अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
रितेपणाच्या ओंजळीत आशेचे फुलें आहे,सोवळे जगण्याचे कवितेतुनी मी माझ्या गात आहे....
अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
विचारांची विन डोक्यात माझ्या सजली जात आहे,कल्पनेतल्या जीवनातच खरे जगणे आता आहे...
अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
हरवलेल्या जाणिवांचा शोध मी घेत आहे,डोळ्यात आसवांचा फक्त ना विलाजी तो मुक्काम आहे...
अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
कल्पने विलासात जगण्याचा आज मुक्काम आहे,दुःखाचे आसवे लपवुन जगण्याचा तो सराव आहे....
अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
ह्रृदयात धडधड करणाऱ्या जीवात जगण्याची एक ती आशा आहे,एकांतात कवितेच्या जगण्याला माझ्या सलाम आहे...
अस्वस्थ मी आज व्यक्त होत आहे....
लिखित: भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).
रा:कन्नड,जिल्हा: औरंगाबाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा