कधी कधी अनेक विचारांचे काहूर मनात येऊन जाते... मन जुळून येतं पण,बोलणं असह्य वाटू लागते.तुझ्याबद्दल मनात चांगले विचार आहे,पण त्या Positive Vibes दिसून येत नाही.मन कागदांवर चार गोष्टी व्यक्त करून मोकळं होतं,पण जेव्हा ते आत्मसात करायची वेळ येतेना ते करता येत नाही... रडू येतं पण आसवांच डोळ्यांतून येणं होत नाही,कधीतरी विचारांचा बांध फुटला अन डोळे अश्रूंपासून वेगळेही झाले,तरी उशी ओली होत नाही.तुझ्यासाठी मनातले विचार ओठांवर येणं,पण तिथंच त्यांचं घुटमळत सांजेच्या प्रहरी अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत अस्ताला जाणं...किती अस्वस्थपणाचे बोलके मुखवटे घेऊन जगत असतो नाही का आपण..? कॉल आला आहे,रिसिव्ह करूनही फक्त बोलणं ऐकत राहणं.कधीतरी खूपच मनातील भावना हळव्या झाल्या तर,टेक्स्ट मॅसेज टाईप करणं,इथेही स्पॅस देतांनाची तडजोड बॅकस्पेसमध्ये बदलून जाणं.इतकी तडजोड सहन करून मॅसेज पाठवनं आणी तो, seen होऊनही प्रतिउत्तर न येणं... हे सगळ मनाला हळवे करून आशेवर जगते ठेवण्याचे खेळ आहे.... अलीकडे जसे बोटे मोबाईल स्क्रीनला स्क्रोल करत राहतात,तसेच आॅफीसमधल्या विंडोग्रिलची काच,त्या बर्फी कलरच्या पडद्या पलीकडचं नि...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!