नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
मी साधतो संवाद अबोल तुझा आठवणींशी,यावे तू नावेत बसण्या माझ्यापाशी...
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
मी खेळ खेळत आहे नजरेचा नजरेशी,
यावे कुणीतरी नावेत माझ्या बिलग्नया पाठीशी...
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
संथ ते वाहणारे पाणी ठाव काळजाचा घेत आहे,वाट जाण्या नाव माझी पाण्यात मी पाहे....
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
सूर्य उदयाने प्रवास सूर्य अस्त कडे करावा,
नियम मी तो जगण्यावर माझ्या लादावा ...
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
थकलो मी आहे भिजलो मी आहे,अर्थ नाही जगण्यात वाट मी कुण्या वाटसरूची जाण्यस मी पाहे....
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे...
डागडुजी रोजची नावेची हजारदा करून घेतो,उसंत ही मनास तिच्या सोबत प्रवास करण्या कीत्येकदा करवुन देतो...
नाव माझी नदि किनारी उभी एकटी आहे....
प्रवास माझा रोजचा नदि किनारीच व्हावा,चक्र फिरते रोज जगण्याचे उपासमारी चा सहवास मी जगण्यात रोजच करावा....
नाव माझी नदी किनारी उभी एकटी आहे.....
भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा