मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझ्या बाबतीत थोडक्यात अन् माझी Interview Story..!

 बाबतीत थोडक्यात अन्  माझी Interview Story..! साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटर्विव्ह देत होतो,इंटर्विव्ह छान चालू होता. Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच. एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..! हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..? तर साधारण पंधरा मिनिटे इंटर्विव्ह झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वरूप कसे अस

आजची भेट :सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.

आजची भेट : सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर. मित्रांनो खूप दिवसांनी आज फावला वेळ भेटला.तो भेटलेला वेळ सार्थकी लावायचा म्हणून खूप दिवसांपासून ज्या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती परंतु वेळेअभावी जमत नसल्याने आजवर जावू शकत नव्हतो.अखेर आज योग जुळून आला अन् काही मित्रांच्या समवेत पिशोर येथील "सिध्देश्वर महादेव मंदिर" या ठिकाणी भेट दिली. ज्यास "रत्नेश्र्वर महादेव मंदिर" या नावाने सुद्धा ओळखले जाते..! "पिशोर" ही मोठी बाजारपेठ असलेलं असं गाव आहे."महाराष्ट्र" राज्यातील महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "औरंगाबाद" जिल्ह्यातील आणि त्यातच "औरंगाबाद" जिल्ह्यातील सर्वाधिक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेल्या,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या "कन्नड" या तालुक्यात राज्य महामार्गावर वसलेलं पिशोर हे गाव आहे अन् या गावात हे सुंदर असे मंदिर आपल्याला बघायला मिळते..! हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील बांधणीचे असून,पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते.परंतु जरासे आडवळणी असल्

एक वेगळं आयुष्य..!

एक वेगळं आयुष्य..! दहा-बारा वर्षांपूर्वीचा तो काळ काहीलीच्या उन्हात मी  फुल चड्डी घालून लाल मातीच्या फुफाट्यात चालत होतो.जिथवर नजर जाईल तिथवर लाल मातीचा फुफाटा,दूरपर्यंत डोळ्यांना दिसणाऱ्या पायवाटा,वाळलेले गवत,चपलीच्या आत घुसून पायाला टोचणारे कुसळ अन् डोक्यातून येणारे घामाचे ओघळ टिपत मी चाललो होतो..! जसं एकदाचं गेटवर आलो तसा अंगाला थंडावा अनुभवयाला आला.क्षणभर घाम टिपून कॉलर नीट केली अन् लाल मातीत माखलेल्या चपलेला डांबरी रस्त्यावर आपटीत-आपटीत मी रस्त्याला लागलो.  रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी मेहंदीची झाडं लावलेली होती,वेळोवेळी कटिंग केल्यानं ती मस्त उंचीला कमी अन् डेरेदार झाली होती.त्यांच्या सावलीत मी चालत होतो,तेरा वर्षांचा मी उंच असल्यानं त्या झाडांच्या वरच्या फाट्या माझ्या डोक्याला लागत होत्या अन् मी  त्या फाट्याला लागलेल्या कोवळ्या पानांचा मेहंदीचा सुगंध हुंगत हुंगत रस्त्याच्या कडेने चालत होतो..! दूरवर कुठल्याश्या किड्याचा किर-किर असा आवाज येत होता,उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यानं सगळी पोरं,सर लोकं घरी गेली होती..! रस्त्यानं मी एकटा चालत होतो मला तरळ भरली अन् मी झा

मुसाफिर..!

मुसाफिर.! नेहमीप्रमाणे सायंकाळ होते अन् मी माझं नेहमीचं सायंकाळचे फिरायला घराच्या बाहेर पडतो.घरापासून असलेल्या सिमेंटच्या रस्त्याने मी चालत राहतो,सायंकाळ होण्यास बराचवेळ बाकी असल्यानं कॉलनीतील सर्वच घरांचे दरवाजे बंद असतात,कॉलनीत सामसूम वाटत असते. माझ्या शुजचा आवाज अन् रस्त्यानं घरे,रस्त्यानं ये-जा करणारी माणसं,बंद-चालू होणारी स्ट्रीट लाईट न्याहाळत मी चालत असतो.काहीवेळ चाललो की लाल मातीच्या जमिनीवर मी चालायला लागतो,मग सिमेंटी रस्ते मागे पडतात.लाल मातीच्या रानात एका सरळ रेषेत चालून चालून तयार झालेल्या पायवाटेने मग मी चालत राहतो..! आता घरे मागे पडलेली असतात,दूरवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचे रान अन् या पायवाटा.लाल मातीच्या फुफाट्यात पडलेल्या बुटांच्या अनेक नक्षी न्याहाळत नवीन बूट कोणता,चप्पल कोणती हे बघत मी चालत असतो.दूरवर कुत्र्यांचा सुळसुळाट त्यांचा भुकण्याचा आवाज ऐकू येत असतो.चीनच्या भिंतीप्रमाणे असलेल्या नवोदय विद्यालय अन् कॉलेजच्या भिंती पलिकडे असलेल्या निरगलिच्या झाडांच्या पानांचा सळसळ वाऱ्याच्या झुळकेने येणारा आवाज अन् त्याच वाऱ्यामुळे माझ्यापर्यंत येणारा त्या झाडांच

