पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी.
आज पहाटे एक छोटंसं पुस्तक वाचून संपवलं,पुस्तक जितकं छोटंसं होतं तितकंच सुंदर अन् थोडक्यात खूप काही सांगून जाणारं आणि हवंहवंसं वाटणारं असं हे पुस्तक होतं..!
"अरुण कुलकर्णी" लिखित "तीन शिल्पकार" हे "६५" पानांचं छोटंसं पुस्तक आज वेळ भेटेल तेव्हा वाचून संपवलं.म्हणजे सलग वाचत बसले तर तासाभरात हे पुस्तक पूर्ण होईल असं हे पुस्तक आहे..!
सर्वप्रथम सांगायला आवडेल की जी चित्रकार लोकं आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं..!
ज्याप्रमाणे लेखक कुठेही गेला की त्यांच अंतरमन त्याला नेहमीच सभोवताली दिसणाऱ्या निसर्गाबद्दल,त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आपल्या लेखणीत काही कैद करून ते शब्दरुपात उतरवता येईल का हा विचार करायला लावत असतं.अगदी त्याचप्रमाणे चित्रकारसुद्धा असाच विचार करत असतो की माझ्या अंतरमनात चित्राची मी तयार केलेली जीवंत फ्रेम मला कुठे भेटेल का अन् मी स्टॅण्ड लावून केव्हा ती जीवंत फ्रेम मला भेटल्यावर तिला मी केव्हा कॅनव्हासवरती उतरवेल..!
तर अश्या चार चित्रकारांची परंतु त्यातील एकाच चित्रकाराची कथा सांगणारे हे छोटंसं पुस्तक.
साधारण सुरुवात अशी आहे की,हे चार मित्र निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्याला काही सुंदर चित्र काढता येईल का हा विचार करता.त्यासाठी ही मित्र कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आपलं काही दिवसांचे वास्तव्य कँपमध्ये करतात.सभोवताली असलेल्या निसर्गाला आपल्या सुंदर सुंदर चित्रामध्ये ते उतरवतात..!
यातील एका मित्राला पुस्तकाच्या शीर्षकातले ते "तीन शिल्पकार" भेटतात अन् मग त्यातील एका चित्रकाराचा प्रवास सुरू होतो.त्याला एक कुटुंब भेटतं.झोपडीवजा असलेलं त्यांचे घर,त्यात त्या स्त्रीच्या,तरुण मुलीच्या अन् त्या माणसाच्या अंगावर असलेले मोजके कपडे,त्यांच्या त्या जगण्याला घेऊन असलेल्या खूप कमी गर्जा,त्यांना नकोसा वाटणारा पैसा,नदीच्या पाण्यात मासे पकडून त्यांचा चालणारा उदरनिर्वाह,त्या माणसाचे रापलेले अन् पिळदार शरीर,त्या तरुणींचं अन् त्या बाईचे सावळे अंग परंतु मनाला मोहून टाकणारी शरीरयष्टी,शरीरावर असलेली ती आकर्षित वळणं,गरीब असूनही त्यांना मिळालेलं सौंदर्य,त्यांना नसलेली कुठली लज्जा कारण या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यात नसलेला कुठलाही लवलेश,देवावरची त्यांची श्रद्धा,त्या चित्रकाराला आपल्या घरातील सदस्यासारखे समजणे त्याला मदत करणे..!
मग चित्रकाराने त्यांचे चित्र काढणे,त्याचे प्रदर्शन भरवणे,तो खूप मोठा चित्रकार होणे दोन-तीन वर्षांनी तो पुन्हा या कुटुंबाला भेटायला म्हणून पुन्हा त्याच जागेवर जाणे परंतु त्यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होणे.गावाला पुर येणे अन् त्यांची झोपडी वाहून जाणे,यात ते तिथून नाहीसे होणे अन् खूप काही सांगणारा हा प्रवास आहे..!
आयुष्याची कित्येक गणितं शिकवणारे हे छोटेसे पुस्तके नक्कीच सर्वांनी वाचायला हवं आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा