आज खुप वेळा वाटत आहे तुझ्यासाठी काहीतरी लिहावं,पण मला फारसं नाही व्यक्त होता येत आपल्या माणसांसाठी... तुझं हे अकाली एक्झिट घेणं अजूनही मान्य होत नाहीये,सर्वच मनाला चटका लावुन जाणारं आहे.... माझं मन सिनेमा,मालिका यांमध्ये फारसे रमत नाही,परंतु या विश्वाततली तुझी जी थोडीफार ओळख आहे.ज्यात नेहमीच तू तुझ्या वेगळ्या भूमिकेने माझ्या आठवणीत आहेस... आज तू कायमचा सोडून गेला आहेस,तरीही मी तुझा एकेरी उल्लेख करत आहे.हो अगदी,तो कायम एकेरीच करेल,कारण हे सर्व फक्त हक्काच्या माणसांसाठी आतून आलेले शब्द असतात... काही दिवसांपूर्वी एका इंग्लिश पेपरमध्ये पूर्ण अर्ध्या पानावर तुझा तो ट्रॉफी हातात घेऊन फोटो बघितला.मला राहवलं नाही इंग्लिश मला फारसे समजत नाही,तरीही तो लेख पूर्ण वाचून काढला.यामध्ये बऱ्यापैकी खूप काही कळले,तू खूप उंचीचा स्टार झाला होतास,पण तू ते तुझ्या वागण्यातून कधी व्यक्त केलं नाहीस... दोन वर्षापूर्वी तुला त्या दुर्धर आजारचं निदान झालं,हे जेव्हा कळलं तेव्हा मनात धडकी भरली...यात तु आतुन पुर्णपणे खचला होतास,पण तुझी आजाराशी चालु असलेली लढाई.कधीतरी तुझ्या पारड्यात सुख टाकत होती,तर कधी त...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!