तुझ्या आठवांचा दरवळ..!

तुझ्या आठवांचा दरवळ..! माणसं जोडायला हवी आहे,आठवणींचे क्षण जेव्हा आठवांचे होवून डोळ्यासमोरून तरळून जातात तेव्हा आपसूकच तुझ्या आठवणींचा दरवळ माझ्या समीप येऊन मला भेटून जातो..! काही व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात आपल्याला त्या प्रत्येक श्वासासम असतात.ज्या आपल्या जगण्याला कारणी असतात किंवा कारणी ठरतात..! नेहमीसारखीच कालची पहाट तुझ्या आठवांचा दरवळ माझ्या साखरझोपेत घेऊन आली अन् कालची माझी पहाट त्या सुंदर दरवळात नखशिखांत न्हावून निघाली..! कालचा संपूर्ण दिवस हा आठवांचा दरवळ माझ्या संगतीने होता,माझ्या मनावर रूढ झाला होता.चेहऱ्यावर खूप दिवसांनी पुन्हा एकदा अशी अनामिक का होईना तुझी भेट झाली त्यामुळं एक ग्लो होता.आपल्या अनामिक नात्यातील सर्वच कुठल्याही बंधनात न राहून जखडलेल्या सर्वच आठवणींना मी काल मोकळीक दिली होती..! खरं सांगायचं तर आठवणींवर लिहायला घेतलं की मी आठवणींचा होवून जातो,त्यामुळे हल्ली या विषयवार गेले कित्येक वर्ष लिहायचं सोडून दिलं आहे.हे सर्वच आता इतकं अनोळखी वाटतं की लिहायला आता शब्दांची सोबत नसते..! तुझ्या आठवणींचा दरवळ असतो,नसलेली तू सोबत असते,सोसाट्याच्या वाऱ्यात

लोकप्रभा - अंत एका पर्वाचा..!

लोकप्रभा अंत एका पर्वाचा..! काल "लोकप्रभा" साप्ताहिक बंद पडल्याची माहिती मिळाली आणि माझं बालपण,बसस्टँडवर,स्टॉलवर बसून विकलेल्या वृत्तपत्रांच्या संगतीने विकलेले लोकप्रभा साप्ताहिक अन् ते सर्वच क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले..! काय असतं आपल्या बालपणात आपण जेव्हा वाचायला शिकत असतो,तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा ध्यास लागलेला असतो की आपल्याला जे काही नजरेस पडेल त्या शब्दांना आपण जोडून-जोडून वाचत असतो,त्याबद्दल मनात विचार करत असतो.लोकप्रभा साप्ताहिकाचा आणि माझा प्रवास माझ्या आयुष्यात इथपासून सुरु झालेला आहे,त्यामुळं या साप्ताहिकाशी एक नाळ जुळलेली होती..! मला आठवतं स्टॉलवर मी पेपर विकायला बसलो की फावल्या वेळात करिअर मंत्र,स्मार्ट सोबती,हॅलो डॉक्टर,मुक्तरंग,मुक्तपीठ,मंथन,बालमित्र,कुबेर,मैत्र,दीशा,मधुरिमा,ऑक्सिजन या वारानुसार असलेल्या पुरवण्या वाचत बसायचो.त्या वेळच्या बालमनाला हे खाद्य खूप आवडायचं,एकवेळ मी वृत्तपत्र वाचणार नाही पण या पुरवण्या आवर्जून वाचत असायचो..! वेळेनुसार या सर्व पुरवण्या किंवा यातील काही पुरवण्या बंद होत गेल्या अन् वृत्तपत्रात एक भकासपन अनुभवायला मिळाले.

"जय भीम" या नाऱ्याशी जोडलेली गावची एक आठवण..!

"जय भीम" या नाऱ्याशी जोडलेली गावची एक आठवण..! भर दुपारची उन्हं,दुपारची ठरलेली कामे आवरली अन् एका कामानिमित्त आज माझं गाव (आमची शेती-वाडी असलेलं माझं गाव) जवळ केले. गावातली कामे आटोपून परतीच्या वेळेला रिक्षा स्टँडवर येऊन बसलो..! नेहमीच स्वतःची गाडी सोबत असल्यानं,अलीकडे वर्षानुवर्ष इथे कधी फारसे थांबणे होत नाही.आज नेमकी सोबत गाडी नसल्यानं वाट बघत बसलो कितीवेळ रिक्षा लागण्याची..! रिक्षा कधी लागते हा विचार करत जवळच्या एका लोखंडी बाकावर वाट बघत बसलो होतो.भर दुपारची उन्हं असल्यामुळे रिक्षा अन् काही ठराविक प्रवासी सोडले तर कुणीही नव्हते रिक्षा स्टँडवर..! रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मी न्याहाळत होतो.रिक्षा स्टँडवर तासंतास रिक्षाला कधी सीट मिळेल अन् कधी एकदाचे मी इथून निघेल असे मला झाले होते.हा सर्व विचार करत असतांना बालपणीचे दिवस डोळ्यांसमोरून तरळून गेले..! लहानपणी शेतातून आलं की या रिक्षा स्टँडवर येण्यासाठी आम्ही पायीच शेतातून निघावे.आईच्या कड्यावर छोटी बहीण,हातात पिशवी अन् आम्ही दोघं भाऊ पांदीने चालत चालत शेतापासून रिक्षा स्टँडपर्यंत दोन अडीच किमी दूर असलेल्या

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..! मानवजातीची एक गोष्ट मला खूप आवडते,ती ही की तो एकावेळी दोन आयुष्य जगत असतो.एक कल्पनेतील आयुष्य तर दुसरे वास्तवातील आयुष्य. वास्तवातील आयुष्याला घेऊन समाधानी असा कुणी नाही,सर्व काही असूनही या वास्तव आयुष्यात आपण कुठल्यातरी एका त्या अनामिक गोष्टीचा शोधार्थ विचार करत असतो,भटकत असतो.त्यामुळं आपण नेहमीच एका उंचीला जावून विचार करत असतो..! अश्यावेळी काही गोष्टी पूर्णत्वास येतात किंवा काही आपण पूर्णत्वास नेऊ शकत नसतो,ज्यांना अपूर्णत्व प्राप्त होते..! माझ्या बाबतीत काही अश्याच गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी मी कल्पनेतील विश्व अन् त्याच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहेत,म्हणजे कधीतरी पुस्तकात असो किंवा इतरांच्या संवादातून मला माझ्या मनात मी निर्माण केलेल्या जागेबद्दल बोलणे झाले की ती समोरची जागा आपण जी संवादात बोलत आहोत तिची मनात ती ठरलेली आकृती निर्माण होते.माझ्या कल्पनेच्या विश्वात मी प्रवास करू करतो..! हे कल्पनेतील जग खूप सुंदर अन् त्याला कुठलीही वास्तवाची झळ न लागलेलं असं आहे.त्यामुळे इथला माझा हा प्रवास खूप सुखाचा अन् रमणीय असा आहे,जेव्हा या कल्पने

कल्याआईचं मंडळ..!

