Book- Letter's From Jail" - "M.N.Roy".
"Letter's From Jail" - "M.N.Roy".
अनुवादित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" - "द्बा.भ कर्णिक".
परवा सकाळी वाचायला घेतलेलं - "द्बा.भ कर्णिक" लिखित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" हे १८१ पानी पुस्तक काल दुपारी अखेरीस वेळ मिळेल तेव्हा वाचून संपवले..!
पुस्तक खूप रेअर असं आहे.पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा प्रवास हा खूप अनोखा अन् वेगळा आहे.म्हणजे आपण जर जेलमध्ये असताना पाठवलेले पत्र कसे असेल ही कल्पना करून जर पुस्तक वाचणार असाल तर तुमची निराशा होईल..!
कारण लेखकांनी या पुस्तकात अनेक विषयांना हात घातलेला आहे,त्यामुळे वरवर हे खूप सहज समजेल असे पुस्तक नाही.यात एकतर तुम्हाला स्वतंत्रपूर्व भारताचा अन् त्या काळातील जगाचा इतिहास जाणून घेण्याची किंवा काही प्रमाणात तो माहिती असायला हवा आहे.तेव्हाच हे पुस्तक तुम्हाला जवळचे वाटेल नाहीतर आपण फक्त जेलमधील नायकाचे वास्तव्य,त्याला येणाऱ्या अडचणी इतकंच या पुस्तकातून समजू शकू..!
पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा म्हणजे त्या पुस्तकातील जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगणर्या कैद्याचा हा सहा वर्षांचा प्रवास पत्रांच्या माध्यमातून खूप हळुवार लेखकाने पुस्तकात उलगडलेला आहे.नायकाला झालेली बारा वर्षांची शिक्षा पुढे ती कमी होवून सहा वर्षांची होते अन् त्याने या सहा वर्षात त्याच्या पत्नीशी केलेल्या पत्रव्यवहारास लेखकाने पुस्तकात उतरवले आहे..!
स्वतंत्रपूर्व काळात आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी सश्रम कारावास भोगला,यातीलच एक हे क्रांतिकारक असावे असे मला वाटते.कारण त्यांनी शेवटच्या पत्रापर्यंत कुठेही त्यांचा किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला पत्रात दिसुन येत नाही..!
सर्व पत्र नायकाने आपल्या पत्नीसाठी,प्रिय मित्रांसाठी,आप्तस्वकियांसाठी पत्नीच्या माध्यमातून लिहलेले आहेत. तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असताना नायकानी अनेक पुस्तके,कादंबऱ्या,मासिके वाचली.जे देश विदेशातून त्याच्या पत्नीने,त्यांच्या मित्राने त्याला पाठवली आहे..!
कारावासात असताना त्याची झालेली तेथील अवस्था,राहणीमान,सभोवतालचे वातावरण,निसर्ग,त्याची खालवणारी तब्येत,पत्नीने,मित्रांनी वेळोवेळी पुस्तके पाठवूनही ते त्याला मिळत नसतात त्यामुळे त्याची होणारी गैरसोय हे सर्व काही लेखकाने या पत्रांच्या माध्यमातून लिहलेले आहे..!
त्याचा हा सर्व प्रवास अन या सर्वांच्या पलीकडे जगाशी असलेला त्याचा संबंध,सोबतच त्याने या सहा वर्षांच्या काळात जेलमध्ये केलेलं असंख्य लेखन वेळोवेळी त्याची अनेक जेलमध्ये होणारी बदली त्याने जेलमध्ये पाळलेली मांजर,जेल समोर लावलेली असंख्य फुलांची छोटीशी बाग अन् त्याचं तिला न्याहाळत रहाणं,त्याला एकट्याचा सहवास खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांसाठी त्याची होणारी चिडचिड अन् जेलमधून सुटल्यावर आपल्या भविष्यातील योजना हे सर्व लेखक या हळूवार प्रवासातून आपल्याला उलगडून सांगत असतात..!
तेव्हा नक्कीच वाचावं असं हे पुस्तक..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा