मुख्य सामग्रीवर वगळा

Love Kokan..! ❤️💙❤️

Love Kokan..! ❤️💙❤️

मान्सून सरावला आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येऊ लागला आहे.मराठवाड्यात आमच्या शहराला गेले दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्याने झोडपून काढलं आहे.आता वेध लागले आहे ते मान्सून महाराष्ट्रात येण्याचे अन् धो-धो पावसाचे..!

तर मित्रांनो पावसाळा तोंडावर आला आहे अन् दोन दिवसांच्या सोसाट्याच्या वाऱ्याने आता भटकंती करण्यासाठी मन आतुर झालं आहे.लवकरच बॅग पॅक होतील अन् पाऊस पडला की सुरू होईल भटकंती कोकणातील सागर किनाऱ्यावर,कोकण डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या छोट्या छोट्या खेड्यागावात,पाडे,वस्त्यां,टेकड्यांवर..!
जाणून घेतले जाईल जवळून कोकणातील हे जनजीवन.
"कोकण म्हणजेच आपला स्वर्ग..!"
कोकण म्हणजे धो-धो कोसळणारा पाऊस,चहूकडे हिरवाईने नटलेला परिसर,असंख्य समुद्र किनारे आणि कोकणची खरी ओळख म्हणजे कोकणचा फणसातील गऱ्यासारखा,शहाळ्यातील मऊ मऊ मलई सारखा दर्यादिल कोकणी माणूस..!

कोकण का बघावं तर निसर्गानं कोकणातील माणसाला खूप काही भरभरून दिलं अन् कोकणातील माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात राहून ते सर्व कोकणी निसर्गसौंदर्य जपवलं..!
या महत्त्वाच्या कारणामुळे जितकं प्रेम माझं आमच्या मराठवाड्यावर तितकंच प्रेम या कोकणावर आहे..!
काल "Tea Day" होवून गेला माझ्यासारख्या चहा न घेणाऱ्याला किंवा अधूनमधून हुक्की आल्यावर चहा घेणाऱ्याला त्याचं काय कौतुक असावं..!
परंतु जेव्हा कोकणची ही सैर घडायची असते,तेव्हा थर्मासमध्ये कोकण डोंगररागेतील एखाद्या उंचीच्या डोंगरावर जावून पडत्या पावसात हा थर्मासमधला गवतीचहा अन् अद्रक घातलेला चहा घेण्यात अन् त्याचवेळी डोळ्यांच्या समोर डोळ्याचे पारणे फेडणारे उंच डोंगरांतून पाण्याचे खाली कोसळणारे झरे बघण्यात जे सुख आहे ते काही औरच..!
अश्यावेळी मात्र चहा हवाच असतो,खरा "Tea Day" आमचा तेव्हा साजरा होतो,एरवी आम्ही कॉफीप्रेमी आहोत..!

कोकण म्हणजे स्वर्ग का तर कोकणातील कुठलीही गोष्ट अनुभवण्यात अन् ती बघण्यात जे सुख आहे ते कश्यातच नाही.
कोकणचा धो-धो पडणारा पाऊस निसर्गाच्या सान्निध्यात जावून तो बघणं,भर पावसात कोकणच्या कुठल्याही किनारपट्टीवर समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यात जी मज्जा आहे ती इतरवेळी नाही.पडत्या पाऊसात लाटांचा आवाज अन् डोळ्यांनी बघत त्यांना अनुभवणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे हे क्षण असतात..!
कधीतरी भर सायंकाळच्यावेळी अस्ताला जाणाऱ्या सुर्याबरोबर समुद्र किनाऱ्यावर येऊन समुद्र न्याहाळत रहायला मला खूप आवडतं.तासंतास जिथवर नजर पुरेल तिथवर डोळ्यांनी हा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासमवेतचा समुद्र किनारा डोळ्यांनी अनुभवायला खूप आवडतं.ते क्षण मनाच्या एका कोपऱ्यात कैद करून ठेवायला खूप आवडतं..!

वर सांगितल्याप्रमाणे मला कोकणचा दर्यादिल माणूस अन् त्याचा सहवास त्याच्याशी भरपूर गप्पा मारायला अन् त्यांच्याबद्दल,त्यांच्या जीवन संस्कृतीबद्दल आधिकाआधिक जाणून घेण्यास खूप आवडतं.आजवरच्या अनुभवात मोजकं बोलणारा कोकणी माणूस मला इतर प्रांतातील माणसांपेक्षा खूप भावला आहे..!
त्यांचं जनजीवन असो किंवा त्यांची रोजनिशी याबद्दल मला नेहमीच एक आकर्षण वाटून गेलं आहे.मवाळ,शांत स्वभावाचा असलेला हा कोकणी माणूस त्याच्या रोजच्या जगण्यात अनेक संकटे आहे पण या गोष्टींचा कुठलाही विचार,तान त्याच्या चेहऱ्यावर नसतो.एक हळूवार अन् माझ्या आयुष्याच्या मी आखलेल्या खिडकीत बसणारं त्यांचं आयुष्य आहे,जे मला एकदम परफेक्ट वाटतं..!
कोकणातील कौलाच्या घरातील सांजेची वेळ मला नेहमीच आकर्षित करत आली आहे..!
बाहेर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे.चौकटीच्या मध्यावर जुनाट झालेला चुल्हीच्या धूपणाने काळसर काच पडलेला पिवळा लाईट जळतो आहे.त्याचा पिवळा मंद प्रकाश सर्व घरात आहे.मी लाकडी आरादायी खुर्चीवर बसून खिडकीपल्याड असलेले निसर्गसौंदर्य जे सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने न्हावून निघत आहे ते अनुभवतो आहे.समोरच तीपाईवर ठेवलेलं "हेन्री डेव्हिड थोरो" यांचं "दुर्गाबाई भागवतांनी" अनुवादित केलेलं "वाॅल्डनकाठी विचारविहार" हे पुस्तक चाळत बसलो आहे..!
आता मी नेमका द्विधा मनःस्थितीत सापडलो आहे,की सुंदर या शब्दाच्या व्याख्येत बसणारं नेमकं कोकणचे निसर्गसौंदर्य आहे की वाॅल्डन काठावर विहार करतांना थोरोने अनुभवलेल निसर्ग सौंदर्य..?
माझ्या मनात चालू असलेला हा विचार डोळ्यांसमोर पडणारा पाऊस,खिडकीत दिसणारं निसर्ग सौंदर्य,पुस्तक,लाईटचा मंद प्रकाश,चुल्हीवर काल सायंकाळी रापणीला जावून आणलेले ताजे मासे,त्याचं कालवण जे चुल्हीवर शिजत आहे,एकांगाला सुगंधी तांदळाचा पिवळसर भात अन् एव्हढे सगळं घडत असताना कोकणचा दर्यादिल माणूस शांत चित्ताने सायंकाळची मासे पकडण्यासाठी जायचं म्हणून आपलं जाळे अन् त्याचे कोडे असलेली गुंतागुंत सोडवत आहे.माझ्याशी अधूनमधून बोलत आहे..!
अजुन बरच काही..!

क्रमशः..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...