मुख्य सामग्रीवर वगळा

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची

#overwhelmed...

काही दिवसांपूर्वी हा शब्द ऐकला अन् मी तो गुगल केला.मला या शब्दाची या शब्दा बद्दल जाणुन घेण्याची आतुरता लागली,मग काय सर्च करत बसलो....

खुप गोष्टी या शब्दाशी जोडलेल्या भेटत गेल्या,हा शब्द कुठेतरी रोजच्या जगण्यातला नसला तरी रोज या शब्दाचा अनुभव,केव्हा त्या परिस्थितीला अनुभवत असतो आपण हे समजले....

अलिकडच्या काळात त्याच एकटेपण त्याला आवडायला लागले आहे,नको त्या गोष्टीशी अन् कीतिही ठरवून सुद्धा हा एकांत पणा अन् त्याची सवय करून घेणं त्याने सोडलं नाहीये....

म्हणजे ते मनाच्या हालचालीसाठी खुप वाईट
आहे पण याचं व्यसन जडल की माणूस शुन्यात स्वतःला शोधायला लागतो,मग त्याचं एकटेपण त्याच्या मनावर स्वार होत जात.तो बऱ्यापैकी या जाळ्यात गुंतत जात असतो,कधी तो कायमचा गुंतून जातो कधीही बाहेर न येण्यासाठी नकळत....

हल्ली त्याचा ठराविक माणसांशी अन् ठराविक वेळेतच संवाद होत असतो,इतर वेळी जेव्हा तो माणसांच्या घोळक्यात जाऊन बसतोना तेव्हा तो मोजकेच बोलत असतो.तेव्हा त्याच्या मनाशीच त्याचा संवाद चालू असतो....

मनाशी संवाद अन् मनाला विचारांनी त्रास करून तो विसावलेला असतो मनाने व शरीराने सुद्धा, त्या बंदिस्त खोलीत जिच्या आत कदाचितच सूर्यकिरणेही जात असेलच....काय करतो ? माहीत नाही.

एक मात्र आहे त्याचं वाचन अन् लेखन त्याच्या मनावर इतकं हावी झालं आहे की,त्याला रात्री झोप लागत नसली की अधाश्यासारखे तो फक्त वाचत सुटत असतो...

वाचन कोणत असत तर काहीतरी मोटिवेट करणार,नाहीतर असं काही जे त्याला शुन्यातुन बाहेर काढण्यास मदत करेल.पण सभोवतालची परिस्थिती त्याच्या मनावर इतकी स्वार झाली आहे की नाही होत त्याच्याने....

कधीतरी हक्काच्या मैत्रिणींशी त्याचा संवाद फुलत असतो,पण त्याच रीतेपण तो काही मनावरून उतरू देत नसतो.एक मन संवादात असत अन् एक शोधत असत एकांतात एकटेपणात स्वतःलाच...

झुरत असतं,चावत असतं आतल्या आत स्वतःलाच संवादात त्यांच्या सांभाळून घेणं,सांगणंही त्याला कळत असत‌.पण सांगण अन् प्रत्यक्षात करणे याला शक्य नसत...

घरातला संवाद रोजच्या नॉर्मल बोलण्या पुरताच त्याच्यासाठी आहे,झालाच कधी पुढे तर तो स्वतः टाळत असतो त्याला.अन् शून्यात असलेल्या त्याच्या जागेला,त्याच्या जगण्याला बघत असतो तो एकटा मनातल्या मनात खचत....

रोज रोज अंधाऱ्या खोलीतलं एकांतपण त्याच्या मनावर इतकं परिणाम करून गेलं आहे की, उजेडात गेल्यावरही तो सावरत असतो स्वतःला. जगापासुन चाचपडत असतो काहीतरी निराशेच्या गर्तेत हरवून गेल्यासारखं जगाकडे बघत मनातल्या मनातच....

मग सरळ रस्त्याने ठोकर लागणंही असो त्याला आपणच चुकीचं चालतो आहे,हे ही मान्य करता येत नाही.मनालाच सांगत असतो तो रस्त्यात  दगड आला आहे,पण मी बाजुला झालो नाही कारण तो रस्त्यात आला आहे मी नाही त्याच्या..‌..

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची...

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...