मुख्य सामग्रीवर वगळा

#औरंगाबाद शहर आणि औद्योगिक वसाहतीची बदलणारी समीकरणे...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_वसाहतीची_बदलणारी_समीकरणे.
औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे... 

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता...
औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी तसेच सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे...
महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची आता नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने नावारूपाला येत आहे...

याच वेळी शहराचा इतर बाबतीत विचार केला तर समोर येणारा चेहराही विचार करण्यासारखा आहे,एकीकडे औरंगाबाद शहरातील एमआयडीसी भागात कोरोना सदृश्य काळ असो किंवा त्यामुळे उद्योग जगतात मंदावलेली अर्थव्यवस्था,ढासळलेली परिस्थिती,नियोजनाचा असलेला अभाव यामुळे निर्माण झालेली समस्या.शहराचे गलिच्छ राजकारण,देश विदेशातील नामांकित कंपन्या जेव्हा प्रोजेक्ट आखण्या हेतुस्पर बोलण्या करता येतात त्यावेळी दिली जाणारी वागणूक,त्यामुळे औरंगाबाद शहरात उद्योग विश्वात येणारे नवीन-नवीन प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जात आहेत.

औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...
ज्या कंपन्या सध्या औरंगाबाद लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत आहे त्यांना निर्माण होणाऱ्या इतर अनेक समस्या हे शहराच्या विकासात अडथळा आणणारे ठरत आहे.कोरोनाच्या या अतिशय वाईट काळात इंडस्ट्रियल विश्वातील हालचाल बघितली तर समोर येणारी अवस्था ही अत्यंत वाईट आहे...
या काळात मजूर वर्ग आप-आपल्या गावी स्थलांतरित झाला पुढे जेव्हा लॉकडाऊन शिथिल करून काही धोरणे आखून देत कंपन्यांना चालू करण्यात आले त्याच वेळी वेळीत मजूर न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असो,ज्या ठिकाणी आठ तासांच्या कामाच्या तीन शिफ्ट कंपनी मध्ये चालत होत्या त्याच ठिकाणी बारा तासांच्या  दोन शिफ्ट कराव्या लागल्या त्यामुळं मजूर वर्गाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या,कच्चा माल वेळेत न मिळाल्यामुळे,कामात येणाऱ्या असंख्य अडचणी यामुळे या काळात इंडस्ट्रियल विश्वात खूप नुकसान झाले आहे...

पुढेही जोवर परिस्थितीती नियंत्रणात येत नाही तोवर हे संकट कायम असणार आहे,या संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारा बराच कालावधी सर्वच कंपन्यांना द्यावा लागणार आहे.त्यामुळे पुढील काही काळ औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे...
औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले दिले जात आहे त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असणाय्रा कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले किंवा ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो असे वाटते...

Written by,
Bharat Sonwane.
(MBA-Production & Operation Management).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...