माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!
माणसांच्या गर्दीत मी असतो,माणसांच्या गर्दीत माझ्या शरीराचं प्रतिनिधित्व मी करत असतो,सगळ्याच ठिकाणी मी शरीराने उपस्थित असतो.जोवर मी माझ्यात असतो,तोवर मला सर्वांचा सहवास हवा असतो..!
जेव्हा मी शरीराने माझ्यात असून मनाने मी माझ्या भविष्यासाठी आखून ठेवलेल्या जगात असतो,तेव्हा मात्र मी कुणाचा नसतो.तेव्हा माणसांच्या जगतात असूनही माणसांच्या सहवासात मी नसतो,मलाच मी शोधत असतो मला जिथे मी माझ्या भविष्यात आखून ठेवलेल्या जगाला शोधत असतो.
मला माणसे नकोसे वाटता,माणसांचा सहवास नकोसा वाटतो.आयुष्याला "जगणं" या अवस्थेचा विचार केला की,मग माझी "जगणं" या अवस्थेला घेऊन मनाची द्विधा मनस्थिती होते.जगण्याला मी कारण शोधू लागतो,आयुष्याला घेऊन मग विचार करू लागतो.मग मला काळोख जवळचा वाटतो..!
दिवसभर गाड्यांचा भार वाहून थकलेला पुल मला आठवू लागतो,एरवी रोजच्या जगण्यात त्याचा विचार त्याच्यावरून गेलं की नेहमीच येतो पण काळोखाच्या वेळी मला त्याला न्याहाळत रहायला आवडतं..!
स्ट्रीट लाईटच्या उजेडात आयुष्यात असलेल्या काळोखात खाचखळग्याच्या वाटेनं मला माझाच आधार व्हायला आवडतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाच्या परिघात मला माझं आयुष्य बंधिस्थ करायला आवडतं.कुणाच्या जगण्याला कारण व्हायला आवडतं आवडत्या माणसांच्या परिघात असलो की किती बोलू अन् किती सांगू असं मग मला होतं..!
आयुष्याला घेऊन जगण्यासाठी जेव्हा आपण कारण शोधू लागतो तेव्हा आपण जगातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असतो.सध्या आयुष्यात मलाही संवेदनशील व्यक्ती व्हायचं आहे अन् त्यासाठी मी आयुष्याला एका योग्य मार्गावर जगण्यासाठी कारणे शोधू लागलो आहे.माणसांच्या भेटीत मला माणसांची पारख करण्याची सवय लागली आहे,वाईट व्यक्तीसुद्धा जवळची वाटू लागली आहे अन् चांगलीही जवळची वाटू लागली आहे..!
चांगल्या व्यक्तीकडून तिच्या यशाच्या गोष्टी ऐकून घ्यायला आवडायला लागलं आहे,वाईट माणसांचा सहवास स्वीकारत काय चूक काय बरोबर दोघे मिळून गप्पात त्यांची वजाबाकी बेरीज करू लागलो आहे.
यामुळे मला काय भेटतं..?
हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा उत्तर एकच असते,जगण्यासाठी मिळालेलं एक योग्य कारण अन् भविष्यात माझ्या आखून ठेवलेल्या जगाकडे,माझ्या विश्र्वाकडे जाण्याचा एक योग्य मार्ग मला भेटत असतो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा