मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Smart City - Aurangabad.!

Smart city - Aurangabad..! १९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली.यापूर्वी औरंगाबाद पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतेच.परंतु आता नव्याने होणारी "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची ओळख झाली होती...! नव्वदीच्या दशकात औरंगाबाद शहराची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही औद्योगिक वसाहतीत नव्याने निर्माण झालेल्या कंपन्यांनवर अवलंबून होती.यात मुख्यत्वे बजाज कंपनी ही त्यावेळी औरंगाबाद शहरासाठी खूप महत्त्वाची कंपनी होती ती आजही आहे,आता तिच्या सोबतीने शेकडो कंपन्या आजमितीला शहराच्या चहूबाजूने औद्योगिक वसाहतीत उभारल्या गेल्या आहे..! औरंगाबाद शहरातील काही जुने लोकं आजही म्हणतात की,दिवाळीच्या दिवसांमध्ये जोवर बजाज कंपनीतील कामगारांना बोनस मिळत नाही तोवर शहराची बाजारपेठ ही थंडावलेली असायची अन् ज्या दिवशी दिवाळीचा बोनस कंपनीतून कामगारांना मिळत असायचा त्या दिवशी बाजारपेठ बघण्यासारखी फुललेली असायची..! अर्थात औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे या कंपनीच्या

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..! अलीकडे पहाटेची उन्हं अंगावर यायला लागली आहे काहीच करावेसे वाटत नाही,हातपाय गळून जातात.फक्त मनसोक्त झोपून रहावं,नाहीतर पुस्तकं वाचत निपचित पडून राहावं असं वाटतं.कधी तंद्री लागलीच तर हातात पेन घेऊन किंवा ब्लॉगवर काहीतरी टाईप करत बसावे वाटते,या दिवसातली सकाळ खूप कंटाळवाणी,उदास वाटणारी अन् काहीही करायला नकोसं वाटणारी असते..! पण काही दिवसांना पर्याय नसतो,मग अंगातला आळस झटकून पुढच्या कामाला लागावेच लागते.इतकं सर्व असूनही माझ्या मनात जेव्हा औद्योगिक वसाहतीत भटकंती करायला जायचं आहे हा विचार मनात आला की मी लगेच तयार होवून औद्योगिक वसाहतीच्या भरदुपारी काहिलीच्या ऊन्हात,सूनसान वाटणाऱ्या वाटांना भटकंती करायला निघून जातो..! मला या वाटांशी का इतका लगाव आहे किंवा का मला इतकी जवळीक त्यांच्याबद्दल वाटते हे मला आजवर कळले नाहीये.काहीही साध्य करायचं नसतांना फक्त भटकंती करायची म्हणून कित्येक दिवस मी या अवाढव्य शहराच्या सभोवताली असलेल्या औद्योगिक वसाहतीत पायीपायी भटकंती करत आडमार्गे भटकत राहिलो आहे..! उन्हाळ्याच्या या दिवसात असच वाळलेल्या,भुरक्या पांढऱ्य

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी.

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी. आज पहाटे एक छोटंसं पुस्तक वाचून संपवलं,पुस्तक जितकं छोटंसं होतं तितकंच सुंदर अन् थोडक्यात खूप काही सांगून जाणारं आणि हवंहवंसं वाटणारं असं हे पुस्तक होतं..! "अरुण कुलकर्णी" लिखित "तीन शिल्पकार" हे "६५" पानांचं छोटंसं पुस्तक आज वेळ भेटेल तेव्हा वाचून संपवलं.म्हणजे सलग वाचत बसले तर तासाभरात हे पुस्तक पूर्ण होईल असं हे पुस्तक आहे..! सर्वप्रथम सांगायला आवडेल की जी चित्रकार लोकं आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं..! ज्याप्रमाणे लेखक कुठेही गेला की त्यांच अंतरमन त्याला नेहमीच सभोवताली दिसणाऱ्या निसर्गाबद्दल,त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आपल्या लेखणीत काही कैद करून ते शब्दरुपात उतरवता येईल का हा विचार करायला लावत असतं.अगदी त्याचप्रमाणे चित्रकारसुद्धा असाच विचार करत असतो की माझ्या अंतरमनात चित्राची मी तयार केलेली जीवंत फ्रेम मला कुठे भेटेल का अन् मी स्टॅण्ड लावून केव्हा ती जीवंत फ्रेम मला भेटल्यावर तिला मी केव्हा कॅनव्हासवरती उतरवेल..! तर अश्या चार चित्रकारांची परंतु त्यातील एकाच चित्रकाराची कथा स

सांध्यपर्वाचा कवी कवी.ग्रेस..!

सांध्यपर्वाचा कवी कवी.ग्रेस..! आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन..! दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले.... काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखानाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे...  खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील. कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे .... १९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस. या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आगळ्या

माझी सायंकाळ..!

माझी सायंकाळ..! सायंकाळची वेळ पावलं या छोट्या छोट्या टेकड्यांकडे कुच करतात,मनात असंख्य प्रश्न असतात,रस्त्यानं अनेक अनोळखी चेहरे दिसत असतात.कधीतरी मनात विचार येऊन जातो की या अनोळखी व्यक्तींशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या,बोलतं व्हावं त्यांच्याशी.परंतु पुढच्या क्षणाला हे ही कळून चुकते की,जितका सहज आपण विचार करतो तितकं सहज हे जग नाही,या जगाची अन् जगण्याची येथील माणसांची रित खूप वेगळी आहे..! मग कित्येकदा आपल्याच मनाच्या प्रश्नांना आपणच उत्तर द्यावी,वेड्या मनाला समजूत घालावी अन् आजची सायंकाळ,आजच आपलं संपू्ण जाणं उद्यावर येऊन ठेपल्या जातं इतकंच.छान असतं हे आपल्या विश्वात आपण रममाण राहून आपली प्रश्न सोडवणे.अस्ताला जाणारा सूर्य जसजसा अस्ताला जात असतो तसेतसे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो अन् काळोखात आपल्या आयुष्यात उद्याची कोवळी किरणं आजच्या सांजेला येऊ बघतात..! इतकंच..! मनाची असलेली अवस्था लिखाणात कैद करणं फार अवघड म्हणून अलीकडे त्या अवस्थेला घेऊन लिहने टाळतो. छान आहे अस्ताला जाणारा सूर्य,सांजेच्या वेळी आसमंतात घिरट्या घालणारे पक्षी,दूरवर आपल्या विचारात मग्न राहून

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..! सकाळच्या उदासवाण्या वेळेत पहाटेच उठून आवरून सावरून बसलं की   जसजसा उन्हाचा पारा चढत जातो तसतसे शरीरात मरगळ येत जाते,दिवस नकोसा वाटतो,झोप हवीहवीशी वाटते मग पुन्हा कितीक वेळ निपचित त्राण गेल्यासारखे कॉटवर पडून असतो..! उन्हं अंगावर यायला लागले की पुन्हा जाग येते,संथपणे वाहणारा कोरडा शुष्क वारा नकोसा वाटतो.मी खूप जीवावर करून एखादं अधुरं वाचनाचं पुस्तक हातात घेतलं,तसं आता हातच्याला असलेली सर्वच पुस्तके वाचून संपवली आहे नवीन घेतले किंवा भेटले तर ते वाचूनच मी पूर्ण थांबतो म्हणून वाचन करावं किंवा वाटावं असं सध्यातरी घरात काही नाही,मग जे मिळेल ते वाचत बसतो..! जशी राक्षसाला खाण्याची भूक असते तशी मला अलीकडे अर्थपूर्ण वाचनाची भूक लागली आहे,जी दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या आयुष्यात बराच निवांतपणा आहे त्यामुळं असावं कदाचित.पुढे चालून व्यस्थतेच्या काळात सुद्धा ही भूक अशीच वाढत राहील असे वाटते आहे,शरीराला मनाला ती सवय लावून घ्यायची आहे..! माझी ईच्छा इतकीच आहे आपण इतकी पुस्तके वाचावी,घरात संग्रही करावी की घरात आपल्या वाचनाने समाजातील माहित नाही पण आपल्या घरात

वास्तव्य समुद्र किनारचे..!

वास्तव्य समुद्र किनारचे..! भर सकाळची वेळ कोवळी उन्हं अंगावर येतात,घराच्या सभोवताली असलेल्या पाडांच्या झाडावर गळतीस आलेल्या,वाळलेल्या झावळ्यांचा आवाज झोपल्या ठिकाणी येतो.वाऱ्याचा सुरसुर करणारा आवाज अन त्याच्या लगोलग असलेला समुद्रकिनारी घर असल्यानं पहाटे-पहाटे समुद्राच्या गाजेचा येणारा आवाज झोपेत हे सर्वच संगीत ऐकत मी निपचित पडलेलो असतो..! समुद्र किनाऱ्याशी समीप असलेल्या,झोपडीवजा घरं असलेल्या घरातील किंवा ऐसपेस बंगले असलेल्या घरांची पहाट काही हळुवारच होत असते.त्यांच्या आयुष्यात एक हळुवारपण आलेलं असतं,समुद्राला घेऊन एक आपलेपण असतं,रोजचं भटकणं असो किंवा आयुष्याला घेऊन आयुष्याचे स्वगत करताना आपसूकच समुद्र अन त्याच्या सानिध्यात घातलेली सकाळ असो किंवा सायंकाळ हवीहवीशी वाटणारी असते..! मला नेहमीच समुद्र किनारी असलेल्या सभोवतालच्या परिसरात काळोख अधिकच गडद असल्याची अनामिक जाणीव होत असते,जी सभोवताली असलेल्या महादेवाच्या देऊळात अजूनच प्रकर्षाने जाणवते.एक प्रकारचं दमट वातावरण,देऊळाच्या सभोवताली वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असं काही मनात समुद्र किनारा आला की त्याच्या लागून माझ्या मनात येणा

बोलके शहर..!

बोलके शहर..! शहरातली दुपार अंगावर येते,भर दुपारच्या काहीलीच्या उन्हात मी चालत राहतो,एअरपोर्टजवळ असलेल्या गल्ली बोळातून,सोसायटीच्या अनोळखी रस्त्यांवरून जेव्हा एअरपोर्टच्या समोर असलेल्या महामार्गावर जेव्हा येतो तेव्हा आयुष्याला घेऊन मी अधिकच विचार करायला लागतो..! रस्त्यानं चालत असताना एकीकडे दहा-पंधरा आलिशान गाड्यांचा ताफा जवळून जातो,त्यांचे वाजणारे सायरन कुण्या बड्या नेत्याची त्या पंधरा गाड्यांच्यामध्ये कुठली एक असावी. मी महामार्गावर चालत असतो,एअरपोर्ट समोर रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ गाड्या स्लो होतात अन् माझ्याही पावलांची चालण्याची गती मंदावते,सर्व गाड्या एका पोटोपाट एअरपोर्टच्या गेटवरील वॉचमन त्यांना हजेरी देतो अन् एका पाठोपाठ सगळ्या गाड्या आत जातात,कर्कश्य वाजणारे सायरन शांत होतात..! पुन्हा सर्व पूर्ववत होते अन् वाहणारा रस्ता पुन्हा वाहू लागतो,आयुष्याला घेऊन मी करत असलेले विचार पुन्हा सुरू होतात.रस्त्यांच्या पल्ल्याड रस्त्याला खेटून असलेल्या झोपड्या त्यांच्यात फुलेला गरिबांचा संसार गेली वर्षानुवर्ष मी बघत आहे.कित्येकदा तिथं पोहचले की पावले थबकतात पण शहरात राहायला

"साद सागराची" - "पू.गो.गोखले"

लहानपणी सर्व मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला डिफेन्समध्ये भविष्यात जॉब करायला आवडेल,माझ्या बाबतीतसुद्धा काही वेगळे असे नव्हते शाळेत सरांनी विचारले की भविष्यात तुला काय व्हायचं आहे..? साहजिक मी हेच सांगायचो आर्मीमध्ये जायचं आहे किंवा लेखक व्हायचं आहे,पुढे अनेक अडचणी येत गेल्या अन आर्मीत जायचं स्वप्न स्वप्नच राहिले.परंतु आर्मी असो किंवा इतर कुठल्याही डिफेन्ससंबंधी क्षेत्रासाठी जो आदर मनात निर्माण झाला तो आजही आहे..! आजही वर्दित असलेला पोलीस असो किंवा वर्दीतला जवान दिसला की का माहित नाही पण मी अस्वस्थ होतो,आयुष्यात करिअरसाठी खूप मोठी चूक केली असे यावेळी वाटायला लागतं.परंतु त्यांच्याबाबतीत असलेली रिस्पेक्ट असो किंवा त्यांच्याप्रती असलेल्या आपल्यापणाच्या भावना या आजवर तसूभरही कमी झालेल्या नाही..! आठवलीलाच असताना ठरवलेलं की आपण एनडीएची एक्झाम द्यायची अन् त्यामार्फत देशसेवेसाठी आपली निवड व्हावी म्हणून खूप परिश्रम घ्यावे पण कुठेतरी सर्व थांबले अन् इतकचं... कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे फार व्यक्त होणं नाही जमत मला..! तर गेले दोन दिवस जे पुस्तक मी पुरवून पुरवून वाचत होत

गाव रहाटीचं जगणं..!

गाव रहाटीचं जगणं..! भर दुपारची वेळ उन्हं अंगावर येतात अश्यावेळी गावाची ओढ लागते अन् गावाकडच्या आठवणी जाग्या होतात..! त्यामुळं अश्या सुट्टीच्या दिवशी गावाला येऊन जातो अन् दिवसभर गाव भटकून मनात खूप आतपर्यंत गावाला सामावून घेतो.जेव्हा पुन्हा शहराला जाईल तेव्हा या गावाकडल्या आठवणींवर मग काही दिवस या गाव रहाटीच्या जगण्याचं सुख विचारांनी की होईना अनुभवता येतं..! तर भर दुपारची वेळ,गावातले गडी लोकं या दुपारच्या वेळेला रानात गेलेली असतात.परंतु अश्यावेळी गावात जे कुणी असतं तेच आपल्याला हे गावपण जगण्याचं अन् ते अनुभवण्याचं सुख काय असतं ते सांगत असतात,त्यामुळे मी ही बहुतेकदा दुपारच्या या वेळेलाच गावात जात असतो..! पिंपळाच्या झाडाला चहूकडे बांधलेल्या पारावर अनुभवाची शिदोरी घेऊन बसलेली असतात गावातील वयस्कर मायबाप.त्यांना बघून असं वाटतं की,दुपारचा गावाला पहारा म्हणून ही बसलेली असावी.प्रत्येकाची एक आठवण अन् त्यांच्या आयुष्यात सध्या आलेला निवांतपणा मग पारावर बसून ही प्रत्येकाच्या आयुष्याची कथा सगळ्यांच्या समवेत वाचली जाते,ऐकली जाते.त्या आठवणींना उजाळा देतांना आपल्या जोडीदाराच्या सोनेरी आठवणी

बुकशेल्फमधल्या गोष्टी..!

बुकशेल्फमधल्या गोष्टी..! भर दुपारची वेळ दरवाज्याला असलेला पडदा हलतो,उन्हाच्या झळा,किरणे घराच्या आत येतात.पुन्हा पडदा वाऱ्याच्या संगतीने हलतो पुन्हा घरात काही काळ ओझरता काळोख येतो,गारवा येतो.भर दुपार ही अशीच ऊन सावलीचा खेळ करत निघून जायला येते..! आईची कामे आवरले की आई पंख्याच्या गारव्याखाली जुनाट झालेल्या कपड्यांचे गाठोडे काढते अन् फाटलेली,अंगाला आपरी झालेली कापडं जोडून आई गोधडी शिवायला घेते.मी आईला सुई ओवून देतो,साडीचं माप काढुन देतो,शिवताना शिवलेले एका ओळीत यावे म्हणून फोडलेल्या बोळक्याचा खडू करून त्या साडीवर रेषा पाडून देतो अन् आई जुन्या ओव्या म्हणत शिवत राहते गोधडी..! दिवसभर मी सुई ओवून देतो,आई शिवत राहते.मी बसलेलो असतो विंडोग्रीलच्या शेजारी असलेल्या कॉटवर हातात पुस्तक घेऊन,पुस्तकातील एक एक पान वाचून होत राहतं,आईची दर तिसऱ्या पानाला गोधडी शिवायची एक ओळ पूर्ण होत राहते.माझ्या मनात असंख्य विचार चालू असतात,आईच्या ओव्या माझ्या विचारागानिक बदलत असतात..! आई गोधडी शिवत असते,मी पुस्तक वाचत असतो,आई ओव्या गात असते,मी कवितांना घेऊन विचार करत असतो.जगण्यात आलेल्या हळुवारपणाला घेऊन मी

पळस फुलला..!

पळस फुलला..! पानगळीचे दिवस सुरू झाले अन् डोंगरे-टेकड्या भटकंतीसाठी खुणावू लागल्या होय,हिरवळीच्या दिवसांत शक्यतो मी डोंगरदर्यात फार भटकंती करत नाही.या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सर्वदूर झाडांची पाने गळून पडलेली असतात,सर्वदूर डोंगरात त्यांचा सडा असतो..! सोबत जोड असते ती कोरड्या शुष्क वाऱ्याची,जलदगतीने कानाला ऐकू येणारा वाऱ्याचा सूर-सूर आवाज,मांडीपर्यंत वाळून ढवळे,भुर्के पडलेले तन,सर्व डोंगर शांत,भयाण या दिवसांत भासत असतो.सर्वदूर वाळून गेलेली झाडं अन् त्यांचा तो तपकीरी रंग डोळ्यात साठवून घेत आपण डोंगरातील खाच-खळगे हुडकत फिरत असतो..! या दिवसात सहज नजरी पडणारी गोष्ट म्हणजे दिमकाची बांबी,का माहीत नाही पण या दिवसात जंगलात गेलं की माझ्यातला बिअर ग्रिल्स जागा होतो अन् दिवसभर एका पाण्याच्या बाटलीच्या सहारे मी या डोंगररानात भटकंती करत असतो..! गावरानाला,शेताला या दिवसांत गवत संपले असल्यामुळे गावचे गुराखी लोकं,गुरखी कसले पंधरा-सतरा वर्षांची ही पोरं आपले ढोरं,बकऱ्या या डोंगराच्या माथ्यावर घेऊन येतात अन् त्यांना चरायला म्हणून मोकळं सोडून देतात.ते बसतात आपलं न्याहाळत या डोंगररानाला

"जननायक तंट्या भिल्ल" - "बाबा भांड".

"जननायक तंट्या भिल्ल" - "बाबा भांड". "जननायक तंट्या भिल्ल" "बाबा भांड" लिखित हे १२७ पानांचे पुस्तक काल तीन तासात वाचून संपवले.खूप दिवसांची हे पुस्तक वाचण्याची इच्छा होती. "लाल्या मांग" यांच्या स्मृतीस्थळाला काही दिवसांपूर्वी भेट दिली अन् त्यापूर्वी त्यांचे चरित्र मी वाचून होतोच,सोबतच अनेकवेळा ऐकूनही होतो की "लाल्या मांग" अन् "तंट्या भिल्ल" यांचे चरित्र अन् यांचे जीवन कुठेतरी एका सारख्याच कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं..! याचसाठी मलाही "तंट्या भिल्ल" यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती अन् काल या पुस्तकातून ती पूर्णत्वास आली.दोघांचा शेवट हृदयाला स्पर्शून अन् चटके लावून जाणारा असा आहे. थोडक्यात पुस्तकाबद्दल अन् त्यांच्या आयुष्याबद्दल लिहण्याचा प्रयत्न करतो आहे. तंट्या भिल्ल हा अठराशेच्या शतकातील आदिवासी नायक तो स्वभावाने खूप साधा- भोळा अन् मेहनती होता.त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकविली अन् पुढे कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्यास खोट्या गुन्ह्यात अडकवले,ज्यात तंट्यास एक वर्षाची

Book-Letter's From Jail" - "M.N.Roy".

Book-  Letter's From Jail" - "M.N.Roy". "Letter's From Jail" - "M.N.Roy". अनुवादित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" - "द्बा.भ कर्णिक". परवा सकाळी वाचायला घेतलेलं - "द्बा.भ कर्णिक" लिखित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" हे  १८१ पानी पुस्तक काल दुपारी अखेरीस वेळ मिळेल तेव्हा वाचून संपवले..! पुस्तक खूप रेअर असं आहे.पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा प्रवास हा खूप अनोखा अन् वेगळा आहे.म्हणजे आपण जर जेलमध्ये असताना पाठवलेले पत्र कसे असेल ही कल्पना करून जर पुस्तक वाचणार असाल तर तुमची निराशा होईल..! कारण लेखकांनी या पुस्तकात अनेक विषयांना हात घातलेला आहे,त्यामुळे वरवर हे खूप सहज समजेल असे पुस्तक नाही.यात एकतर तुम्हाला स्वतंत्रपूर्व भारताचा अन् त्या काळातील जगाचा इतिहास जाणून घेण्याची किंवा काही प्रमाणात तो माहिती असायला हवा आहे.तेव्हाच हे पुस्तक तुम्हाला जवळचे वाटेल नाहीतर आपण फक्त जेलमधील नायकाचे वास्तव्य,त्याला येणाऱ्या अडचणी इतकंच या पुस्तकातून समजू शकू..! पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा म्हणजे त्या पुस्तकातील जेलमध्य

