#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य...
कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे.
यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल...
जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे...
त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं...
नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फार दूर जाण्याची ही आवश्यकता नसते.प्रत्येक शहरालगत असे ठिकाणे हे आपल्याला नेहमीच भेटतात,बर्याच अंशी ते आपली ओळखीची असतात किंवा रोजच्या जीवनातील एक भाग ती बनलेली असतात...
अशीच आहे आजची ही मी भेट दिलेली टेकडी जी प्रत्येक कन्नड वासियांच्या रोजच्या जगण्यातली अविभाज्य घटक बनलेली आहे...
कन्नड शहरातील बऱ्याच नागरिकांची पहाटेची सुरुवात या टेकडीच्या सानिध्यात येऊन सूर्योदय अनुभवत होत असते.सकाळी मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात कन्नड शहरातील नागरिक या टेकडीवर फिरण्यास येत असतात,सध्याची परिस्थिती बघता तो ओघ कमी झाला आहे पण सर्व सुरळीत झाले की पुन्हा नागरिक या टेकडीकडे वळतील हे नक्कीच...
टेकडीच्यावरती पूर्णपणे चढून आलेकी सकाळच्या प्रहरी होणारा सूर्योदय असो किंवा सांजेचा प्रहरी होणारा सुर्यास्त हे अनुभवणे खूप सुंदर आणि दिवसभराचा थकवा विसरायला लावणारे असते.टेकडीवरून होणारे भव्य कन्नड शहराचे दर्शन नव्याने वाढणारे कन्नड शहर,जुने कन्नड शहर आसपासची गावे,शहरातील उंच उंच टॉवर यांचे होणारे दर्शन काही औरच असते...
जे मनाला कुठेतरी शांतता देऊन जात असते...
एकीकडे दिसणारी सुरपाळा डोंगररांग तर दुसरीकडे अंबाडी प्रकल्पाचे होणारे दर्शन,मग दिसून जातो तो सर्व परिचित गौताळा अभयारण्य जे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.एकाच ठिकाणी राहून आपल्याला हे सर्व मनोहरी दृश्य अनुभवता येते...
टेकडीवर नव्याने होणारी काळ्या खडकांची ओळख,विविध रंगांची छोटी छोटी दगडं,विविध छोटी छोटी झाडे,रानवेली,बारीक बारीक फुलं,खदानित असलेले काळेशार पाणी हे ही याठीकाणी आपल्याला बघायला भेटते...
शहराचा वाढणारा विस्तार,शहर आसपासच्या गावाला भिडत आहे हे जरी चांगले वाटत असले तरी यामुळे निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात होणारी हानी हे काळजीची बाब वाटते.शहरे निसर्गाच्या पायथ्याला जात आहे त्यामुळे वन्यजीव,वनस्पती,वनसंपदा,होणारे परिणाम,प्रदुषण हा विचार केला की कधी कधी अस्वस्थ होते...
परंतु बदल हा नियमित होत आला आहे त्याला पर्याय नाही ते स्विकारत आपण हे होणारे नुकसान टाळण्यासाठी खूप मार्ग अवलंबु शकतो जे सध्या गरजेचे वाटते...
Written by,
Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा