मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृत्यू अन् त्याच्या संगतीच्या कथा..!

मृत्यू अन् त्याच्या संगतीचा कथा..! अंतिमसंस्कारचे सर्व विधी उरकून घराकडे वळलो पंधरा दिवस या काळात सरून गेले होते,आयुष्यात आयुष्याला घेऊन आता भूतकाळ अन् वर्तमानकाळ यांच्यासोबत प्रत्येक वाक्याला जोडून बघत होतो.येणारा काळ खूप कसोटीचा अन् आयुष्यातून एकतर मी उठून जाईल,नाहीतर मी त्या अवस्थेत तगून राहील अन् मरणाला कारण न होता जगत राहील असं काही मनात चालू होतं. आयुष्याला घेऊन इतका विचार त्या दिवसापूर्वी किंवा त्या एका घटकेत केला तितका कदाचित आजवरही केला नसेल..! घरी आलो घर ओळखीचे पण दिशा अनोळखी वाटू लागल्या होत्या,डाळिंबाच्या झाडाची पानगळ सुरू असल्यानं साऱ्याच अंगणात वाळलेल्या पानांचा सडा पडलेला होता.धूनी-भांडी करत असलेल्या ठिकाणची माती पोपडे धरू बघत होती,जसं तिलाही आता इथला सहवास नकोसा झाला होता. कोणाचं जाणं आयुष्यात इतकं रितेपण घेऊन येईल हे स्विकारण्याची ती पहिलीच वेळ होती अन् ते मनाला न झेपणारे होते..! सर्वच कसं शांत-शांत भासत होते,दुपारचं रणरणते ऊन हवेहवेसे वाटू लागले होते,आयुष्यात इतकी शांतता यावी की पक्षांनीसुद्धा आपल्या जवळपास फिरकू नये.कधीतरी विटांना मातीत रचलेल्या वॉलकंपाऊं

ऊसतोड अन् बीस जोडी..!

ऊसतोड अन् बीस जोडी..! पहाटेच्या नवाची वेळ झाली होती,गावातल्या सेवालाल महाराजांच्या मंदिरा महूरं असलेल्या पिंपळाच्या झाडाला असलेल्या पारावर गावातले गावकरी मंडळी गप्पा झोडीत बसली होती.कुणी देऊळात पाया पडायला म्हणून हातात अगरबत्ती घेऊन मंदिराच्या वाटेनं बिगीबिगी चाललं होतं..! ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला होता,त्यामुळं गावात मुकरदंम लोकांची चलती होती,लोकांत त्यांचा बोलबाला होता.रोजच कुण्या गावाच्या कारखान्याचा मुकरदंम गावात ट्रक घेऊन यायचा अन् गावातल्या ज्या लोकांनी त्यांच्याकडून उचल म्हणून पैकं घेतले आहे त्यांना तोडीला म्हणून घेऊन जात असायचा..! तोडीचा हंगाम सुरू होवून आठ-दहा दिवस सरले होते,हळू हळू गावातली तोडीला जाणारी मंडळी,उचल घेतलेली लोकं ज्या मुकरदमांकडून उचल घेतली असायची तो गावात घ्यायला आला की आपल्याला लागणारा संसार ट्रकमध्ये भरून नियमून दिलेल्या तोडीच्या गावाला,कारखान्याला निघत होता..! पहाटे गावात मुकरदम अन् ट्रक आला की टोळीला ट्रकमध्ये त्यांचा संसार अन् त्यांना रडतपडत घरच्यांना निरोप देतांना बघितलं की डोळ्यात आसवं भरून यायची..! दहाच्या सुमाराला असाच एक ट्रक गावाच्या पाराजव

वाऱ्याच्या संगती आठवणी..!