पुस्तक-माहेरी गेली, धर्मा गोविन्द..!

पुस्तक-माहेरी गेली-धर्मा गोविन्द. काल "धर्मा गोविन्द" लिखित "माहेरी गेली" हे "११६" पानांचे पुस्तक पहाटे दोनच तासात वाचून संपवले अन् एक अनामिक ओढ मॉरिशिसमध्ये वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांची लागली, हे सर्व का..? याला उत्तर नव्हते,पुस्तकाबद्दल काय लिहावं हे ही समजत नव्हते.कथा फार काही विशेष अशी नव्हती पण एका आगळ्या वेगळ्या धाटणीची होती,त्यामुळं थोडक्यात काहीतरी माहितीपूर्ण लिहावं हा विचार मनात येऊन गेला..! परंतु लिहावं तरी काय..? हा प्रश्न होता मग ठरवूनच प्र.श्री.नेरूरकर यांनी पुस्तकात मोरस मराठी आणि मॉरिशिसमधील मराठी भाषिक लेखन याबद्दल जे काही लिहले आहे ते येथे लिहावेसे वाटले..! "माहेरी गेली" ही धर्मा गोविन्द यांची कहाणी मॉरिशिस बेटावरील पूर्वेकडील अशा एका घनदाट अरण्यग्रस्त काळ्या नदीच्या परिसरात घडते.की ती स्थलकाळपात्रे या संदर्भात समजून घेण्यासाठी मॉरिशिस  बेटाची,सभोवतालची भौगोलिक रचना सुबुद्ध वाचकाने समजून घेणे आवश्यक आहे..! तामरिन वे किंवा तामरिन किंवा तामार खेडे गावातील मोर्णे,शामारेल,बे ज्यूकॅम्प या घनदाट व हिंदी महासागराला रुद

एमआयडीसी डायरी..!

एमआयडीसी डायरी..! भर दुपारच्या उन्हात दीडच्या सुमारास हॉस्टेलरुमच्या खोलीत सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जायची तयारी होत असते.अंगात त्राण नसतो,घामाचे ओघळ चेहऱ्यावर येत असतात त्यांना सावरत फ्रेश होवून कंपनीचा युनिफॉर्म घातला जातो.तो घातल्यावर आरश्यात बघितले की काळजाची धडधड वाढते,मग पुन्हा खूप जीवावर करत तो दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट घालून त्याच्या लेसशी बराचवेळ खेळून झालं की पुन्हा एकदा आरश्यात बघून स्वतःला नीटनेटके आवरले आहे का हे बघून हॉस्टेल मधून निघतो.एरवी दोन वाजलेले असता,कंपनीत एक टाईम नाश्ता,जेवणाची सोय असल्यानं तेव्हढे टेन्शन कमी होते..! एमआयडीसी परिसरातच हॉस्टेल असल्यानं पायीच कंपनीत जातो,या वीस मिनिटाच्या प्रवासात आयुष्याला घेऊन किती प्रश्न मी स्वतःला करतो याची गिणती नाही.डांबरी रस्त्याची वाट असल्यानं,रस्त्यावरील डांबर डोक्यातून येणाऱ्या घामाप्रमाणे त्याचे ओघळ सोडवत चमकत असतं,त्याचं हे चमकणेही जीवाला नकोसे वाटते,जीव घाबरा होतो. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी बेसुमार वाढलेलं कांग्रेजाचे जंगल त्याचा येणारा वास.तीस-चाळीस सेकंदाला माझ्यासारख्या एखाद्या मुलाची जुनी झालेली पण