कल्याआईचं मंडळ..! पहाटेचे आठ वाजले होते मी अजून अंथरुणात पडून होतो,आईची कामाला जायचं म्हणून काम आवरण्याची लगबग चालू होती.माझी झोप केव्हाच झाली होती पण मी लोळत पडलो होतो अंथरुणात. आज मायला काम नव्हतं पण आईची जोडीदारीन कल्याआई मायला म्हणली होती की,दिनकर पाटलांच्या मळ्यात एखाद्या वखताला काम राहील काल पाटील मला चौकात भेटले तेव्हा सकाळी कामाचा खुलासा करतो म्हणून कल्याआईला सांगून गेले होते..! कल्याआई मांगीन आईच्या टोळीची मुकरदंम होती,गावात शेतातली काही कामे असले की गावातले लोकं तिला सांगायची अन् ती तिचं वीस-पंचवीस बायकांचं मंडळ करून त्यांना कामाला घेऊन जायची.सुगीच्या दिवसांत गावात तिचा बोलबाला रहायचा,या दिवसांत गावातल्या सरपंचाला कुणी हुंगायच नाही पण कल्याआईला मात्र सारं गाव शोधत भटकत रहायचं.लोकांना कामासाठी कल्याआई अन् तिचं मंडळ नेहमी लागायचं,कारण कल्याआईची कामातली ईमानदारी,दिलेला शबुद ती पाळायची अन् वखुत पडला तर ती पैश्याला आठ-चार दिसांसाठी शिल्लक थांबायची..! आईनं बिगीबीगी काम आवरलं अन् मी परसात जातो म्हणून आईला सांगून टरमळं घेऊन नदीच्या अंगाला गेलो.आईचं आवरलं आईला कल्याआई घरला

रातराणीचे फुल..!

रातराणीचे फुल..! पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत विंडोग्रीलच्या पडद्याशी माझे अन् उन्हाचे खेळ चालू होते,मी ही सावलीशी खेळत बसलो होतो.खिडकीत असलेला रातराणीचा वेल बहरलेला आहे,त्याची रात्रीच उमललेली फुलं पहाटे सकाळीच सुखून पायाशी लोळण घेत चहूकडे सर्वदूर घरात पसरलेली आहे. रात्रभराचा त्यांचा घरात असलेला सुगंध अन् पहाटेला अंगणात फुललेला प्राजक्त अन् त्याचा सुगंध हा खेळ मला माझ्या लेकीचा घरात ये-जा करत सर्व घरात घिरट्या घालत दुडू दुडू फिरणाऱ्या तिच्या पावलांच्या खेळाप्रमाणे भासतो..! तशी ती आज गेल्या पावली खूप दिवसांनी तिच्या आजोळी पुन्हा येऊन गेली,पोलकं अन् केसांचा एक जिठ्ठु घालणारी लेक आता खूप मोठी भासायला लागली आहे.मामाच्या सवयी तीन वर्षांच्या लेकीला आता कळायला लागल्या आहे,त्यामुळं मामाने तिला तिच्या कलाने घ्यायला हवं तर ही तीन वर्षांची लेक आता तिच्या कलाने मामाला समजावते,लाड करून घेते..! तिच्या आई इतकीच किंवा किंचित जास्तीच समजदार निघाली असे भास होतात हल्ली तिच्या वागण्या बोलण्यातून..! गेल्या पावली आज पुन्हा आजोळी आली आजीच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाला घिरट्या घालू लागली त

गावकुसाच्या आठवणी

गावकुसाच्या आठवणी..! पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत असतांना चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो.तेव्हा मी एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होतो,साधारण दोन महिने झाले होते कंपनी जॉईन करून.नेहमीप्रमाणे सकाळच्या फर्स्ट शिफ्टसाठी मी कामाला गेलो,काम सुरू झाले.साडेअकराच्या सुमारास जेवायला जायचं म्हणून मी प्रॉडक्शन्स डिपार्टमेंटमधून आमच्या प्रॉडक्शन मॅनेजर,सुपरवायझर,माझ्यासारखी तिघे कॅजूअल वर्कर यांच्या सोबतीने जेवायला निघालो..! फार्मा कंपनी म्हंटले की तिथे बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये एसी कम्पल्सरी असतो किंवा कमीतकमी बाहेरच्या तापमानात आणि डिपार्टमेंटमध्ये असलेलं तापमान यात खूप फरक असतो,आतील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा  खूप कमी असते.तर ते उन्हाळ्याचे दिवस होते,आम्ही जेवणाची सुट्टी केली सर्व उपकरणे बंद करून आम्ही सहा जण बाहेर "प्राईमयरी एरिया अँड ड्रेस चॅंजिंग रुम"मध्ये आलो,कंपनीचा विशेष युनिफॉर्म मी बदलवला आणि फ्रेश होवून ब्लॉकच्या मेन गेटवर आलो..! कुठल्याही फार्मा कंपनीत गेले की तिथे शिस्त खूप महत्त्वाची असते,नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते.मेन गेट