वाऱ्याच्या संगती आठवणी..! घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..! लहानपणीच्या काही गोड आठवणी या कवितेशी आहे अन् लहानपणी म्हणजे वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी इतक्या उंचीवरच्या,अर्थपूर्ण कविता जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्कीच आपलं भविष्य सुखकर असणार हे त्यावेळी वडिलांनी दिलेल्या संस्कारातून मला सांगता येतं..! तर लहानपणीच्या या कवितेशी जुळवून आलेल्या आठवणी अन् याच इतक्या वर्षांनीसुद्धा वडिलांच्या आवाजात ऐकलेली ही कविता जशीच्या तशी आजही माझ्या कानी पडते अन् तितक्या सुंदर इतर कुणाच्या आवाजात ती मी आजवर ऐकली नाही..! सांज सरून गेलेली असायची घराच्या चहूबाजूने काळोख दाटलेला असायचा,या काळोखात अंगणात वडिलांनी लावलेल्या त्यांच्या आवडत्या रातराणीच्या फुलांचा सुगंध सर्वदूर अंगणात,घरात दरवळत असायचा..! अश्यावेळी वडील दिवसभर काम करून थकून यायचे,ते फ्रेश झाले की दिवसभर आम्ही वडिलांची वाट बगणारे तिघे भाऊ-बहीण कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात वडिलांच्या मांडीवर विसावा घ्यायचो.कुणी मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..!

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..! साधारण काल-परवाची गोष्ट असावी,पहाटेचे कोवळे सूर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदाणातून सोपासेटवर मी झोपल्या ठिकाणी माझ्या डोळ्यांवर पडत होती,मी त्यांना अनुभवत निपचित लोळत पडलो होतो..! घरात कुणीही नसल्यानं घरात शांत वातावरण होतं,असेही घरी आई अन् माझ्याशिवाय कुणी नसते,त्यामुळे आमचे घर शांत असते नेहमीच.तर मी लोळत पडलो होतो,बाहेर चिमण्यांचा प्राजक्ताच्या झाडावर चिवचिव करण्याचा आवाज मात्र तितका कानी पडत होता..! मोबाईल बाजूला असलेल्या तिपाईवर ठेवलेला होता,डोळा लागल्यासारखे झाले,तितक्यात मोबाईल सायलेंट,व्हायब्रेट मोडवर असल्यानं तो वाजू लागला पुढे तो कितीवेळ वाजत होता अन् नंतर कट होवून पुन्हा कॉल आला अन् पुन्हा तो व्हायब्रेट होत राहिला. एरवी आलेला फोन मी खूप सहज असा लवकर घेत नाही..! काय कारण असावं माहीत नाही पण अलीकडे मला फोनवर कुणाशीही फारसं बोलायला आवडत नाही,जुजबी बोलणं असतं माझं.समोरचा आपल्यासोबत कितीही उत्साहाने बोलत असला तरी मी माझ्या ठराविक वाक्यांनी,कमी शब्दांनी आलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बोलत असतो.समोरच्या व्यक्तीला क्वचित प्रसंगी मी प्रश्न करतो तो

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..! माणसांच्या गर्दीत मी असतो,माणसांच्या गर्दीत माझ्या शरीराचं प्रतिनिधित्व मी करत असतो,सगळ्याच ठिकाणी मी शरीराने उपस्थित असतो.जोवर मी माझ्यात असतो,तोवर मला सर्वांचा सहवास हवा असतो..! जेव्हा मी शरीराने माझ्यात असून मनाने मी माझ्या भविष्यासाठी आखून ठेवलेल्या जगात असतो,तेव्हा मात्र मी कुणाचा नसतो.तेव्हा माणसांच्या जगतात असूनही माणसांच्या सहवासात मी नसतो,मलाच मी शोधत असतो मला जिथे मी माझ्या भविष्यात आखून ठेवलेल्या जगाला शोधत असतो. मला माणसे नकोसे वाटता,माणसांचा सहवास नकोसा वाटतो.आयुष्याला "जगणं" या अवस्थेचा विचार केला की,मग माझी "जगणं" या अवस्थेला घेऊन मनाची द्विधा मनस्थिती होते.जगण्याला मी कारण शोधू लागतो,आयुष्याला घेऊन मग विचार करू लागतो.मग मला काळोख जवळचा वाटतो..! दिवसभर गाड्यांचा भार वाहून थकलेला पुल मला आठवू लागतो,एरवी रोजच्या जगण्यात त्याचा विचार त्याच्यावरून गेलं की नेहमीच येतो पण काळोखाच्या वेळी मला त्याला न्याहाळत रहायला आवडतं..! स्ट्रीट लाईटच्या उजेडात आयुष्यात असलेल्या काळोखात खाचखळग्याच्या वाटेनं मला माझाच आधार व्हायल