Emily Dickinson Poems..!
दोन दिवसांपूर्वी एमिली डिकीन्सन यांच्या काही निवडक कवितांचा मराठी अनुवादित कविता संग्रह वाचला जो की १६९ पानांचा आहे.मराठी अनुवाद 'मधुकर नाईक' यांनी केला आहे..!
काव्यसंग्रह खूप वेगळ्या धाटणीचा म्हणजे एमिली डिकीन्सनचा मूळ स्वभाव दर्शवणारा आहे.एकांताशी
असलेली जवळीक,प्रेम,नातं या गोष्टींचा असलेला तिटकारा अन् मृत्यूबद्दल असणारं तिला आकर्षण हे खूप जवळून तिच्या कवितेतून दिसून येतं..!
तिच्या कविता कधी ३५-४० ओळींच्या आहे तर कधी फक्त १२-१५ शब्दांच्या आहे पण याही कविता ती कुणी सामान्य कवीयत्री नाही हे दर्शविणाऱ्या आहे.
एमिलीने तिच्या उभ्या हयातीत १७७५ कविता लिहल्या परंतु त्यापैकी फक्त ६ कविता एमिलीच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या.
ती तिच्या एका कवितेत म्हणते,
"आपले लिखाण प्रसिद्ध करणे म्हणजे आपल्या मनाचा लिलाव केल्यासारखे आहे."
एमिलीच्या काव्याचे सर्वसाधारण स्वरूप कोणते..?
या प्रश्नाला उत्तर असे की ती एक जातिवंत भावकवी आहे.महाकाव्य,खंडकाव्य,दीर्घकाव्य,कथाकाव्य इत्यादी कोणत्याही प्रकारची विस्तृत रचना कधीच तिची नव्हती.केवळ एक भावपूर्ण किंवा चिंतनात्मक जीवनानुभव मोजक्या शब्दांत साकार करण्यात तिची प्रतिभा रमे..!
वयाच्या ५६ व्या वर्षी तिचा होणारा मृत्यू अन् तिला लागलेलं त्याचं वेध हे सर्व थक्क करणारं आहे.त्यामुळं तिचा हा प्रवास खूप जवळचा वाटतो..!
आपल्याला दूरदेशी घेऊन जायला
ग्रंथासारखे जहाज नाही,
अन् कवितेच्या नाचऱ्या ओळींच्या पानापेक्षा
अगदी जलदगती अश्र्वही..!
कर्मदरिद्रयालाही परवडतो हा प्रवास
ज्याला कसलंही भाडं नाही घ्यावं लागत,
मानवी मनाला देशांन्तरी किती स्वस्थ असतो रथ..!
- एमिली डिकीन्सन.
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा