बाबतीत थोडक्यात अन् माझी Interview Story..!
साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटर्विव्ह देत होतो,इंटर्विव्ह छान चालू होता.
Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच.
एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..!
हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..?
तर साधारण पंधरा मिनिटे इंटर्विव्ह झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वरूप कसे असते हे थोडक्यात आम्हाला सांग..!
मला इथे प्रश्न पडला की त्यांना खरच Freelance & Content Writer काय असते हे माहीत नसेल का..? कारण हाच प्रश्न मला आजवर कित्येकांनी केला आहे.त्यात अनेकदा सुशिक्षित लोकांचासुद्धा सहभाग होता मग यांना खरच माहीत नसेल का किंवा त्यांना याबद्दल अधिकचे जाणून घ्यायचे असेल..!
या सर्व गोष्टींचा विचार करत असतांना मला एका नवख्या लेखकाने काही महिन्यांपूर्वी तुम्ही Freelnacer आहात तर मग मला अमुक अमुक विषयवार लेख लिहून देणार का असा प्रश्न केला होता ते सर्व आठवलं.
मी त्यांचा विषय घेतला अन् त्यांना तीन दिवसांनी त्या विषयावर एक छान लेख लिहून दिला.पुढे त्यांनी Thanks म्हंटले अन् ते तिथून निघाले..!
मग मी त्यांना म्हंटले या तुम्ही दिलेल्या विषयावर मी जे लेखन केलं आहे त्यासाठी मी काही फिस आकारत असतो,ती तुम्ही मला दिली नाही.ते नवखे लेखक मला म्हंटले तुम्हीतर Freelancer आहात म्हणजे तुम्ही फ्री लिहतात,मग आता का फीस..!
आता मी त्यांना काय बोलणार होतो मी आपलं त्यांना म्हंटले राहू द्या..!
हे सगळं आठवून माझ्या चेहऱ्यावर इंटर्विव्ह चालू असतांना हास्यभाव आले अन् मी एजआर विभागाला त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ लागलो..!
Freelance & Content Writer म्हणजे नेमकं काय..!
Freelance Writer अशी व्यक्ती जी स्वतंत्ररीत्या Freelance वेबसाइट्सवरून स्वतःच्या वेळेनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमवते.फ्रीलान्सर व्यक्ती स्वतःचे स्किल्स वापरून लॅपटॉप,अँड्रोइड मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन पैसे कमवतात.त्यासाठी त्यांना वेळेचे बंधन नसते.तसेच ते डॉलर,Pounds किंवा भारतीय Rupees मध्येसुद्धा पैसे कमवू शकतात..!
सोप्या भाषेत किंवा माझ्या नजरेतून सांगायचं झालं तर मी समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेऊन त्यांना हव्या त्या विषयावर लेखन करून देणं इतकेच.अनेकजण स्वतःचा ब्लॉग चालवतात मग त्या ब्लॉगवर माझ्यासारख्या लेखकांडून समोरची व्यक्ती लेख विकत घेऊन तो तिच्या ब्लॉगवर पोस्ट करते.त्यानंतर अनेक वेबपोर्टल,वेबसाईट्ससाठी,वृत्तपत्र,मासिके,साप्ताहिक,सोशल मीडिया प्लॅटफॉर्म,विविध ब्लॉग्स,Etc यांच्यासाठी एक ठराविक रक्कम घेऊन लेखन करणे होय..!
मग ती ठराविक रक्कम किती हे कसे ठरते..?
तर ज्या प्लॅटफॉर्मसाठी आपण लेखन करतो त्याची मार्केटमध्ये असलेली चर्चा,रोज कितीजण त्या प्लॅटफॉर्मला भेट देता (ट्रॅफिक) किंवा तो किती प्रसिद्ध आहे यावर हे ठरते..!
एका ७००-१००० शब्दांच्या लेखासाठी हा दर २५०-२००० रुपये इतका आहे.(हे सर्व माझे दर आहे यात इतर ठिकाणी फरक असू शकतो.)
(हे सर्व सोप्प्या भाषेत अन् थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे.)
Bharat Sonwane.
MBA - (Production & Operation Management.)
(Freelancer & Content Writer.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा