पुस्तक-माहेरी गेली-धर्मा गोविन्द.
काल "धर्मा गोविन्द" लिखित "माहेरी गेली" हे "११६" पानांचे पुस्तक पहाटे दोनच तासात वाचून संपवले अन् एक अनामिक ओढ मॉरिशिसमध्ये वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांची लागली,
हे सर्व का..?
याला उत्तर नव्हते,पुस्तकाबद्दल काय लिहावं हे ही समजत नव्हते.कथा फार काही विशेष अशी नव्हती पण एका आगळ्या वेगळ्या धाटणीची होती,त्यामुळं थोडक्यात काहीतरी माहितीपूर्ण लिहावं हा विचार मनात येऊन गेला..!
परंतु लिहावं तरी काय..?
हा प्रश्न होता मग ठरवूनच प्र.श्री.नेरूरकर यांनी पुस्तकात मोरस मराठी आणि मॉरिशिसमधील मराठी भाषिक लेखन याबद्दल जे काही लिहले आहे ते येथे लिहावेसे वाटले..!
"माहेरी गेली" ही धर्मा गोविन्द यांची कहाणी मॉरिशिस बेटावरील पूर्वेकडील अशा एका घनदाट अरण्यग्रस्त काळ्या नदीच्या परिसरात घडते.की ती स्थलकाळपात्रे या संदर्भात समजून घेण्यासाठी मॉरिशिस बेटाची,सभोवतालची भौगोलिक रचना सुबुद्ध वाचकाने समजून घेणे आवश्यक आहे..!
तामरिन वे किंवा तामरिन किंवा तामार खेडे गावातील मोर्णे,शामारेल,बे ज्यूकॅम्प या घनदाट व हिंदी महासागराला रुद्रभीषनपणे भिडलेल्या पहाडी भागात धर्मा गोविन्द यांच्या कथेतील मराठी पात्रे वावरतात.मराठी माणसे प्रथम बोटी भरभरून ब्रिटिश दलालांनी मॉरिशिस बेटावर नेली व त्यांना राहण्यासाठी बेटावरील स्थळांची निवड करण्याची संधी दिली तेव्हा मराठी मजुरांनी काळी नदी व तिचा पहाडी प्रदेश पसंत केला..!
यास कारण म्हणजे महाराष्टातून आलेल्या मराठी मंडळीला हा पहाडी विभाग सह्याद्री पर्वताच्या व भीमा,कृष्णा,गोदावरी नदीच्या प्रदेशासारखा थेट वाटला.साधारण १९८५ च्या काळात नदीच्या प्रदेशात त्यावेळचे मराठी समाजाचे नते व दृष्टे कै.लक्ष्मणराव व सौ.भगीरथाबाई पवार यांनी बांधलेले विठोबा रखुमाई यांचे देऊळ गेले १२० वर्ष उभे आहे..!
धर्मा गोविन्द या परिसरातील मराठी माणसांच्या जीवनाशी "जो होय एक सुख दुखपणी गडी ता" असे समरस झालेले आहेत.या बेटावरील कष्टकरी,कामकरी,खेडूत स्त्री - पुरूष,तरुण - तरुणी यांची कहाणी अदभुत व अभिजात मोरस मराठी भाषेत सजीव साकार केली आहे. "माहेरी गेली" या कथेतील काहीसे गूढ,अदभुत व अमूर्त वातावरण धर्मा गोविन्द थेट नेऊन मानवी सुखदुःखाच्या आंतरिक परंतु अनाकलनीय वास्तवाला विलक्षण प्रत्ययकारिकतेने,कलाकमक्तेने नेऊन भिडवितात..!
हजारो मैलावरच्या हिंदी महासागराच्या पोटातून कधीकाळी प्रचंड भूकंप होवून जलपृष्ठावर आलेल्या मॉरिशिस बेट नावाच्या इवल्याश्या भूखंडावर वावरणारी ही कष्टकरी माणसे एका आपल्या भूत,वर्तमान व भविष्यकालीन भवितव्याशी जशी निगडित आहे तशी एका विशिष्ठ समाज रचनेतही त्यांचे सामाजिक,मानसिक व आत्मिक पोषण झाले आहे.तशातही जातपात टिकून राहते पण तिला छेद मिळत जातो.धर्मा गोविन्द यांनी केलेल्या मोरस मराठी समाजातील लोकगीतांचा वापर त्यांच्या कहाणीला उत्कट,भावनिक परिमाणे प्राप्त करून देतो..!
अशी ही छोटीशी प्रेमकथा मॉरिशिस बेटावर घडते की नक्कीच वाचायला हवी आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा