धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!
आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो...
गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय...
काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो...
मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर असले की रात्रीचा शिळा भात जो सकाळी गरम करून खायला मला खूप आवडतो तो ही गरम करून प्लेट,चमचा घेऊन त्या थंड वातावरणात या गरम भाताचा स्वाद घेत बसतो...असो नशीब आहे म्हणुन लॉकडाऊन इतके आरामात चालू आहे माझे,बाकी बाहेर अवस्था बघवत नाही आता अन् मी पण किती दिवस घरी बसू असे आता भविष्य खुणावते आहे...
आयुष्यातील एक वर्ष जे आयुष्यात सर्वाधिक महत्वाच्या टप्प्यावरचे आहे ते पूर्णपणे काहीही हाती न लागता गेले आहे,फक्त जगण्याची उमेद भेटली इतकेच...
धड नीट शिक्षण होत नाहीये,धड जॉब बघायचा तर तो ही बघितला जात नाहीये.असंख्य प्रश्न फक्त समोर आहे,रोज मन मारून त्यांना उत्तर द्यायचे आराम करायचा,इतकेच काय ते हातात आहे.ऑनलाईन काय-काय करणार अलरेडी इतके काही वाचून,सर्च करून झाले आहे की अलिकडे दिवस-दिवस मोबाईलकडे लक्ष नाही दिले तरी चालते...
दिवसांतून दोन-तीन वेळा ईमेल,व्हॉटसअप,LinkedIn notification चेक केले की धकून जाते...एरवी मलाही फारवेळ यासर्व गोष्टीशी जुळून घ्यायला नकोसे वाटते आहे.अजून काही दिवस आराम करायचा,मग जोमाने कामाला लागायचे मग मात्र मागे वळून बघायचे नाहीये इतकेच ठरवले आहे सध्यातरी...
गेले काही दिवस पहाटे-पहाटे शहर खूप सुंदर दृश्य अनुभवयास देत आहे,ते बर्फाळ प्रदेशात ज्याप्रमाणे पहाटे धुकं दिसतात तसेच जिथवर नजर जाईल तिथवर फक्त धुकं आणि धुकं बस कॉफी,भात हे समीकरण जुळवून आले की मग अजून चार चांद लागून जातात या रोजच्या प्रवासाला...हे सगळे अनुभवले की गरम-गरम ब्लँकेटमध्ये पुन्हा एक झोप हवीच ती साखरझोेप असते तीच....
एरवी सायकलवर पेपर वाटणारे भराभर पेपर फेकत चालले आहे,दूधवाला दुधाची क्यान गाडीला अटकवून दूध-दूध आरोळी देत चालला आहे.त्याच्या गाडीला अटकवलेल्या त्या छोट्या-छोट्या क्याटल्याच्या आवाज माझ्या खूप ओळखीचा आहे तो आत्ता ऐकू आला.पेपरवाल्या त्या मुलाने अॅडव्हाॅकेट आजोबांचा पेपर त्या लेटरबॉक्स मध्ये टाकला आहे,खूप दिवस झाले पेपर वाचला नाहीये,चला दुपारी वाचुच आज पेपर तोवर एक निवांत झोप घेतो....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा