मुख्य सामग्रीवर वगळा

पेरियार भारताचे भविष्य..!

सध्याच्या घडीला भारतात जे अस्थिरतेचे वारे वाहू लागले आहेत. समाजात विचारांना घेऊन जी अस्थिरता, जो कलह निर्माण होतोय आपआपल्यात जे गटतट पडले जात आहे. समाजात जो असंतोष वाढतो आहे, ज्या दिशेने आपल्या देशाचा प्रवास सुरू आहे अश्यावेळी पेरियार यांची आठवण येते.

सध्या देशाला पेरियार यांची विचारसरणी स्वीकारून त्यांच्या तत्वांवर मार्गक्रमण करण्याची गरज आहे का ? असा प्रश्न मला पडतोय. भारताच्या इतिहासात असे काही लोक होऊन गेले ज्यांनी देवाला नाही तर माणसाला मोठं मानलं. त्यापैकी एक म्हणजे पेरियार ई. व्ही. रामासामी.

पेरियार यांच्या या विचार तत्वांमुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांना हिंदू-द्वेष्टा म्हटलं गेलं. पण पेरियार यांचा राग हिंदू माणसावर नव्हता, तर त्या व्यवस्थेवर होता जी माणसाला माणूस मानत नव्हती. आज सध्या भारतात जो राजकीय असंतोष आहे. अस्थिरता निर्माण होऊ बघत आहे हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. आजच्या तरुण पिढीला पेरियार कळतोय पण तो विचारांनी, विचार तत्वांवर पूर्ण भारतात स्वीकारायला का आपल्याला इतकं अवघड जात आहे.

पेरियार नेहमी म्हणत असे की "मी देवाला नाकारतो कारण तो माणसाला विभागतो, मी धर्माला नाकारतो कारण तो माणसाला गुलाम बनवतो." नेमका सध्याच्या घडीला आपल्या देशाचा प्रवास त्यांच्या या वाक्याच्या विरुद्ध दिशेनं सुरू आहे.

सध्याच्या अस्थिर भारतात पेरियार का हवा आहे ?

आजच्या तरुण पिढीला पेरियार कळतोय. सोशल मीडियावर, पुस्तकांत, चर्चांमध्ये तो वाचला जातोय. पण प्रश्न हा आहे की तो विचारांनी, तत्वांवर पूर्ण भारतात स्वीकारायला आपल्याला इतकं अवघड का जात आहे ? सध्याच्या घडीला भारतात जे अस्थिरतेचे वारे वाहू लागले आहेत, ते अस्वस्थ करणारे आहे. समाजात विचारांना घेऊन जो कलह निर्माण होतोय, आपापसात जे गट-तट पडत आहेत, समाजात जो असंतोष वाढतोय. ज्या दिशेने आपल्या देशाचा प्रवास सुरू आहे, ते पाहिलं की एकच नाव आठवतं "पेरियार".

पेरियार यांची विचारसरणी आजच्या तरुण पिढीने बहुतांश स्वीकारली आहे पण; आपल्या देशात पूर्वापार सुरू असलेल्या विचार तत्वांना डावलून पेरियार यांच्या स्पष्ट, उघड तत्वांना स्वीकारणे भारतीयांना जरा अवघड जात आहे.

कारण पेरियार सोपा नाही. पेरियार प्रश्न विचारायला लावतो. तो म्हणतो - डोळे झाकून मानू नका. आणि सत्तेला नेहमीच प्रश्न विचारणारी माणसं नको असतात. त्यांना डोळे झाकून जयजयकार करणारी गर्दी हवी असते

आज तामिळनाडू जे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते - ६९% आरक्षण, महिलांना संपत्तीत समान अधिकार, मंदिरात सर्व जातींच्या पुजाऱ्यांची नेमणूक, शिक्षणात आघाडी - या सगळ्या परिवर्तनाच्या मुळाशी पेरियारच आहेत. आताच्या राजकीय पिढीतील अण्णादुराई, करुणानिधी हे त्यांचेच वैचारिक शिष्य होते. त्यांनी पेरियारचा विचार सत्तेत आणला, आणि तामिळनाडू बदलला.

म्हणूनच आज मला वाटतं या देशाला आज पेरियारची गरज आहे. त्या खिडकीची गरज आहे जी बंद भिंतींच्या घरात हवा आणते. बुद्धीची, समतेची, स्वाभिमानाची खिडकी ती असते.

पेरियार स्वीकारायला हवा. वाचन लेखनाने समृद्ध झालेल्या पिढीने पेरियार केव्हाच स्वीकारला आहे. पण! जोवर समाजात पेरियार यांचे विचार जनमानसात रुजत नाही तोवर. पेरियार खऱ्या अर्थानं भारतीय जनतेला कळणे अवघड आहे. पेरियार विचारांनी जनसामान्यात रुजायला हवा देशाचा विकास जर हवा असेल तर पेरियार यांच्या विचार तत्वांवर आपल्या देशाचा प्रवास व्हायला हवा आहे.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...