मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..!

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..!

साधारण काल-परवाची गोष्ट असावी,पहाटेचे कोवळे सूर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदाणातून सोपासेटवर मी झोपल्या ठिकाणी माझ्या डोळ्यांवर पडत होती,मी त्यांना अनुभवत निपचित लोळत पडलो होतो..!

घरात कुणीही नसल्यानं घरात शांत वातावरण होतं,असेही घरी आई अन् माझ्याशिवाय कुणी नसते,त्यामुळे आमचे घर शांत असते नेहमीच.तर मी लोळत पडलो होतो,बाहेर चिमण्यांचा प्राजक्ताच्या झाडावर चिवचिव करण्याचा आवाज मात्र तितका कानी पडत होता..!

मोबाईल बाजूला असलेल्या तिपाईवर ठेवलेला होता,डोळा लागल्यासारखे झाले,तितक्यात मोबाईल सायलेंट,व्हायब्रेट मोडवर असल्यानं तो वाजू लागला पुढे तो कितीवेळ वाजत होता अन् नंतर कट होवून पुन्हा कॉल आला अन् पुन्हा तो व्हायब्रेट होत राहिला.
एरवी आलेला फोन मी खूप सहज असा लवकर घेत नाही..!

काय कारण असावं माहीत नाही पण अलीकडे मला फोनवर कुणाशीही फारसं बोलायला आवडत नाही,जुजबी बोलणं असतं माझं.समोरचा आपल्यासोबत कितीही उत्साहाने बोलत असला तरी मी माझ्या ठराविक वाक्यांनी,कमी शब्दांनी आलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बोलत असतो.समोरच्या व्यक्तीला क्वचित प्रसंगी मी प्रश्न करतो तो प्रश्न करायच्या अगोदर मी मलाच तीन-चार प्रश्न करून घेत असतो.
का..?
माहीत नाही पण मला हे सर्व शिस्तप्रिय असं काहीतरी असल्याचं भास करून देणारं वाटतं..!

माझ्या जवळच्या सर्वच मित्र-मैत्रिणींना माझा हा स्वभाव माहीत आहे,त्यामुळे ते सर्वच मला व्हॉटसअपवरती मॅसेज करतात,मग तिथे मी टाईप करून बोलतो अन् ते मलाही फोनवर बोलण्यापेक्षा हेच सोईचे वाटते हल्ली अलीकडे.
कारण तिथं बोलतांना अनामिक भासावं असं कुठलेही दडपण मला येत नाही की,नाही पडत कुठलीच प्रश्न अन् पडलीच तर सहज विचारून घेतो मी अश्यावेळी..!

तर मोबाईल दुसऱ्यांदा व्हायब्रेट होत होता अन् शेवटी काही महत्त्वाचा असेल म्हणून मी तो बघितला अन उचलला एका दूरच्या मैत्रिणीचा तो कॉल होता..!
तिने कॉल घेतल्या घेतल्या मला प्रश्न केला,
का रे काही कामात आहेस का..?
मी कामात नसतांनाही तिला सांगितले फार काही नाही लिहत 
बसलो होतो अन् सॉरी सायलेंट मोडवर होता मोबाईल..!

पुढे पाच मिनिटे जुजबी बोलणे झाले तिच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे हो,नाही,ठीक आहे,विचार करतो असे दिले अन् तिनं शेवटी माझ्या बोलण्यातून तिनं हेरले,की तिला माझ्या अश्या बोलण्याचा कंटाळा आला म्हणून तिनं ठेवते म्हणून बाय न करता फोन ठेवला..!

मी ही मोबाईल होता त्या जागी ठेवला अन् डायनिंग टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीला हातात घेऊन पाणी पित विचार करत बसलो.
की,काय कारण असावं की मला कॉलवर बोलायला नकोसे वाटते..?
एक अनामिक भिती वाटते.काही महत्वाचा कॉल नसेल तर का मी पहिल्याच रिंगमध्ये कॉल रिसिव्ह करत नाही,व्हायब्रेट होत असलेल्या मोबईलला बघून का मला धडकी भरल्यासारखे वाटते..? एरवी मी लिहायला घेतलं की किती लिहत असतो,मित्र मैत्रिणींना भेटलो की किती सर्व बोलत असतो,मग कॉलवर बोलण्यासाठी का मी इतका अस्वस्थ होत असावा..?
कळायला मार्ग नव्हता,मी या गोष्टीला घेऊन विचार करत बसलो होतो..!

तितक्यात मोबाईल पुन्हा एकदा व्हायब्रेट झाला व्हॉटसअपवर कोणाचा तरी मॅसेज पडला होता,बघतो तर काय मगाशी कॉल आलेल्या मैत्रिणीचा तो मॅसेज होता..!

तुझं कॉलवरचं आजचं बोलणं मला तू मनानं कुठेतरी हरवल्याचा भास करून देणारं होतं,मान्य आहे आपलं रोज बोलणं होत नाही पण तू तुझ्या एका वेगळ्या विश्वात रममाण असल्याचे तुझ्या बोलण्यातून प्रत्येकवेळी हो,नाही,ठीक आहे,विचार करतो या शब्दांच्या आडून मला माझं मन सांगत असल्याचं भासत होत होते..!
तू असा नाहीयेस अन् इतका शांतही नाहीयेस,काही प्रॉब्लेम्स असेल तर शेअर कर मी आहे तुझ्या सोबत..!

तिच्या या मॅसेजला मी रिप्लाय म्हणून मी टाईप करायला घेतलं अन् पुन्हा तिचा मॅसेज इथे फ्रेंडली अन् फ्रीली बोलणार असशील तरच मॅसेज रिप्लाय कर नाहीतर काही बोलू नकोस तू.
झालं मग पुढे बराचवेळ व्हॉटसअपवरती तिला बोलत बसलो,शेवटी तिनं शेवटच्या मॅसेजला टाईप करून मला सेंड करून दिले अन् मी पुन्हा विचारत पडलो..!

मॅसेज होता..!
इतकं सर्व काही अलबेल असताना तूला कॉलवर बोलतांना तुझ्यासाठी मी इतक्या टोकावरचा विचार केला अन् शेवटी मला एकवेळ ते खरेही वाटले.राग येणार नसेल तर एक विचारू बेस्ट फ्रेंड आहे म्हणून विचारतेय की,एकावेळी दोन आयुष्य जगतो आहेस की,एक जे आयुष्य जगतो आहे त्याचसाठी कन्फ्युज होवून रोज रोज स्वतःच्या आत थोडा थोडा तू स्वतः तुटत जातो आहेस..!

मी तिच्या या मॅसेजला रिप्लाय देत असताना माझी बॅकस्पेसच्या बटनाशी तडजोड व्हायला लागली अन् इतक्या वेळेत ती ऑफलाईन गेली होती.आता तिचा ऑनलाईन वेळेचा शेवटचा सिन मला दिसत होता अन् मला माझ्या मनात आलेला शेवटचा विचार टाईप करत असताना मॅसेज अर्धवट सोडून मी मोबाईल पुन्हा जिथं होता तिथं ठेवला अन् पुन्हा विंडोग्रीलच्या तावदाणापल्ल्याड असलेल्या निसर्गाला न्याहाळू लागलो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...