Smart city - Aurangabad..!
१९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली.यापूर्वी औरंगाबाद पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतेच.परंतु आता नव्याने होणारी "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची ओळख झाली होती...!
नव्वदीच्या दशकात औरंगाबाद शहराची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही औद्योगिक वसाहतीत नव्याने निर्माण झालेल्या कंपन्यांनवर अवलंबून होती.यात मुख्यत्वे बजाज कंपनी ही त्यावेळी औरंगाबाद शहरासाठी खूप महत्त्वाची कंपनी होती ती आजही आहे,आता तिच्या सोबतीने शेकडो कंपन्या आजमितीला शहराच्या चहूबाजूने औद्योगिक वसाहतीत उभारल्या गेल्या आहे..!
औरंगाबाद शहरातील काही जुने लोकं आजही म्हणतात की,दिवाळीच्या दिवसांमध्ये जोवर बजाज कंपनीतील कामगारांना बोनस मिळत नाही तोवर शहराची बाजारपेठ ही थंडावलेली असायची अन् ज्या दिवशी दिवाळीचा बोनस कंपनीतून कामगारांना मिळत असायचा त्या दिवशी बाजारपेठ बघण्यासारखी फुललेली असायची..!
अर्थात औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे या कंपनीच्या चक्रावर फिरत असायचे इतका रोजगार त्यावेळी बजाज माध्यमातून कामगारांना बजाज कंपनी देत होती अन् त्यामुळेच कदाचित औरंगाबादकरांचे "हमारा बजाज"शी एक भावनिक नाते आहे..!
असो बजाज कंपनीला घेऊन मी औरंगाबाद शहराची ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नवीन ओळख थोडक्यात सांगितली आजमितीला अश्या अनेक कंपन्या या औरंगाबाद शहराशी जोडल्या गेल्या आहेत अन् औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख देण्याचं काम यासर्व कंपन्या करत आहे..!
माझ्यामते जवळजवळ बऱ्यापैकी औरंगाबाद शहराची अर्थव्यवस्था,आर्थिक उलाढाल ही औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या कंपन्यांच्या बळावर औरंगाबाद शहर करत आहे.आशिया खंडात एक नवी ओळख औरंगाबाद शहराला नव्वदीच्या दशकातच "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही ओळख वाळूज एमआयडीसी,चिखलठाण एमआयडीसी,चितेगाव एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरातील एमआयडीसी,रांजणगाव एमआयडीसी यांनी तर दिली..!
परंतु आता नव्याने उभारलेली अवघ्या आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणजेच पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहत,ऑरिक सिटीसारखे भव्यदिव्य प्रोजेक्ट्स यामुळे ही ओळख औरंगाबाद शहराला मिळालेली आहे..!
औरंगाबाद शहर फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल एरियासाठी मर्यादित न राहता फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपलं स्वंतत्र नाव उभे करत आहे.आज देशा-परदेशातील नामांकित फार्मा कंपन्या या औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत आपले प्लांटस उभे करत आहे काही वर्षानूवर्ष चालू आहेत..!
आयटी क्षेत्रातसुद्धा आपल्या शहराचा आलेख हळूहळू का होईना गेले काही वर्ष उंचावता आहे,बऱ्याच छोट्या-छोट्या कंपन्या या औरंगाबाद शहरात आयटी पार्कमध्ये आपली नावे करत आहेत..!
हे सगळं बघता आणि औरंगाबाद शहराचे अर्थकारण बघता रिअल इस्टेट क्षेत्रातसुध्दा शहर कसे मागे राहील,गेल्या दोन दशकात औरंगाबाद शहरातील नागरिकांनी रिअल इस्टेट विश्वात केलेली गुंतवणूक आणि त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे उभे राहिलेले असंख्य प्रोजेक्ट्स,फ्लॅट सिस्टम,रो-हाऊसेस यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे सगळं विचार करायला लावणारं आहे अन् आपले शहर कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हा ही विचार अश्यावेळी मनात येऊन जातो.
आशिया खंडात सर्वाधिक महाग घरांच्या किंमती असो किंवा जागेच्या किंमती यांची नोंद असलेल्या यादीतसुद्धा औरंगाबाद शहराची पुणे शहराची बरोबरी करू बघत आहे..!
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा