मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची फरफट..!

आयुष्याची फरफट..!

माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं,तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं.त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो.

अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते.मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो,माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं..!

माणसं एकटे कधीच नसतात,जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन साऱ्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात.त्यामुळं ती एकटी कधीच नसतात जरीही अवस्थेने ते एकटे दिसत असले..!

हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते,काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमत करत आहे पण मला कोणी बघितले नाही ही खूप दिवसांची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते..!

सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कित्येक प्रश्न करून होतात.काय हवं, कश्याशाठी,महत्त्वाचा म्हणजे मी का इतका वेळ घेतो आहे आयुष्यात स्थिर व्हायला किंवा कुठला तो एक निर्णय घ्यायला जिथं सध्या आयुष्याची दोन टोकांवर आयुष्य जगण्याची इतकी फरफट होत आहे तरीही..!

कधीतरी मला माझं सुखद भविष्य खुणावते,कधीतर वेळी-अवेळी भविष्यासाठी घेतलेले जे निर्णय आहे ते चुकले आहे.

अश्यावेळी जेव्हा स्पष्टच याची जाणीव होते,तेव्हा मात्र आजच मला माझ्या आयुष्यातील,भविष्यातील माझी होणारी फरफट दिसून येते अन् मी बेचैन होतो.तितकाच जितका पहाटे उजेडल्यावर माझे सायकलवरचे पेपर काही दहा वर्षांपूर्वी भर वस्तीत रस्त्यावर अस्थव्यस्थ पडले होते अन् मी ते भांबावल्यासारखे जमा करत होतो..!

अश्यावेळी बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात अन् काही काळ का होईना मला माझ्या भविष्याची चिंता सतावत नाही.म्हणून अलीकडे नेहमीच वाटतं की गर्दीतला तो प्रत्येक माणूस ओळखीचा असावा,ओळखीचा वाटावा..!

पहाटेच साडेपाचला शिकवणीसाठी गेलं की गुलमोहराच्या झाडाखाली मॅडमनी माझी घेतलेली सहाची शिकवणी.मॅडमची त्यांच्या नवऱ्याला नवीन ड्युटीवर लागल्याने त्यांना सकाळीच ड्युटीसाठी डब्बा करून देणे,त्यांचे आवरून देणे माझ्याकडे बघणे यात त्यांची होणारी फरफट आठवते..!

अन् मी तेव्हाही माझ्या भविष्याची काळजी म्हणून त्यांच्याकडे शिकवणी लावलेली होती..!

माझ्या आयुष्यात अजूनही काही गणितं सुटले नाही,माझी काही प्रश्नांना घेऊन अजूनही फरफट चालू आहे,असं एकाकीच स्ट्रीट लाईटच्या उजेडाखली बसलं की आधिकच जाणवते.
मी असो किंवा मॅडम असो किंवा माणसांच्या गर्दीत ओळखीचे वाटणारे चेहरे असो या सगळ्यांच्या आयुष्याची गणितं,प्रश्न सुटायला हवी.
नाहीतर जगण्याची अन् सोबत आपली होणारी फरफट खूप वाईट आहे..!

मग अश्यावेळी काळोखात असलेला रस्ता,स्ट्रीट लाईटचा उजेड,रस्त्यावर एकांगाला एकाकी टाकलेले एकाकी बाकडे यांचं आयुष्यात असणं जवळचं वाटायला लागतं.माणसांच्या सहवसापेक्षा एकांत जवळचा वाटायला लागतो,माणसांची भिती वाटायला लागते.निर्जीव वस्तूंवर प्रेम व्हायला लागते,त्यांच्याशी जवळीक करायला अन् तासंतास त्यांच्याशी बोलत रहायला त्यांचं सानिध्यात विचार करायला आवडतं..!

असो,जगण्याची गणितं सुटले की हे असं आयुष्य जगणं थांबेल,तोवर आयुष्याची फरफट अन् निर्जीव वस्तू जवळ करायच्या..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...