#पाऊस_छत्री_आणि_मी... वादळ,वारा,पाऊस सगळं मनासारखे चालु आहे तरीही काहीतरी मागे राहून गेलं आहे.गवतावरचे पाण्याचे दव जसं आपले प्रतिबिंब त्याच्या आत दाखवू शकत नाही,तसेच मागे काय राहून गेले हे माहीत असूनही सांगता येत नाहीये इतकं अस्वस्थ झालंय सर्वच... रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी-छोटी झाडं जगण्यासाठी स्पर्धा करताय.एखादा नाकतोडा येतो अन् भर्रकन उडत जाऊन दोन-तीन झाडांची पानं त्याच्या उडण्याने तोडून टाकतो अन् स्वस्थ बसून राहतो त्या वाटसरू बसलेल्या पुलावर येऊन,त्याला दिसते का काय माहित नाही पण त्याला खूप काही समजते... दुसरीकडे एक तो जो शेणाचे गोल,गोल गोळे करून त्यांना लोटत-लोटत घेऊन चालला आहे... कुठे जातो माहित नाही पण त्याला बघायला खूप आवडते,जगातला सर्वाधिक प्रामाणिक जीव कोणता असेल तर तो हाच असे मला वाटते.कारण त्याच्या आसपास दूरदूर त्याच्या जातीतले कुणीच नसते तर एकटाच तो हे सर्व करत असतो... बाजूला पावसाच्या पाण्याने ओढ्यातून एक चप्पल वाहून आली आहे आर्धी तुटलेली,पण वाहून आल्याने ती मस्त स्वच्छ झालीये.तिला घालून जरासा चौफेर फटकारा मारून आलो तिथेच आजूबाजूला,मऊ मऊ चप्पल एका पाय...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!