झाले सुटे दोन शेर आठवणीत तुझ्या, साद गझलेला मला कधी घालता आली नाही..! चार कडव्यांची जीवन कविता माझी,ओंजळ प्राजक्ताने फुलेली गजरा कधी माळता आलाच नाही..! अव्यक्त भावनांना ओठांवर आणणे जमायचे कधीतरी,डोळ्यात मात्र प्रेमाचे भाव उतरवणे जमलेच नाही..! परडीत फुले असेल वेचलेली मोगर्याची,सुगंधात त्यांच्या हरविण्या मला कधीच उसंत नाही..! मी नुकताच तुझ्या विचाराने पांगळा झालो,मनात काहूर आपल्या उद्याचे पण आता जगण्याला वर्तमानच नाही..! रितेपण घेऊन सोबतीला जगणे आपल्याच नशिबी आता,अधुऱ्या कवितेस माझ्या आता शब्दच सुचत नाही..! झाले सुटे दोन शेर आठवणीत तुझ्या, साद गझलेला मला कधी घालता आली नाही..! Written by, Bharat Sonawnae...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!