मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोष्टी_अव्यक्त नात्याच्या पलिकडची व्यक्त होऊपाहणा

हल्ली तुझं माझं हे अव्यक्त नात कुठेतरी एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी दोघांमध्ये प्रयत्न चालु आहे की काय असे वाटत असते.म्हणजे मला इतक्या दिवस असे वाटायचं की मी एकटाच हा प्रयत्न करत असावा.... पण असे नाही अलीकडे तुही एक पाऊल पुढे टाकले आहे,माझ्या पुढे एक स्टेप गेलीय कुठेतरी मनातच मी माझ्या मनाला शाबासकी दिली की अखेर जाणीव झाली आहे... खरच सांगु हे अव्यक्त नात आहेना तेच भावतं मला,म्हणजे इथे काय होते तुझ्याबद्दल नाही माहीत पण मी खुप काळजी करत असतो तुझी तुझ्याबद्दल कायम विचार करत असतो अन् तुझ्यासाठी कीत्येकदा मी स्वतःला हरवत असतो प्रत्येकवेळा आयुष्यात... अलीकडे कुठेतरी यात बदल झाला आहे तेव्हा एकच सांगेल,जितका वेळ हे अव्यक्त नात समजुन घ्यायला घेतला आहेना तितकाच accept करायला घेईल तु पण विचार कर अन् तुझा निर्णय घे.... कारण वेळ खुप कमी आहे अन् कदाचित काही निर्णय तुला वेळेला निभावुन नेण्यासाठी माझ्या व्यतिरिक्तही घ्यायला लागल,जिथे मी नसतांना तू खुश असेल तर मला चालेल.... फक्त स्पष्टपणे तसे व्यक्त करत चल अन् हे अव्यक्त नात व्यक्त करायचं आहे त्यासाठी एक भेट तर होणारच आहे त्या वळणावर,पण त्या वेळा

नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे

नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... मी साधतो संवाद अबोल तुझा आठवणींशी,यावे तू नावेत बसण्या माझ्यापाशी... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... मी खेळ खेळत आहे नजरेचा नजरेशी, यावे कुणीतरी नावेत माझ्या बिलग्नया पाठीशी... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... संथ ते वाहणारे पाणी ठाव काळजाचा घेत आहे,वाट जाण्या नाव माझी पाण्यात मी पाहे.... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... सूर्य उदयाने प्रवास सूर्य अस्त कडे करावा, नियम मी तो जगण्यावर माझ्या लादावा ... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... थकलो मी आहे भिजलो मी आहे,अर्थ नाही जगण्यात वाट मी कुण्या वाटसरूची जाण्यस मी पाहे.... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे... डागडुजी रोजची नावेची हजारदा करून घेतो,उसंत ही मनास तिच्या सोबत प्रवास करण्या कीत्येकदा करवुन देतो... नाव माझी नदि किनारी उभी एकटी आहे.... प्रवास माझा रोजचा नदि किनारीच व्हावा,चक्र फिरते रोज जगण्याचे उपासमारी चा सहवास मी जगण्यात रोजच करावा.... नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे ..... भारत लक्ष्मन सोनवणे ( सौमित्र )

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची

#overwhelmed... काही दिवसांपूर्वी हा शब्द ऐकला अन् मी तो गुगल केला.मला या शब्दाची या शब्दा बद्दल जाणुन घेण्याची आतुरता लागली,मग काय सर्च करत बसलो.... खुप गोष्टी या शब्दाशी जोडलेल्या भेटत गेल्या,हा शब्द कुठेतरी रोजच्या जगण्यातला नसला तरी रोज या शब्दाचा अनुभव,केव्हा त्या परिस्थितीला अनुभवत असतो आपण हे समजले.... अलिकडच्या काळात त्याच एकटेपण त्याला आवडायला लागले आहे,नको त्या गोष्टीशी अन् कीतिही ठरवून सुद्धा हा एकांत पणा अन् त्याची सवय करून घेणं त्याने सोडलं नाहीये.... म्हणजे ते मनाच्या हालचालीसाठी खुप वाईट आहे पण याचं व्यसन जडल की माणूस शुन्यात स्वतःला शोधायला लागतो,मग त्याचं एकटेपण त्याच्या मनावर स्वार होत जात.तो बऱ्यापैकी या जाळ्यात गुंतत जात असतो,कधी तो कायमचा गुंतून जातो कधीही बाहेर न येण्यासाठी नकळत.... हल्ली त्याचा ठराविक माणसांशी अन् ठराविक वेळेतच संवाद होत असतो,इतर वेळी जेव्हा तो माणसांच्या घोळक्यात जाऊन बसतोना तेव्हा तो मोजकेच बोलत असतो.तेव्हा त्याच्या मनाशीच त्याचा संवाद चालू असतो.... मनाशी संवाद अन् मनाला विचारांनी त्रास करून तो विसावलेला असतो मनाने व शरीराने सुद्धा, त्

खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय...

खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! धुसर झालेली खिडकीची तावदाने ही तुझा आठवणींचे आरसे होऊन बघत असतो मी, कल्पनेतले तुझे नितळ निवांत डोळे भेटता हल्ली इथं मला..! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! हल्ली खिडकीच्या आतलं जग तुझ्या आठवणी देऊन जात असतं,तुझ्या भेटीचा एक बहाना असावा तो फक्त थांबण्याच एकच अस कारण कधीच नसतं..! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय..! खिडकी वरच्या पडद्यासही तुझी ओढ असावी हल्ली,वाऱ्यासमवेत तुझ्या येण्यासाठीची ही त्याला चाहुल लागत असावी म्हणुन बघत असतो तो ही तुझी वाट...! खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय... त्या खिडकी पल्याडच्या जगात तु हरवली आहे विसर पडलाय तुला आमचा सर्वांचा,माझ्याही हाती काही नसतं तुला विसर पडलाय अन् मला त्याचा असर झालाय बस बाकी काही नाही... खिडकीत बसुन नं मी कितीदा तुझ्या विचारांना भेटायला बोलवलंय... येशील तु हव्य्यास मला अन् या निर्जीव असुन सजीव माझ्या प्रिय मित्रांना आहे,माझं नाही सांगु शकत मी होऊन जाईल एक दिवस कायमचा निर्जीव प

जगण्यातुन_हरवलेली_लेक_मृगा....

सायंकाळ झाली दीड-दोन वर्षाची मृगा अंगणात असलेल्या लाल मातीत खेळण्यात रमली होती.तिच्या बाजुला तिच्यावर लक्ष ठेवायला तीचा आज्जा खाटेवर बिड्या फुकीत बसला होता.... गल्लीत पिंपळाच्या झाडाखाली मृगाचा बा चिंतेत डोक्याला हात लावून मावळत्या सुर्याला पाहात होता,सांज सरेनाशी झाली होती त्याला  दुपारपासुन उपाशी होता,एक-एक तास त्याला एक दिवसा सारखा वाटत होता.... अधुन-मधुन बायकोला कळा येत असल्या की याच्या जीवाला धडकी भरायची,गावच्याला दावखाणा नसल्यानं बाळंतपण गावच्या म्हाताऱ्या बायकाच करत असायच्या,दिवस मावळतीला आला चहुकडे अंधार पसरला होता. तश्या सुमीच्या वेदना वाढल्या होत्या कळा,तीव्र झाल्या होत्या अन् आता तिला राहवत नव्हतं,अतोनात हाल अपेष्टा सहन करत ती वेळ आली अन् सुमी बाळंत झाली.अन् तिने सुटकेचा निःश्वास सोडला होता..‌‌. घरात बाळ रडण्याचा आवाज आला,अन् मृगाच्या बा च्या डोळ्यांतुन अश्रुंचा दांड वाहु लागला. आजी नातवाला घेऊन तिच्या लेकाकडे आली, मृगाचा बा त्या लाल मासाच्या गोळ्याकडं बघत राहिला.व आसवांचे टिपुस गाळत बसला सर्विकडे आनंद झाला होता.... सुमी निपचित पडुन होती,आता तिच्या बाजुला तिचा लेक तिच्य

अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....

अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... रितेपणाच्या ओंजळीत आशेचे फुलें आहे,सोवळे जगण्याचे कवितेतुनी मी माझ्या गात आहे.... अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... विचारांची विन डोक्यात माझ्या सजली जात आहे,कल्पनेतल्या जीवनातच खरे जगणे आता आहे... अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... हरवलेल्या जाणिवांचा शोध मी घेत आहे,डोळ्यात  आसवांचा फक्त ना विलाजी तो मुक्काम आहे... अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... कल्पने विलासात जगण्याचा आज मुक्काम आहे,दुःखाचे आसवे लपवुन जगण्याचा तो सराव आहे.... अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... ह्रृदयात धडधड करणाऱ्या  जीवात जगण्याची एक ती आशा आहे,एकांतात कवितेच्या जगण्याला माझ्या सलाम आहे... अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे.... लिखित: भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र). रा:कन्नड,जिल्हा: औरंगाबाद.

