एकटेपणाचा सहवास..!
हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..!
कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..!
अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..!
अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते.
डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवडतं अन् कित्येकदा तो हात साफ करत राहणं अन् त्यांच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नैराश्य असतं त्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात सुख शोधत राहणं त्यांना आवडतं..!
पहाटेचा सूर्योदय त्यांच्या अंगावर येतो,त्यांना तो नकोसा वाटतो तर सायंकाळचा सूर्यास्त त्यांना हवासा वाटतो.सायंकाळ होऊन रात्र व्हावी असं त्यांना नकोसं वाटतं,जसजशी सायंकाळ होवू लागते तसतसे ही माणसे आयुष्याची विस्कटलेली गणितं जुळवू बघतात.
ही गणितं जुळवता जुळवता कधी मध्यरात्र होते याचं त्यांना भान नसतं अन् मग एक अनामिक नशा यावी अन् अंथरुणावर आपण पहाटेच्या न ठरलेल्या वेळेपर्यंत झोपून रहावं असं त्यांच्या आयुष्याचं गणित असतं..!
अश्या माणसांचा प्रत्येक दिवस सारखा असतो.क्वचित एखाद्-दुसरा बदल त्यांच्या आयुष्यात दिवसागणिक झाला तर होतो नाही तर वर्षवर्ष हे असच कालचक्र फिरावं तसं त्यांचं उद्वस्थ झालेलं आयुष्य अन् आयुष्याला घेऊन त्यांचं विचार करणं चालू असतं.
जेव्हा हजारो माणसांच्या गर्दीत त्यांना एकटे वाटत असेल,तेव्हा हा विचार मनात येऊन जातो की जेव्हा एखादी गोष्ट त्यांना मनापासून करावीशी वाटत असेल तर तिच्यासाठी त्यांना किती सर्व तयारी आपल्या मनाची करून घ्यावी लागत असेल..!
Abnormal आयुष्य जगणारी माणसं अन् त्यांच्या विषयी बरच काही..!
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा