मुख्य सामग्रीवर वगळा

माझे हळवे मन तुझ्यासाठी....

कधी कधी अनेक विचारांचे काहूर मनात येऊन जाते...
मन जुळून येतं पण,बोलणं असह्य वाटू लागते.तुझ्याबद्दल मनात चांगले विचार आहे,पण त्या Positive Vibes दिसून येत नाही.मन कागदांवर चार गोष्टी व्यक्त करून मोकळं होतं,पण जेव्हा ते आत्मसात करायची वेळ येतेना ते करता येत नाही...

रडू येतं पण आसवांच डोळ्यांतून येणं होत नाही,कधीतरी विचारांचा बांध फुटला अन डोळे अश्रूंपासून वेगळेही झाले,तरी उशी ओली होत नाही.तुझ्यासाठी मनातले विचार ओठांवर येणं,पण तिथंच त्यांचं घुटमळत सांजेच्या प्रहरी अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत अस्ताला जाणं...किती अस्वस्थपणाचे बोलके मुखवटे घेऊन जगत असतो नाही का आपण..?

कॉल आला आहे,रिसिव्ह करूनही फक्त बोलणं ऐकत राहणं.कधीतरी खूपच मनातील भावना हळव्या झाल्या तर,टेक्स्ट मॅसेज टाईप करणं,इथेही स्पॅस देतांनाची तडजोड बॅकस्पेसमध्ये बदलून जाणं.इतकी तडजोड सहन करून मॅसेज पाठवनं आणी तो, seen होऊनही प्रतिउत्तर न येणं...
हे सगळ मनाला हळवे करून आशेवर जगते ठेवण्याचे खेळ आहे....

अलीकडे जसे बोटे मोबाईल स्क्रीनला स्क्रोल करत राहतात,तसेच आॅफीसमधल्या विंडोग्रिलची काच,त्या बर्फी कलरच्या पडद्या पलीकडचं निलगिरीचं झाड मी बघत असतो...
त्याचं शेवटच्या घटका मोजणारं आयुष्य मला ते दाखवत आहे,दिसत आहे,पण बघणं होत नाही. त्याचं अस्तित्व फक्त मला त्याच्या सुगंधातून कळत आहे,कधीतरी ते सुखलेलं लाकूड झालेलं झाड उंन्मळून पडेल सांगता येत नाही.त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत मी पण आतून त्याचा होत आहे... माझं काय अस्तित्व आहे ? या प्रश्नाची मांनगुटीवर तलवार कायम लटकलेली असते तिचं मी काय करू..?

जगण्यात फरफट चालू आहे पण स्वीकारणं जमत नाही.रितेपणाच्या ओंजळीत असंख्य रातराणींच्या फुलांची बहार आहे,पण मला सुगंध घेता येत नाही,याही पुढे उभं आयुष्य वेठीस पडलं आहे अन् मला आठवणीत रमायला आवडतंय....

शेवट इतकंच की निर्णय घ्यायचे आहे,पण मला ती पण घेता येत नाहीये...
अन् घेऊन चुकलेच कधीतर मग त्यातून सावरणे मला सहजासहजी जमत नाहीये....

#जेव्हा_दोन_गोष्टी_एकत्र_येतात_तेव्हाचं_निर्णय_न_घेऊ_शकणारं_हळवं_मन....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...