एक संवाद तिच्या सोबतीचा

एक संवाद तिच्या सोबतीचा .... तो संवाद म्हणजे भुतकाळतील आठवणींची बेरीज वजाबाकी करण्याची ती वेळ असते.मला जे काही चुकीचं बरोबर वाटतं ते आठवत चपखलपणे तिच्याशी व्यक्त करायचं असते, पण ते आजही नाही जमत.मग शांतपणे ऐकणारं ह्रदय तसं बोलण्यापेक्षा शांतपणे तिच्या डोळ्यात बघत ऐकत राहतं.... मग माझे चालू असते मनातच स्वगत खरं तर संवाद असतो अगदी खरा तिच्याबद्दल काय वाटत असते तो.पण भीतीही असते तिला माझे हे तिच्यापाशी व्यक्त होणे आवडले की नाही या प्रश्नाची.... झोंबणार्‍या वार्‍यावर सोडून देतो मग ते आठवणीचे पक्षी अन् नजरेनेच सैर करून येतो आसमंत.ती बोलत असते तिच्या कॉलेज,करिअर,या विषयांवर मी फक्त तिच्या विचारांमध्ये हरवलेलो असतो.... कवेत घ्यायला सारा आसमंत असतो ती ही असते,ओठावर नसलं तरी आत प्रेमाचं रुजणं सुरु असतं.एक वेळ अशीही येते आठवणी मावळत जातात आणि आपल्या आतलं तिचं असणं आपल्याला गच्च मिठी मारुन तिला अन् जगालाही विसरायला लावतं.... अश्या वेळेत तिची हवी असलेली हव्याहव्याची हाव निवते,एरवी आसक्तीच्या गराड्यात ऊगाच रममान होणारा जीव कृष्ण होतो अन् ती राधा होत जाते. एकरुप होणं एकटेपणातच शक्य असतं याची मग

हल्ली मी शाळेत जातो

हल्ली शेताच्या कामामुळे तालुक्याच्या घरापासून आमच्या गावाच्या रस्त्याने बरेचदा ये जा होत असते... सकाळ झाली की माझी तिकडे जाण्याची गरबड चालु होऊन जाते,मी सकाळी शाळेत मुले जातात त्या वेळेला घरून निघतो.... रस्त्याने अनेक मुलं अनवाणी चालत असता कुणी मक्काच्या पिशवीचे केलेले ते दप्तर घेऊन,तर कोणी चांगले दप्तर घेऊन. सकाळी रस्त्याने हे मुले खुप छान भासत असता,अगदी रस्त्याने बागडणारी एक रंगाची फुलपाखरेच जणू .... मी पण त्यांच्या शाळेत जाण्याचा एक हिस्सा व्हावं म्हणून बसवुन घेतो दररोज दोन जणांना शाळेपर्यंत पोचविण्यासाठी. अलीकडे या मुलांची अन् माझी चांगलीच मैत्री झाली आहे,ते लांबूनच दिसले की दादा मला...दादा मला... असे ओरडतात मग मी सगळ्यांना तर नाही घेऊन जाऊ शकत पण दोघांना घेऊन जात असतो.... या त्यांच्या सोबतच्या प्रवासासोबत एक प्रश्न मला पडतो मी कॉलेजला जातो,तिथे मुलांना सिटी मधुन घेऊन जायला-सोडवायला कॉलेजच्या बस आहेत.... तश्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला असाव्या असे वाटते,कारण गरीबाची पोर या गरीब सरकारच्या गरीब शाळेत जातात.माहीत नाही शिक्षणाची किती ओढ त्यांना असते पण घरुन पिशवीत घेतलेला डब्बा

हल्ली मी पण शाळेत जातो

हल्ली शेताच्या कामामुळे तालुक्याच्या घरापासून आमच्या गावाच्या रस्त्याने बरेचदा ये जा होत असते... सकाळ झाली की माझी तिकडे जाण्याची गरबड चालु होऊन जाते,मी सकाळी शाळेत मुले जातात त्या वेळेला घरून निघतो.... रस्त्याने अनेक मुलं अनवाणी चालत असता कुणी मक्काच्या पिशवीचे केलेले ते दप्तर घेऊन,तर कोणी चांगले दप्तर घेऊन. सकाळी रस्त्याने हे मुले खुप छान भासत असता,अगदी रस्त्याने बागडणारी एक रंगाची फुलपाखरेच जणू .... मी पण त्यांच्या शाळेत जाण्याचा एक हिस्सा व्हावं म्हणून बसवुन घेतो दररोज दोन जणांना शाळेपर्यंत पोचविण्यासाठी. अलीकडे या मुलांची अन् माझी चांगलीच मैत्री झाली आहे,ते लांबूनच दिसले की दादा मला...दादा मला... असे ओरडतात मग मी सगळ्यांना तर नाही घेऊन जाऊ शकत पण दोघांना घेऊन जात असतो.... या त्यांच्या सोबतच्या प्रवासासोबत एक प्रश्न मला पडतो मी कॉलेजला जातो,तिथे मुलांना सिटी मधुन घेऊन जायला-सोडवायला कॉलेजच्या बस आहेत.... तश्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला असाव्या असे वाटते,कारण गरीबाची पोर या गरीब सरकारच्या गरीब शाळेत जातात.माहीत नाही शिक्षणाची किती ओढ त्यांना असते पण घरुन पिशवीत घेतलेला