कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो..... त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही..... तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो..... म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते..... नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो..... समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो..... कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!