#laborlaw. परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते. कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते. आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे... भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल... संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसा...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!