हीपैकी काहीही असो आपण भरतीसाठी पूर्णपणे तयार रहायचं आहे..! हा लेख लिहण्यामागचे कारण एकच आहे की शहरातील व खेडे गावातील तरुणांना या लेखातून प्रेरणा मिळावी आणि काही महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी विचार करावा.

Love Kokan..! ❤️💙❤️

Love Kokan..! ❤️💙❤️ मान्सून सरावला आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येऊ लागला आहे.मराठवाड्यात आमच्या शहराला गेले दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्याने झोडपून काढलं आहे.आता वेध लागले आहे ते मान्सून महाराष्ट्रात येण्याचे अन् धो-धो पावसाचे..! तर मित्रांनो पावसाळा तोंडावर आला आहे अन् दोन दिवसांच्या सोसाट्याच्या वाऱ्याने आता भटकंती करण्यासाठी मन आतुर झालं आहे.लवकरच बॅग पॅक होतील अन् पाऊस पडला की सुरू होईल भटकंती कोकणातील सागर किनाऱ्यावर,कोकण डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या छोट्या छोट्या खेड्यागावात,पाडे,वस्त्यां,टेकड्यांवर..! जाणून घेतले जाईल जवळून कोकणातील हे जनजीवन. "कोकण म्हणजेच आपला स्वर्ग..!" कोकण म्हणजे धो-धो कोसळणारा पाऊस,चहूकडे हिरवाईने नटलेला परिसर,असंख्य समुद्र किनारे आणि कोकणची खरी ओळख म्हणजे कोकणचा फणसातील गऱ्यासारखा,शहाळ्यातील मऊ मऊ मलई सारखा दर्यादिल कोकणी माणूस..! कोकण का बघावं तर निसर्गानं कोकणातील माणसाला खूप काही भरभरून दिलं अन् कोकणातील माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात राहून ते सर्व कोकणी निसर्गसौंदर्य जपवलं..! या महत्त्वाच्

पुस्तकाच्या कथा..!

पु स्तकाच्या कथा..! कितीवेळ झाला खिडकीत बसून आहे.सकाळ दुपारच्या वेळेकडे ढळायला लागली की खिडकीत बसून बाहेरचं जग न्याहाळत रहायला आवडतं.अनोळखी माणसांत ओळखीची माणसं दिसू लागतात,घरात विस्कटलेली सर्वच पुस्तकं कित्येक दिवस तशीच पडून आहे.त्यांना आवरायला घ्यावं तर दिवस मावळतीला जातो..! पुस्तकांच्या सहवासात जगणं आहे,त्यामुळं कॉटवर एखाद-दोन पुस्तकं अर्धवट वाचून गेली कित्येक दिवस सोडून दिली,जी तशीच पडून आहे.एक ६७ तर एक १८३ पान नंबर वर वाचायचं चालू आहे..! काही लेखक मला भयंकर नकोसे वाटतात.मुळात त्यांनी पुस्तके फक्त प्रसिद्धीसाठी काढले की फक्त पैसा आहे अन् तो मार्गी लागेल म्हणून काढली.हे कोडं मला गेली काही दिवस सुटत नाहीये..! काही महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट म्हणून एका विदेशातील मित्राने मला एक मराठी पुस्तक पाठवलं.त्याला माहित आहे मला इंग्रजी भाषेत काहीही एक कळत नाही म्हणून त्यानं मला ते मराठी पुस्तक पाठवलं असावं..! मला वाटलं होतं तो इंग्रजी पुस्तक पाठवेल अन् मी तोडकंमोडकं का होईना समजून घेत ते वाचेल.काही दोन-चार दिवसांपूर्वी स्पष्टच झाले की मी फक्त अनुवाद

शहर आणि माणसे..!

शहर आणि माणसे..! आयुष्याची गणितं जुळवत असतांना जेव्हा कुठेच काही जुळत नसेल तेव्हा अशी वेळ साधून अनोळखी शहरात भटकंती करत आपण आपली वेळ साधायची..! अलीकडे आयुष्याला घेऊन फार काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीये.त्यामुळं अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये,त्या बघण्यामध्ये आनंद मिळतो. खरंतर आयुष्याला घेऊन फार विचार केला की आयुष्यात आयुष्याला घेऊन न सुटणारी जी गणितं आहे ती आयुष्यभर नको सुटायला हवी आहे मला...! कारण जोवर आयुष्यात फरफट आहे तोवर आयुष्यात सुख आहे,नंतर खूप सहज मिळणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठलं सोयरसुतक नसते..! भर मध्यरात्री असं शांत झालेलं,सिग्नलच्या तालावर ठेका धरून नाचणारं शहर यावेळी खायला उठते,तरीही ते हवेहवेसे वाटते.शांत झालेलं शहर,रस्त्याच्या एकांगाला निवारा शोधून गोधडीत पडलेलं कुणीतरी,रात्रीच्या वेळ कामाला म्हणून जाणारे कुणीतरी,इतक्या रात्रीही रस्त्यावर भुंकणारी कुत्रे,शहराच्या एखाद दुसऱ्या भागाला फिरणारी माझ्यासारखी भटकी माणसे..! या सगळ्यांच्यामुळे काळोखाच्या राती शहर अजूनच भयाण,उद्वस्थ झालेलं वाटत असतं.त्याच माणसांमुळे दिवसभर शहर त्याची कथा लोकांना सांगत असते,काळोखाच्

आयुष्याची फरफट..!

आयुष्याची फरफट..! माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं,तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं.त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो. अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते.मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो,माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं..! माणसं एकटे कधीच नसतात,जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन साऱ्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात.त्यामुळं ती एकटी कधीच नसतात जरीही अवस्थेने ते एकटे दिसत असले..! हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते,काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमत करत आहे पण मला कोणी बघितले नाही ही खूप दिवसांची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते..! सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कित्येक प्रश्न करून होतात.काय हवं, कश्याशाठी,महत्

अनोळखी शहर..!

अनोळखी शहर..! माणसं जोडायला हवी,तुझ्या लिखाणाला दुःखाची किनार असल्याचं नेहमीच तुझ्या लिखाणाला वाचत असताना दिसून येतं.शहरात नव्याने जॉब शोधायला आलेल्या एका खेड्यातील सुशिक्षित मुलाची जी अवस्था व्हावी तशी तुझी अवस्था झाली आहे. असा प्रत्यय तुझ्या लेखणीतून दरवेळा नव्यानं येतो..! ज्याप्रमाणे माणसं जगायला हवी आहे,तसं तुझं हे व्यक्त होणं चालू रहायला हवं.कालचीच गोष्ट बघ मी शहराच्या एका नामांकित चौकात उभा होतो,माझं माणसांना न्याहाळणे चालू होते.उड्डाणपुलाखाली असलेल्या झाडाच्या आडोश्याला मी सावलीला उभा होतो..! अनोळखी शहरात मी अनोळखी माणसांत आपल्या लोकांना शोधत असतो.कुणी मला बघून अलवार स्मित दिलं की मला तो ओळखीचा वाटू लागतो.मग आपल्या मनातल्या सर्वच गोष्टी त्याला सांगाव्या असं वाटू लागतं.परंतु दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती माझ्यापासून कितीक दूर निघून गेलेली असते अन् एरवी माझी कल्पनेत का होईना तिच्याशी भेट झालेली असते,संवाद खुलू लागलेला असतो..! अश्या तऱ्हेनं माणसं बघायला लागलं की अनोळखी प्रत्येक तो माणूस आपल्याला ओळखीचा वाटू लागतो..! मला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी बऱ्याच रजिस्टरची लिखाणाला सुरुव

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

आयुष्याची आता व्हावी उजवण..!

आयुष्याची आता व्हावी उजवण..! भर सकाळीच उन्हं जाणवायला लागली आहे.औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांना आज आमच्या हक्काची सुट्टी असते.तरीही काही महत्त्वाचं उत्पादन कंपनीत करायचं असेल,फार महत्त्वाचं असेल तर एखाद-दोघं जातात कंपनीत..! बाकी रोजच्या सकाळी पाच वाजता सुरू होणारा आमचा दिवस आज मात्र आठ वाजता सुरू होतो.मी निपचित अंथरुणात पडून असतो. तुटलेल्या खिडकीच्या तावदणातून हळूवार हवेचे झोके आत येत राहतात,त्यांना अंगावर घेत मी लोळत पडलेलो आहे..! खोलीत झालेला पसारा,अस्थवस्थ पडलेली पुस्तके,पेपर,रात्रीचा मेसचा डबा खावून झाल्यानंतर तो तसाच उताणा पडला आहे.बाटलीतील पाणी संपल्यामुळे तो हिसळून ठेवायचं जीवावर आलं आहे. खूप तहान लागली आहे पण उठायची इच्छा नाही..! उश्याला नामदेव ढसाळ यांचा "मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे" हा काव्यसंग्रह कित्येक दिवस वाचायला घेतला आहे पण पडून आहे.तो वाचून होत नाहीये. कारण काय असेल तर मला कुठेतरी माझ्याच व्यथा त्यात मांडल्यासारखे वाटू लागले आहे,त्यामुळे त्यांची एक-एक कविता वर्मी घाव घालत आहे.दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट दरवाज्या

मुसाफिर - संगतीने प्रवास

मुसाफिर - संगतीने प्रवास काल सायंकाळी मिळालेलं एक सुंदर सरप्राईज..! Patni,Syntel,L&T,Infotech,Apar,Disha अश्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असतांना ज्यांचा जगभराच्या अनेक कंपन्यांमध्ये पट वाढीसाठी सक्रिय हातभार होता. Soft Excel Consultancy Services या कंपनीचे असलेले ते मॅनेजिंग डायरेक्टर.सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत,इंग्लंड आणि अमेरिका,जपान येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत त्यांना ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा त्यांनी केलेला प्रवास..! त्यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात केलेलं लेखन-स्तंभलेखन. "बोर्डरूम","नादवेध" "मुसाफिर","अर्थात" आणि 'किमयागार' ही आणि इतर बरीच त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके.विज्ञानाइतकीच ज्यांना तत्त्वज्ञान,भारतीय संगीत,इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे..! टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची Oprating Systems,Data Communication & Networks,Web Technologies आणि Dimistifaing Computers या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन

Freelancer and Content Writers या क्षेत्रातील माझी गणितं..!

Freelancer and Content Writers क्षेत्रातील माझी गणितं..! साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटरव्यू देत होतो,इंटरव्यू छान चालू होता. Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच. एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..! हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..? तर साधारण पंधरा मिनिटे इंटरव्यू झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वरूप क

Emily Dickinson Poems..!

Emily Dickinson Poems..! दोन दिवसांपूर्वी एमिली डिकीन्सन यांच्या काही निवडक कवितांचा मराठी अनुवादित कविता संग्रह वाचला जो की १६९ पानांचा आहे.मराठी अनुवाद 'मधुकर नाईक' यांनी केला आहे..! काव्यसंग्रह खूप वेगळ्या धाटणीचा म्हणजे एमिली डिकीन्सनचा मूळ स्वभाव दर्शवणारा आहे.एकांताशी  असलेली जवळीक,प्रेम,नातं या गोष्टींचा असलेला तिटकारा अन् मृत्यूबद्दल असणारं तिला आकर्षण हे खूप जवळून तिच्या कवितेतून दिसून येतं..! तिच्या कविता कधी ३५-४० ओळींच्या आहे तर कधी फक्त १२-१५ शब्दांच्या आहे पण याही कविता ती कुणी सामान्य कवीयत्री नाही हे दर्शविणाऱ्या आहे. एमिलीने तिच्या उभ्या हयातीत १७७५ कविता लिहल्या परंतु त्यापैकी फक्त ६ कविता एमिलीच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या. ती तिच्या एका कवितेत म्हणते, "आपले लिखाण प्रसिद्ध करणे म्हणजे आपल्या मनाचा लिलाव केल्यासारखे आहे." एमिलीच्या काव्याचे सर्वसाधारण स्वरूप कोणते..? या प्रश्नाला उत्तर असे की ती एक जातिवंत भावकवी आहे.महाकाव्य,खंडकाव्य,दीर्घकाव्य,कथाकाव्य इत्यादी कोणत्याही प्रकारची विस्तृत रचना कधीच तिची नव्हती.केवळ एक भावपूर्ण किंवा चिंतनात

The Alchemist..!

T he Alchemist..! दोन दिवसांपूर्वी "पाउलो कोएलो" लिखित "द अलकेमिस्ट" (किमयागार) हे "१३५" पानांचे डॉ.शुचिता नांदापूरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून संपवले. खूप छोटे असे अन् ठरवून वाचायला बसले तर एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे असे हे पुस्तक आहे..!  हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक म्हणून अनेकदा ठरलेलं आहे.आश्चर्य म्हणजे जेव्हा मुळ पोर्तुगिज भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा काही एका महिन्यात या पुस्तकाच्या फक्त दोन प्रती विकल्या गेल्या असतांना हे पुस्तक पुढे काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर बुक ठरले ज्याची एक अनोखी कथा आहे..!  आजवर जगभरात ८० पेक्षा जास्त भाषेत हे पुस्तक अनुवादित झालेले आहे अन् जगभरातून वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे..! "अ‍ॅन्डालुसिया" इथल्या "सॅन्टिआगो" नावाच्या एका मेंढपाळाची ही एक छोटीशी रंजक कथा आहे,जी आपल्याला जीवन जगतांना यशस्वीतेचे काही तत्वे सांगू बघते.खजिना भेटेल म्हणून स्वतःच्या मेंढ्या विकून स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा