स्वप्न महाराष्ट्र पोलिस होण्याचं..! 💙
मित्रांनो आणि मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी इतके दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे "महाराष्ट्र पोलिस दलात" होणारी पोलिस भरती जी की लवकरच होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढील दोन महिन्यांनी क्रमवारी ७२०० पदांची पोलिस भरती करण्याचे योजिले आहे.पुढील काळात नगरपालिका निवडणुका व इतर कारणे बघता या भरतीसाठी उशीर होवू शकतो किंवा गडचिरोली जिल्ह्यात ज्या पद्धतीने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू झाली त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा लवकरच पोलिस भरती होवू शकते.
त्यामुळे आपणा सर्व मित्र-मैत्रिणींना पूर्णपणे जोरदार पोलिस भरतीच्या तयारीला लागायचे आहे..!
लेखी परीक्षा पहिले होईल की मैदानी चाचणी पहिले होईल हे अजुन निश्चित नाही.परंतु आपण दोन्हींसाठी आता जोमाने तयारीला लागायचं आहे ;या दोन्हीपैकी काहीही असो आपण भरतीसाठी पूर्णपणे तयार रहायचं आहे..!
हा लेख लिहण्यामागचे कारण एकच आहे की शहरातील व खेडे गावातील तरुणांना या लेखातून प्रेरणा मिळावी आणि काही महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी विचार करावा.
१) अलीकडे मी सुद्धा पोलिस भरतीच्या मैदानी सरावासाठी रोज पहाटे,सायंकाळी रनिंगसाठी जातो आहे.तेव्हा मला एक गोष्ट निदर्शनास आली की मुलं राज्य महामार्गाने किंवा आंतरराष्ट्रीय महामार्गाने प्रॅक्टिस करत आहेत.हरकत नाही तुम्ही प्रॅक्टिस करा परंतु रहदारी,ट्रॅफिकचे काही नियम पाळून आपल्याला ती प्रॅक्टिस करायची.जेणेकरून आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही.
२) रस्त्याच्या मधोमध आपल्याला पळायचे नाहीये तर रस्त्याच्या डाव्या बाजूने शिस्तशीर पद्धतीने एका साईडने (डाव्या) आपल्याला पळायचे आहे.कारण रस्त्याने पहाटे अनेक ज्येष्ठ नागरिक रस्त्यानं फिरायला,व्यायाम करायला आलेली असतात अन् त्यामुळे अपघात होवू शकतो.
३)पहाटेच्या वेळी वाहने भरधाव वेगाने चालत असतात,त्यामुळे महामार्गावर प्रॅक्टिस करतांना लक्षपूर्वक प्रॅक्टिस करा.
४) शक्यतो मला तरी वाटते की महामार्गाने किंवा इतर रस्त्याने धावण्यापेक्षा आपण शहराच्या क्रीडा संकुलात आपली प्रॅक्टिस करावी.जेणेकरून वरील अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही अन् काही काळजी करण्यासारखे काही घडणार नाही.
५) खेडे गावातील मुलांची क्रीडा संकुल नसल्यामुळे
गैरसोय होत आहे हे खरं आहे. परंतु "संकटांना तोंड देत यश संपादन करतो तोच खरा महाराष्ट्र पोलिस असतो" त्यामुळे गावात आपण क्रिकेट खेळण्यासाठी अनेक मैदाने आखलेले असतात तिथे आपण प्रॅक्टिस करू शकतो.
६) अजुन एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की, १६०० मुलांसाठी व मुलींसाठी ८०० मीटर असो किंवा १०० मीटर या दोन्ही आपण कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आपण स्टॅमिना वाढावा म्हणून टेकडी,डोंगर यांच्या उतार,चढावर पळण्याची प्रॅक्टिस करत आहोत.तेव्हा पाय घसरून किंवा पाय तिरपा पडून आपल्याला दुखापत होणार नाही याची आपण काळजी घाव्यी.
७)सोबतच आपल्या शेजारीच असलेल्या "गौताळा अभयारण्य" परिसरातील वन्यजीव,पक्षी यांचा अश्या डोंगर,टेकड्यांवर अधिवास असतो.त्यामुळे त्यांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे.
(हे माझ्या शहराजवळ असलेलं अभयारण्य आहे,तुमच्याकडे दुसरे जे असतील.)
८) वरील सर्वच गोष्टी नॉर्मल आहे परंतु आपण या गोष्टींचा विचार करत नाही.मग ऐनवेळी आपला अपघात होतो आणि आपण भरतीला मुकतो किंवा कधीतर हे आपल्या जीवावर बेतू शकते.कारण माझ्या शहरात अश्या दोन-तीन तरुणांच्या अपघात होण्याच्या घटना घडल्या आहे.
त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या मनापासून मैदानी अन् लेखी परीक्षेचा अभ्यास करा.
तीन वर्षांनी पोलिस भरती येत आहे,त्यामुळे जोमाने आपल्याला अभ्यास करून प्रॅक्टिस करून यावर्षी "महाराष्ट्र पोलिस दलात" भरती व्हायचं आहे..!
खूप शुभेच्छा..!
जय हिंद..!
Bharat Sonwane.
कन्नड जि.औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा