#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_वसाहतीची_बदलणारी_समीकरणे. औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे... औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी तसेच सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्म...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!