#laborlaw.
परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते.
कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते.
आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे...
भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल...
संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसाद खूप सहज दिसायला लागतील.
औरंगाबाद (माझे शहर असल्यामुळे तेथील एमआयडीसी विश्वाचा अभ्यास बघता ) सारख्या शहरात की जे शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते...
ज्याठिकाणी पाच एमआयडीसींच्या अंतर्गत अनेक कंपन्या आज घडीला चालू आहे,हजारो युवकांना रोजगार याठिकाणी उपलब्ध आहे,यापूर्वीच्या दोन पिढ्या या औद्योगिक वसाहतींवर आपले जीवन आधारित ठेवून जगले आहे,तिथे आजची अवस्था कायद्यानुसार झालेला बदल यांमुळे कंत्राटी कामगार असो किंवा कंपन्यांतील पर्मनंट व्यक्ती असो हे सर्व संभ्रमात पडले आहे...
औद्योगिक वसाहतीतील कामगार,कंत्राटी कामगार यांच्या बाबतीत आखलेली नियमितची धोरणे बघता भविष्यात खूप काही बदल झाले असतील हे चित्र दिसते... कारण वरवर जरी एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग सुखी आहे,हा समज समाजातील इतर क्षेत्रातील माध्यमांचा असेल.परंतु कुठल्याही कंपनीत काम करतांना केलेली मेहनत,त्यांचा संघर्ष हा प्रत्यक्षात जवळुन अनुभवल्या शिवाय समजणारा नाही इतकंच...
(पोस्टचा राजकारणाशी जोडून वक्तव्य करणाऱ्याचा याठिकाणी विचार होणार नाही,तेव्हा आपण न व्यक्त झालेले योग्य असेल.)
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा