मुख्य सामग्रीवर वगळा

"साद सागराची" - "पू.गो.गोखले"


लहानपणी सर्व मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला डिफेन्समध्ये भविष्यात जॉब करायला आवडेल,माझ्या बाबतीतसुद्धा काही वेगळे असे नव्हते शाळेत सरांनी विचारले की भविष्यात तुला काय व्हायचं आहे..?

साहजिक मी हेच सांगायचो आर्मीमध्ये जायचं आहे किंवा लेखक व्हायचं आहे,पुढे अनेक अडचणी येत गेल्या अन आर्मीत जायचं स्वप्न स्वप्नच राहिले.परंतु आर्मी असो किंवा इतर कुठल्याही डिफेन्ससंबंधी क्षेत्रासाठी जो आदर मनात निर्माण झाला तो आजही आहे..!

आजही वर्दित असलेला पोलीस असो किंवा वर्दीतला जवान दिसला की का माहित नाही पण मी अस्वस्थ होतो,आयुष्यात करिअरसाठी खूप मोठी चूक केली असे यावेळी वाटायला लागतं.परंतु त्यांच्याबाबतीत असलेली रिस्पेक्ट असो किंवा त्यांच्याप्रती असलेल्या आपल्यापणाच्या भावना या आजवर तसूभरही कमी झालेल्या नाही..!

आठवलीलाच असताना ठरवलेलं की आपण एनडीएची एक्झाम द्यायची अन् त्यामार्फत देशसेवेसाठी आपली निवड व्हावी म्हणून खूप परिश्रम घ्यावे पण कुठेतरी सर्व थांबले अन् इतकचं...
कारण हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे फार व्यक्त होणं नाही जमत मला..!

तर गेले दोन दिवस जे पुस्तक मी पुरवून पुरवून वाचत होतो ते पुस्तक आज संपले एका सामान्य परिवारात जन्मलेल्या मुलाची ही कहाणी आहे ज्याने असंख्य अडचणींना तोंड देत नेव्ही क्षेत्रात नावलौकिक मिळविले,त्याच्या प्रवासाची कथा सांगणारे हे पुस्तक..!

पुस्तकाचे नाव - साद सागराची.
लेखक - पू.गो.गोखले.
प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य,संस्कृती मंडळ.,मंत्रालय मुंबई..!

पुस्तकाच्या बाबतीत थोडक्यात.

हे पुस्तक लेखकाने चार भागात लिहले आहे.पहिल्या भागात ब्रिटिशांचे सैन्य भरतीचे धोरण,या लेखकाला आलेले त्यांचे व्यक्तिगत अनुभव त्यांनी या पुस्तकात थोडक्यात उल्लेखिले आहेत..!

जेव्हा लेखक काळाच्या ओघात मागे वळून पाहता त्यांनी जे अडचणी,जे प्रसंग उद्भवले त्यांना लेखक कसे बघतात,त्यांना लेखकांनी कसे तोंड दिले हे सर्व या पुस्तकात वर्णन केले आहे.लेखकांनी इच्छा व त्यानुसार केलेलं परिश्रम याच्या पार्श्वभूमीवर पाहिल्यास हे पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल असे मला वाटते..!

दुसऱ्या भागात लेखक प्रत्यक्षात नौदलात भरती झाल्यावर वेगवेगळ्या प्रसंगांना त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. उदा.नौदलातील बंड,व्यक्तिगत संबंध, पानसुरूंग (Mines) व त्यांच्या नकाशा इत्यादी प्रसंग लेखकांनी मांडलेले आहेत.

तिसऱ्या आणि चौथ्या भागात नेव्हीच्या ज्ञाच्याऊ भांडवलावर मिळालेली नोकरी,उद्योगधंदा यांच्या प्रवासात आलेले विविध अनुभव किंवा सहसा अवगत न होणारी माहिती इत्यादी गोष्टी लेखकांनी पुस्तकात संपादित केली आहे.
लेखकाच्या आयुष्यातील हा रोमांचकारी अन खूप सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...